गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

रखडलेल्या प्रकल्पांबाबत विभागवार बैठक ; ना.शंभूराज देसाई

ना. शंभूराज देसाई यांची कराडमध्ये पत्रकार परिषद 

कराड प्रतिनिधी :
राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी 4 फेब्रुवारी ते 8 फेबु्रवारी या पाच दिवसांत विभागवार बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकीत राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांवर चर्चा होणार असून आगामी अर्थसंकल्पात या प्रकल्पांना निधी देण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती वित्त व गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. दरम्यान, भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात एक ते दोन अपवाद वगळता, कोठेही अनुचित प्रकार घडला नसून परिस्थिती पोलिसांच्या नियत्रंणाखाली असल्याचेही ना. देसाई यांनी यावेळी सांगितले
त्याचबरोबर आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर वित्त मंत्री अजित पवार यांच्यासह आपल्या उपस्थितीत विभागवार बैठका होणार आहेत. या बैठकीत रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला जाणार असून आवश्यक तो निधी देण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले. पाटण तालुक्यातील मल्हारपेठ आणि कराड तालुक्यातील मलकापूरमध्ये स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी मागील दहा वर्षापासून प्रलंबित आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी आपण आग्रही भूमिका घेणार असल्याचेही ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

नवीन जिल्ह्याचा विषयच नाही...
राज्यात नवीन जिल्ह्याच्या निर्मितीच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र तसा कोणताही विचार राज्य शासनापुढे नाही. त्यामुळे राज्यात नव्याने जिल्हा निर्मिती करण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. जर तसा विषय असेल, तर त्याबाबत निश्‍चितपणे योग्य वेळी माहिती दिली जाईल, अशी माहिती ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...