शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

शेखर सिंह सातार्‍याचे नवे जिल्हाधिकारी

सातारा : प्रतिनिधी

सातार्‍याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची पुणे अतिरिक्‍त विभागीय आयुक्‍तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सातारा जिल्ह्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी जलयुक्‍त शिवार योजनेला आणखी गती दिली. तत्कालीन जिल्हाधिकारी एन्. रामास्वामी यांच्यानंतर अश्‍विन मुद‍्गल यांनी विकासातील सातत्य श्‍वेता सिंघल यांनीही कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. सातबारा संगणकीकरण, महाराजस्व अभियान, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजना, जलयुक्‍त शिवार अशा अनेक योजना आणि सरकारी उपक्रम त्यांनी तळागाळापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला

गत महिन्यात मसूरी येथे आयएएस अधिकार्‍यांच्या झालेल्या प्रशिक्षणात श्‍वेता सिंघल यांनी नेत्रदीपक कामगिरी केली.त्यांची बदली पुणे येथे अतिरिक्‍त आयुक्‍तपदी झाली आहे. राज्य शासनाने त्याबाबतचे आदेश दिले आहेत. सिंघल यांच्या जागी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नियुक्‍ती केली आहे. सिंह हे 2012 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी 2016 साली सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्याला स्वच्छ जिल्ह्याचा बहुमान त्यांनी मिळवून दिला. शेखर सिंह यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही कर्तव्यदक्ष व कणखर अधिकारी म्हणून कामाचा ठसा उमटविला. शेखर सिंह हे सातार्‍याचे जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारतील त्यावेळी पूर्वीच्या अधिकार्‍यांनी जिल्ह्यात विकासकामांतून निर्माण केलेली बॅटन पुढे नेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...