गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

मुलानेच निर्घृणपणे केले आईचे तुकडे, घाटकोपर हत्याकांडाची उकल

मुंबई कुमजाई पर्व ऑनलाइन न्यूज 

मुंबई : आईसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून मुलानेच आईची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर गुन्हे मालिकांप्रमाणे आईच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते विविध भागात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी महिलेच्या मुलाला रात्री उशीरा अटक केली.
माहिम हत्याप्रकरणानंतर घाटकोपर परिसरात ३० ते ३५ वयोगटातील महिलेचे २९ डिसेंबर रोजी धड सापडल्याने खळबळ उडाली. त्यापाठोपाठ पाय आणि कुजलेल्या अवस्थेत महिलेचे शीर सापडले. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी अधिक तपास सुरु केला.
याच दरम्यान बुधवारी एका तरुणाला घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात, मुलानेच आईसोबत झालेल्या भांडणातून आधी तिचा गळा दाबून हत्या केली.
त्यानंतर, मृतदेहाची विल्हेवाट कशी लावयची याबाबत विचार करत असताना, त्याला माहीमच्या बेनेट रिबेलो हत्याप्रकरणाबाबत आठवले. शिवाय मुलाला गुन्हे मालिका पाहण्याची आवड होती. यातूनच त्याने माहीम हत्याप्रकरणाप्रमाणे आईच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फेकण्याचे ठरवले. त्यानुसार, आईच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते दुचाकीवरुन वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत महिलेच्या मुलाला अटक करण्यात आली असून पुढील अधिक चौकशी पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...