संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९
वसा दुर्गस्वच्छतेचा!: जय स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र नगर मानखुर्द ’ या संस्थेने २९डिसेंबर रोजी शिवनेरी गडावर साफसफाई करत विधायक दुर्गभ्रमंतीचा नवा अध्याय जोडला.
`शिवसैनिकांनो स्वभाव बदला' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना पुण्यातून रक्ताने लिहिलेले पत्र!
शिक्रापूर - शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना मंत्रीपद देण्याच्या मागणीसाठी युवासेनेच्या शिरुरच्या बापूसाहेब शिंदे यांनी आपल्या रक्ताने लिहीलेले पत्र नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. `आपण सत्तेत आलोय, आता आपला स्वभाव बदला' असे चारच दिवसांपूर्वी पुण्यात येवून जाहिरपणे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आता शिवसैनिकांचे असे आक्रमक स्वभाव बदलण्याचे आव्हान असणार आहे.
राज्याच्या राजकारणात एकदमच अनपेक्षित अशी महाआघाडी अस्तीत्वात येवून सत्तेच्या खुर्चित कधीच न बसलेले ठाकरे कुटुंबीयांमधील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने संपूर्ण राज्यातील शिवसैनिका प्रचंड आनंदीत आहेत.
या पत्राची चर्चा सध्या सोशल मिडीयात चांगलीच असली तरी अशा प्रकारांमुळे शिवसैनिक आता स्वभाव बदलणार का आणि तो कसा बदलनार असा प्रश्न खुद्द ठाकरेंनाही पडणार आहे.
मुळात शिंदे यांची मागणी योग्य आहे, व्यवहार्य आहे हे नाकारुन चालणार नसली तरी मंत्रीपद देण्याचा निर्णय शिवसेनेसाठी एवढा सोपा नाही. तीन पक्षांच्या आघाड्या, प्रत्येक पक्षातील नेत्याचे, त्याच्या जिल्हा-तालुक्यातील राजकारणाचा या मंत्रीपदाशी थेटपणे परिणाम हे सगळेच मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांना संभाळावे लागणार आहे.
आक्रमकपणे भावना मांडणाऱ्या शिवसैनिकांनी दबाव म्हणून असे प्रकार पक्षालाही अडचणीचे ठरणारे आहे हेही या निमित्ताने शिवसैनिकांच्या गळी उतरावे लागण्याचे आव्हान शिवसेना नेत्यांवर आहे. पर्यायाने शिंदे यांच्या पत्राची दखल म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कशी घेतात यापेक्षा अशा पत्रांची दखल घेऊन शिवसैनिकांनो आता स्वभाव बदला असे पुण्यात येवून म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी पुण्यातूनच रक्ताने लिहील्या गेलेल्या पत्रामुळे शिवसैनिकांची कार्यशाळा घेण्याची गरज आहे.
सोमवार, ३० डिसेंबर, २०१९
मुंबईकरांचं आता तरी भलं होणार का ? एकट्या मुंबईतून ५ कॅबिनेट मंत्री!
सातारा जिल्हा : मिळाली फक्त दोन मंत्रिपदे..
पाटण / कराड प्रतिनिधी :-
| महाविकासाआघाडीचा गाभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला आज मंत्रिमंडळ विस्तारात फक्त दोनच मंत्रिपदावर समाधान मानावे लागले आहे. सातारा जिल्ह्याला ४ मंत्रीपदे दिली जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने १ आणि शिवेसेनेने १ मंत्रिपद साताऱ्याला दिले आहे.सातारा जिल्ह्यातुन कॉंग्रसचे एकमेव आमदार असलेले पृथ्वीराज चव्हाण यांना या मंत्रामंडळ विस्तारातुन डावलले गेले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मकरंद पाटील यांनाही या विस्तारात संधी देण्यात आली नाही.
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब उर्फ शामराव पांडूरंग पाटील यांना आज कॅबिनेट मंत्रिपदाची आज शपथ देण्यात आली.
शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांना आज राज्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. पाटण विधानसभा मतदार संघाचे तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. सन 2004 मध्ये शिवसेनेतून निवडणूक लढवून ते पहिल्यांदा निवडून आले होते. याच काळात आमदार देसाई यांना उत्कृष्ट संसदपट्टू म्हणून गौरवण्यात आले.सन 2009 मध्ये त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर देसाई यांनी पून्हा सन 2014 व सन 2019 मधील निवडणूकांमध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून येण्याची किमया साधली. सन 2014 ते 2019 या कालावधीमधील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारच्या काळात आमदार देसाई यांना मंत्रीपदाची संधी मिळू शकली नव्हती.
पाटण ; आमदार शंभुराज देसाईंना राज्यमंत्रीपद
पाटण :- | महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची यादी नुकतीच जाहीर झाली असून यामध्ये अनेक नव्या चेहर्यांना संधी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. देसाई यांना राज्यमंत्री पद दिल्याने पाटण तालु
क्यात उत्साहाचे वातावरण आहे.देसाई हे तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. याबरोबरच ते उत्कृष्ट संसदपट्टू म्हणूनही ओळखले जातात.
भोर : संग्राम थोपटेंची मंत्रिपदाची संधी हुकली ! समर्थक संतप्त
मंत्रिमंडळ विस्तारात कॉंग्रेसचे पुण्यातील आमदार संग्राम थोपटे यांचे नाव मागे पडल्याचे वृत्त असून त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काल दिवसभर माध्यमात ते मंत्री होणार असल्याची चर्चा होती.
भोर मतदारसंघातून संग्राम थोपटे हे गेली तीन टर्म निवडून येतात. राज्यात कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर आल्याने ते मंत्री होणारच अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती. आजच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी थोपटे यांचे समर्थक मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले होते मात्र, अर्ध्या वाटेवरच त्यांना धक्का देणारा निरोप आला तो म्हणजे संग्रामदादा मंत्री होणार नाहीत म्हणून !
ही बातमी कानावर पडताच अर्ध्यावाटेवरून संतप्त झालेले कार्यकर्ते माघारी फिरले आणि थेट मतदारसंघ गाठला.
यावेळी संधी हुकणार नाही. संग्रामदादा मंत्री होणारच ही आशा मनी बाळगून असलेल्या कार्यकर्त्यांचा आनंद आणि उत्साह काही वेळच टिकला आणि वाटेला आला तो संताप. या सर्व घडामोडीवर मात्र आमदार थोपटे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आजच्या विस्ताराच्या पार्श्वभूमी कॉंग्रेसमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. आता संग्राम थोपटे कोणती भूमिका याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
मंत्रिमंडळ विस्तार - राष्ट्रवादीचे 14, शिवसेनेचे 12, तर काँग्रेसचे 10 मंत्री, पाहा संपूर्ण यादी
मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारामध्ये राष्ट्रवादीचे 14, शिवसेनेचे 12, तर काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सर्व मंत्र्यांची यादी 'टीव्ही9 मराठी'च्या हाती आली आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
विस्तारामध्ये राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली आहेत. आतापर्यंत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे 16-14-12 अशी मंत्रिपदं आहेत
राष्ट्रवादीचे मंत्री
अजित पवार (उपमुख्यमंत्री)
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
अनिल देशमुख
हसन मुश्रीफ
राजेंद्र शिंगणे
नवाब मलिक
राजेश टोपे
जितेंद्र आव्हाड
बाळासाहेब पाटील
दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री)
आदिती तटकरे (राज्यमंत्री)
संजय बनसोडे (राज्यमंत्री)
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री)
शिवसेनेचे मंत्री
संजय राठोड
गुलाबराव पाटील
दादा भुसे
संदीपान भुमरे
अनिल परब
उदय सामंत
शंकरराव गडाख
आदित्य ठाकरे
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री)
शंभराजे देसाई (राज्यमंत्री)
बच्चू कडू (राज्यमंत्री)
राजेंद्र येड्रावकर (राज्यमंत्री)
काँग्रेसचे मंत्री
अशोक चव्हाण
विजय वडेट्टीवार
वर्षा गायकवाड
सुनिल केदार
अमित देशमुख
यशोमती ठाकूर
अस्लम शेख
के. सी. पाडवी
सतेज पाटील (राज्यमंत्री)
विश्वजीत कदम (राज्यमंत्री)
कराड ; उसाला तुरे आल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर,जनावरांचे हाल; ऊस उत्पादनातही घट
कराड - कराड तालुक्यातील बहुतांश परिसरात उसाला तुरे आल्याने उत्पादनात घट होत आहेच, शिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा टंचाईमुळे त्रस्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी गुरे विकली आहेत. चारा टंचाईची धग येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे.
कराड तालुका हा मुख्यतः ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो. यंदा कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. महापुरामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातूनही सुपने, कार्वे, कोपर्डे, मसूर, केसे, विंग, वडगाव, काले व अन्य काही भागात ऊस जोमदार आला आहे. मात्र, पिकाला तुरे आल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आणखी चाऱ्यासाठी शेताच्या बांधावरील हिरवे गवत वापरले. आता ते गवतही संपल्याने जनावरांसाठी फक्त उसाच्या वाढ्याचा आधार आहे. गेले काही वर्षांपासून कराड तालुक्यातील बऱ्याच ऊस पिकाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सगळ्या शिवारात उसाचे वाढे चाऱ्यासाठी योग्य नाही. परिणामी चारा टंचाई वाठ आहे. जेथे उसाला तुरे आलेले नाहीत, तेथे वाढ्याच्या किमती वाढल्या आहेत. हे दर परवडणारे नसल्याने सर्वसामान्य शेतकरी या चाऱ्याकडे पाठ फिरवत आहेत. उन्हाळा सुरू होण्यास अजून अवधी आहे. उन्हाळ्यात चाऱ्याविना जनावरांचे हाल होतात. त्यामुळे आताच जनावरांच्या चाऱ्याची सोय करणे गरजेचे आहे.
पारनेर धक्कादायक : ग्रामसेवक व तलाठ्याने गावाला अंधारात ठेऊन निवडला ग्रामपंचायत सदस्य!
पारनेर : ग्रामसेवक व तलाठ्याने ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची एक जागा बिनविरोध केली, असा आरोप करत तालुक्यातील मांडवे खुर्द येथील सरपंचाने तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.मांडवे खुर्दच्या प्रभाग क्रमांक एकमधील एक जागा इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होती . या जागेवर मागील निवडणुकीत विजयी झालेल्या महिलेने जातीचा पुरावा वेळेत दाखल न केल्याने तिचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते . त्यामुळे तेथे पोटनिवडणूक जाहीर झाली होती. मात्र, हा निवडणूक कार्यक्रम गावाला माहीत झालाच नाही.ग्रामसेवक व तलाठी यांनी सरपंचासह ग्रामस्थांना याबाबत अंधारात ठेवले. कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ग्रामसेवक व तलाठ्याने गावातील काही जणांना हाताशी धरून परस्पर केवळ एका महिलेचा अर्ज भरून घेतला आणि या जागेवर संबंधित महिला बिनविरोध विजयी झाल्याचे जाहीर केले, अशी तक्रार सरपंच जिजाबाई हारदे व उपसरपंच राहुल जाधव यांनी केली आहे. त्यामुळे तेथील ग्रामपंचायत पोटनिवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
नववर्षात कोरठण खंडोबाला लागणार हळद!
रविवार, २९ डिसेंबर, २०१९
उद्या काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार, : पृथ्वीराज चव्हाण आणि सुनील केदार यांच्याविषयी अनिश्चितता
कुमजाई पर्व।ऑनलाइन : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरला असून सोमवारी, ३० डिसेंबर रोजी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जवळपास 36 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली.या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनी उद्या शपथविधी होणार असून काँग्रेसच्या मंत्र्यांची अंतिम यादी तयार करण्यात आल्याचे सांगितले. तसेच, ही यादी आज जाहीर करण्यात येणार असून काँग्रेसचे 12 मंत्री असणार आहेत, त्यापैकी 10 कॅबिनेट मंत्री असतील, असेही त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळातील संभाव्य चेहरे
काँग्रेस : अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, संग्राम थोपटे, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, विश्वजीत कदम किंवा प्रणिती शिंदे, असलम शेख किंवा अमीन पटेल. (सुनील केदार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी अनिश्चितता)
आ.शंभूराज देसाई यांना संसदीय कार्यमंत्रीपद ?
कोयनानगर (ता.पाटण ) : मंत्रींमंडळाचा विस्तार उद्या 30 डिसेंबरला होत आहे.त्यावेळी शिवसेना , राष्ट्रवादी कॉंग्रेस , कॉंग्रेस या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे.
महाविकास आघाडीच्या नव्या सरकारमध्ये उत्कृष्ट संसदपट्टु असणाऱ्या पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभुराज देसाई यांना संसदीय कार्य विभागाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
देसाई हे तीन टर्म आमदारअसून मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीत त्यांचे नाव आग्रस्थानी असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपा-शिवसेना या युती सरकारच्या काळात देसाई यांचे तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर असलेले मैत्रीपूर्ण सबंध हे सर्वश्रुत आहेत.
युती सरकारच्या काळात भाजपा शिवसेना मधील सबंध ताणले गेल्यावर या दोन्ही राजकीय पक्षाशी संवाद साधून त्यांच्यातील विसंवाद दूर करण्याची जबाबदारी देसाई यांच्यावर होती. या संबंधाच्या जोरावर त्यांनी आपल्या पाटण या मतदारसंघात सर्वात जास्त निधी आणला आहे.
कॉंग्रेस पक्षाचे जुने जाणते करारी नेते माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शंभुराज हे नातू असून बाळासाहेब देसाई यांनी यापूर्वी महसूल , शिक्षण , ग्रूह , क्रुषि खाते सांभाळून त्यांना लौकिक प्राप्त करून दिला होता.करारी आजोबाचा करारी नातू अशी ओळख शंभुराज यांची आहे.
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शंभुराज देसाई या दोघांना उत्कृष्ट संसदपट्टु या पुरस्काराने वीस वर्षांपूर्वी गौरविण्यात आले आहे. वीस वर्षांपासून या दोघांचे मैत्रीचे सबंध आहेत. विधानसभेच्या विविध अयुधाचा वापर करून तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे.
आमदारकी छाया पहिल्याच टर्म मध्ये उत्कृष्ट संसदपट्टु तर दुसऱ्या टर्म मध्ये शिवसेना पक्षाचे प्रतोद व पाच वेळा विधानसभेचे तालिका अध्यक्ष उत्कृष्ट रित्या त्यांनी संभाळले आहे.आघाडी शासनाच्या कारकिर्दीत हर्षवर्धन पाटील यांनी तर युती सरकार मध्ये गिरीष बापट यांनी संसदीय कार्यमंत्री हे पद सांभाळले आहे.
पारनेरमध्ये 14 लाखांची दारू जप्त : उत्पादनची शुल्कची कारवाई जिल्ह्यात 5 पथकांची नियुक्ती
पारनेर तालुक्यातील गव्हाणेवाडी, दाणेवाडी येथे हातभट्टी निर्मीत केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून 5 हजार 700 लिटर रसायन नष्ट केले. तर वाळवणे व टाकळी ढोकेश्वर येथे अवैध देशी-विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून 14 लाख 13 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी संजय मारुती कार्ले, आप्पासाहेब मारुतराव काळे व सुनिल हनुमंत दाते यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशी-विदेशी दारु, हातभट्टी गावठी दारू, दोन चारचाकी अशी एक दुचाकी जप्त करण्यात आली.
नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठा जल्लोष केला जातो.
त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करडी नजर ठेवण्यात येत असून जिल्ह्यात 5 पथके व 2 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पार्टी व इतर कार्यक्रम होत असतात.
अहमदनगर : उपक्रमशील शाळा पुरस्कार जाहीर आज पुरस्कार वितरण सोहळा
गुरुकुल मंडळातर्फे आयोजित शिक्षक साहित्य संमेलनात नगर जिल्ह्यातील उपक्रमशील शाळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ज्या शाळांची पुरस्कारासाठी निवड झाली, त्यांची आज संयोजन समितीने घोषणा केली. राज्य सरकारच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजना समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते या शाळांचा रविवारी (दि.२९ )रोजी संमेलनात सन्मान होईल, अशी माहिती संयोजकांनी दिली.
जिल्ह्यातील साडेतीन हजार शाळांचे सर्वेक्षण करून त्यातून 28 शाळांची पुरस्कारासाठी निवड केली. त्यामध्ये निवड झालेल्या शाळा पुढीलप्रमाणे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जेऊर (ता. नगर), पिंपरखेड (ता.जामखेड), गारखिंडी (पारनेर), रवंदे (ता. कोपरगाव), त्रिंबकपूर (ता. राहुरी), माळवाडगाव (ता. श्रीरामपूर), निमगाव गांगर्डा व दुधोडी (ता. कर्जत), अरणगाव दुमाला व अजनूज (ता. श्रीगोंदे), कळस व गर्दणी (ता. अकोले), पिंपरकणे (पेसा, ता. अकोले), न. पा.वाडी व एकरूखे (ता. राहाता), धांदरफळ खुर्द व निळवंडे (ता. संगमनेर), चिलेखनवाडी (ता. नेवासे), कोळगाव (ता. शेवगाव), हनुमाननगर (मोहोज) व माने वस्ती (ता. पाथर्डी), लोणी खुर्द (ता. राहता), शेवगाव मुली (उर्दू), ओंकारनगर (महापालिका, अहमदनगर), येवले वस्ती (नगरपालिका, ता. राहुरी).याशिवाय गर्द झाडी आणि पर्यावरण रक्षणासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या वाघोली (ता. शेवगाव), केळेवाडी (ता. संगमनेर) या शाळांना "गुरुकुल पर्यावरणरक्षक शाळा पुरस्कार', तसेच वर्षभरात एकही दिवस सुटी न घेणाऱ्या व इस्रो विज्ञान सहलीत नियमित यश मिळविणाऱ्या पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन या शाळेस "स्वामी विवेकानंद गुरुकुल विशेष शाळा पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.
यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, असे बापू लहामटे, उस्मान तांबोळी, संतोष भोपे, शिवाजी नवाळे, आरिफ बेग व समितीमधील सदस्यांनी सांगितले.
कोरंठण यात्रेच्या तयारीस प्रारंभ : यात्रा महोत्सवाचे माहितीपत्रक देवाच्या चरणी अर्पण
शनिवार, २८ डिसेंबर, २०१९
इजिप्त दौर्यासाठी निवड झालेल्या तेजश्री पुंडेचा कोरंठण खंडोबा देवस्थानने केला सत्कार
पारनेर प्रतिनिधी :-
महाराष्ट्राचे कुलदैवत श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान कोरठण गड पिंपळगाव रोठा,तालुका पारनेर येथील बायो मेडिकल इंजिनिअर कुमारी तेजश्री वसंत पुंडे हिची इजिप्त देशाच्या दौऱ्यावर निवड झाल्या बद्दल श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या वतीने अध्यक्ष .पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन परदेश दौऱ्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी खंडेश्वर सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष जालिंदर खोसे तसेच पुंडे परिवाराचे सदस्य आणि ग्रामस्थ पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच पुंडे परिवाराची दुसरी कन्या नेटवर्क इंजि निअर(इन्फोसिस इंडिया)या आपल्या इंजिनिअर पदावर कार्यरत असलेल्या कुमारी-सायली वसंत पुंडे हिने आपल्या प्रथम पगारातील दहा हजार एक रुपये श्री कोरठण खंडोबा देवस्थानच्या सभामंडप बांधकामासाठी रोख देणगी दिल्या बद्दल देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
कोरठण यात्रा नियोजनाची प्रशासकीय बैठक :कोरठणला जोडलेल्या कान्हूरपठार ते कोरठण, पिंपळगाव रोठा ते अक्कलवाडी, नांदूरपठार, राष्ट्रीय महामार्ग ते पिंपळगाव रोठा रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करा :अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड
यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, देवस्थानचे अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, पोलिस उपनिरीक्षक बी. यु. पद्मणे, यात्रासमितीचे अध्यक्ष किसन धुमाळ, विश्वस्त महेंद्र नरड, दिलीप घोडके, हनुमंत सुपेकर, अश्विनी थोरात, बन्सी ढोमे, किसन मुंढे, देवीदास क्षीरसागर, गोपीनाथ घुले, भगवान भांबरे, मोहन रोकडे, बबन झावरे, उपसरपंच बाळासाहेब पुंडे यांच्यासह एस टी., सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य, ग्रामीण पाणी पुरवठा, अग्निशमन, महावितरण, बीएसएनएल, जि.प.सार्वजनिक बांधकाम आदी विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
भाविकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी कोरठणला जोडलेल्या कान्हूरपठार ते कोरठण, पिंपळगाव रोठा ते अक्कलवाडी, नांदूरपठार, राष्ट्रीय महामार्ग ते पिंपळगाव रोठा रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याबाबत तसेच रस्त्याच्या कडेला असणारी झुडुपे तोडणे, दिशादर्शक फलक लावणे, गारखिंडी घाटात संरक्षक कठडे बसविण्याबाबत सूचना देण्यात आल्या.यात्रेत व्यवस्थापन कक्ष स्थापन करून यात्रेशी संबंधित विभागांनी येथून नियंत्रण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९
30 डिसेंबरला ठाकरे सरकारमधील कोण कोण घेणार मंत्री पदाची शपथ :
राज्यात ठाकरे सरकारची सत्तास्थापन झाली. मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर 30 डिसेंबरला हा मंत्रिंडळ विस्तार होणार आहे. विधान भवनाच्या प्रांगणात या मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्री सोमवारी शपथ घेणार आहेत. दरम्यान, यामध्ये एकूण 36 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. याआधी 30 मंत्री शपथ घेतील अशी चर्चा होती.
कोण आहेत मंत्रिमंडळातील संभाव्य चेहरे-
शिवसेना- रविंद्र वायकर, तानाजी सावंत,संजय राठोड, गुलाबराव पाटील, सुनील राऊत, अनिल परब, शंभुराज देसाई, प्रकाश आबिटकर, डाॅ.संजय रायमुलकर, उदय सामंत, अनिल बाबर, नीलम गोर्हे.
राष्ट्रवादी- अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ , नवाब मलिक, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, मकरंद पाटील, राजेश टोपे, अनिल पाटील, धर्मारावबाबा आत्राम, दत्ता भरणे , संजयमामा शिंदे.
तरूण चेहरे म्हणून अदिती तटकरे आणि रोहीत पवार यांची नावे सुद्धा चर्चेत
काॅंग्रेस - अशोक चव्हाण, विजय वड्डेट्टीवार, के.सी पाडवी, संग्राम थोपटे, अमित देशमुख, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे , अमीन पटेल, सुनिल केदार, पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रीमंडळात समावून न घेता प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचा विचार करत आहेत.
तर तुही अविवाहित राहून माझ्या सारखीच समाजसेवा केली असती ! : अण्णा हजारे
ज़्येष्ठ समाज़ेसवक अण्णा हज़ारे यांच्या आंदोलनास पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी पाठिंबा दिला आहे. देशामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढल्याने दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशातील जनतेच्या रोषामुळे कायद्यात बदल झाला होता.
परंतू आजही दोषींना फाशी झालेली नाही, जलदगती न्यायालयात किमान सहा लाखांहून अधिक खटले प्रलंबित असून, अनेक महिला पीडितांना न्याय मिळालेला नाही. त्यांना न्याय मिळावा, या व इतर मागण्यांसाठी अण्णांचे मौन आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आ. लंके हे नागपूर अधिवेशन संपवून अण्णांच्या भेटीला आले व अण्ण्णांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली परंतू माझ्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय व निर्भया प्रकरणातील दोषींना शिक्षा झाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नाही, असे सांगत अण्णा त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे अण्णांनी आपल्या लिखित संदेशात आ. लंके यांना सूचित केले.
कोट्यवधी रुपये खर्चून जनजागृती होणार नाही, ती या आंदोलनाने होईल, असा विश्वास अण्णांनी व्यक्त केला. माझा मतदारसंघ हा अण्णांचा मतदारसंघ असून, माझ्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अण्णा तुमचा आशीर्वाद हवा आहे, अशी विनंती या वेळी आ.लंके यांनी केली असता, अण्णांनी विधायक कामात मी तुझ्याबरोबर नेहमीच असणार, मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर तुम्ही विधिमंडळात व मी बाहेरून तालुक्याच्या प्रश्नांसाठी नेहमी तुमच्याबरोबर राहील, असा शब्द अण्णांनी दिला.
माझ्यासारखा तुही फकीर गडी आहेस, दहा वर्षापूर्वी तू मला भेटला असता तर तुही अविवाहित राहून माझ्या सारखीच समाजसेवा केली असती. स्वत:च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून ज़नतेची सेवा करत आहे. तुम्ही स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या, पारनेरचा पाणीप्रश्न व इतर ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी तालुक्याला तुमच्या सारख्या फकीर माणसाची गरज आहे.
मतदारसंघातील प्रश्न तुम्ही सोडवू शकता, असा वडिलकीचा सल्लाही अण्णांनी आ. लंके यांना दिला. तालुक्याच्या पाणीप्रश्नासह विविध विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळून तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाठपुरावा करू,असा शब्द आ. लंके यांनी अण्णांना दिला.
बुधवार, २५ डिसेंबर, २०१९
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते :मा.आ. विक्रमसिंह पाटणकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खास लेख : संपादक प्रदीप विष्णू माने
सातारा जिल्ह्यातला पाटण तालुका. कोकणाला देशाशी जोडणारा पाटण हा कोयना नदीच्या खोऱ्यातला डोंगराळ भाग . या भागाबद्दल राजकारण्यांच्या मनात अनास्थाच असायची.
त्या काळात पाटणमध्ये फक्त कराड ते चिपळूण एकमेव पक्का रस्ता होता. तालुक्यातल्या अनेक गावात रस्तेच नव्हते एसटी पोहचणे लांबच राहिलं. एकाद्या गावात जायचे म्हटलं तर एक दिवस पुर्ण लागत असे.
परिस्थिती इतकी बिकट होती की डोंगराळ भागातल्या लोकांना आठवडा बाजारासाठी पाटणला यायचे म्हटले तरी आदल्या दिवशीच भाकरी बांधून प्रवासाला निघायला लागे. बाजारादिवशी बाजार करुन मुक्कामी राहून हे लोक दुसऱ्या दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाला पायी चालत निघत.पाटण तालुक्यात त्या काळात दवाखानेसुद्धा खुप कमी म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच गावात होते. गावातील कोणी व्यक्ती जर आजारी पडली तर उपचारासाठी दुसऱ्या गावात घेऊन जायचे म्हटले तर रस्ते नाहीत, वाहने नाहीत.
मग अशा वेळी त्या आजारी व्यक्तीला डोलीत किंवा डालग्यात घालून इतर काही लोक धावत-धावत उपचारासाठी दवाखाना असलेल्या गावी येत. येवढे जिवाच्या अंकाताने पळुनही बऱ्याच वेळा आजारी व्यक्ती उपचारापुर्वीच दगावली जायची,असे हे जनावरांचे जीवन पाटण तालुक्यातील जनता जगत होती.
अशात १९८३ साली विक्रमसिंह पाटणकर यांची पाटणच्या आमदारपदी पहिल्यांदा निवड झाली. त्यांना ठाऊक होते तालुक्याच्या परिवर्तनाचा प्रवास रस्त्यांचे जाळे विणल्याशिवाय होणार नाही. आपल्या आमदारकीच्या पहिल्या दिवसापासून याच ध्यासान त्यांना पछाडल.
याचाच परिणाम होता की, १९८३ ते १९८७ या ५ वर्षांच्या कालखंडात पाटण तालुक्यात एकूण ९७ रस्ते व त्यावरील शेकडो मोऱ्या, ११ ठिकाणी फरशी पुल, चाफेर धक्क्यावर बांधलेला कोयना नदीवरील पुल एवढी प्रचंड कामे हाती घेऊन पुर्ण करण्यात आली. कोयनेच्या या खोऱ्यात पाऊसाचा जोर देखील जास्त. पावसाळ्यात नद्या दुथडी भरून वाहायच्या. पूर आल्यावर तालुक्यातल्या बऱ्याच गावांचा चार महिन्यासाठी संपर्क तुटायचा. विक्रमसिंह पाटणकरांनी अनेक नद्यांवर पूल उभा केले.
कितीही खर्च असला तरी रस्ते आणि पूल उभारणीला निधी कमी पडू दिला नाही. रस्त्यांचे जाळे विणत असताना त्यांनी अजुन एक जनतेच्या हिताची गोष्ट केली. ती म्हणजे हे सर्व रस्ते सरकारच्या ‘रोजगार-हमी’ योजनेतून बांधले त्यामुळे पाटण तालुक्यातील अनेक बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध झाला.
ही सगळी विकासकामे चालू असताना हा आमदार स्वतः तिथे उभा राहून काही गैरप्रकार होणार नाही ना याची काळजी घ्यायचे
या डोंगराळ भागात कराड-साताऱ्यासारखे उद्योग उभारता येणार नाहीत हे त्यांनी वेळीच ओळखले होते म्हणून त्यांनी शेतीपुरक व्यवसायांच्या निर्मितीवर भर दिला.
त्यातूनच पुढे पाटण तालुका दुध संघ, सकस दुध डेअरी, कोयना अँग्रो यांची निर्मिती झाली. याच दूरदृष्टीने त्यांनी पवनउर्जा प्रकल्प उभा केला. अनेक तरुण तरुणीच्या हाताला काम दिल. शाळा कॉलेज काढून उच्चशिक्षणासाठी लांब कुठे जावे लागणार नाही याची काळजी घेतली.
डोंगर फोडले, घाट बांधले रस्त्यांचे जाळे उभारले पण यामुळ एक झालं लोकं एकमेकांच्या जवळ आली. विकास खऱ्या अर्थाने सुरु झाला. पाटण तालुका माणसात आला. आजही तालुक्यातल्या कोणत्यापण गावात जाऊन विचारलं की रस्ता कोणी बांधला तर उत्तर मिळत पाटणकर दादांनी बांधला.याच त्यांच्या कार्यामुळे वयाची पंचाहत्तरी उलटली तरी लोकांशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. आमदारकी मंत्रीपद या पदव्या त्यांच्या कार्याचं बायप्रोडक्ट म्हणून मिळाल्या पण या पेक्षाही तालुक्यातील लोकांनी भाग्यविधाते म्हणून दिलेली पदवी ते अभिमानाने मिरवतात.
दादा आपणांस साप्ताहिक कुमजाई पर्व परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
राष्ट्रीय पेयजल योजना : सातारा जिल्ह्यातील १७७ सरपंच, सचिवांवर होणार गुन्हे दाखल?
मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९
शेतकऱ्यांसाठी व्हेजिटिबेल क्लस्टर उभारणार : माजी खासदार आढळराव पाटील यांची माहिती
माजी खासदार आढळराव पाटील यांची माहिती
शिरूर- शिरुर, खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी व्हेजिटिबेल क्लस्टर उभारण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दिली. शिरुर येथे आढळराव यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माऊली कटके, तालुकाप्रमुख सुधीर फराटे, अनिल काशिद, पोपटराव शेलार, मयूर थोरात, विजया टेमगिरे, शैलेजा दुर्गे, अनघा पाठकजी आदी उपस्थित होते.
सेंद्रिय शेती पद्धतीने भाजीपाला पिकवून हा भाजीपाला निर्यातही करु शकतो.यासंदर्भातील चार तालुक्यातील माती व अन्य बाबीच्या अभ्यास केला जात आहे. किल्ले शिवनेरीवर संग्रहालय व्हावे, याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. पुणे- नाशिक व पुणे- नगर रस्त्यावरील वाहतूक व रहदारीच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. थेऊर येथील बंद असलेल्या यशवंत साखर कारखान्याच्या प्रश्नांबाबतही लवकरच बैठक लावण्यात येणार आहे.
जुन्नर येथे शिवसृष्टी निर्माण करणे, वढू येथे शंभूसृष्टी व शिवनेरीवर रोप वे तयार करावा, याबाबत खासदारकीच्या कार्यकाळात मागणी केली होती. सरकारनेही या मागण्या संदर्भात प्रतिसाद दिला आहे. पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढता वावर असल्याचा पार्श्वभूमीवर 1 हजार हेक्टर क्षेत्रावर बिबट सफारी पार्क तयार करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याला प्रगतिपथावर नेतील, असा विश्वास व्यक्त करून आढळराव पाटील म्हणाले की, बुलेट ट्रेनपेक्षा पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांसाठीच्या योजना महत्वाच्या आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेवून शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. इतर पक्षांशी आघाडी आहे म्हणून चुकीच्या बाबीसंदर्भात गप्प बसणार नाही. चुकीच्या बाबींना विरोध करू. भाजपसमवेत युती असतानाही चुकीच्या गोष्टींना विरोध केल्याचे आढळराव यांनी सांगितले.
शिरुर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी प्रामाणिकपणे भाजपाच्या उमेदवाराचे काम केले. याउलट भाजपाने खेडमध्ये उमेदवार उभा केला व जुन्नरमध्ये अपक्ष उमेदवाराला पाठबळ दिले असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
सोमवार, २३ डिसेंबर, २०१९
मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडे मोठी जबाबदारी? काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता
मुंबई प्रतिनिधी : 23 डिसेंबर 2019
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू असताना काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांची आधी मंत्रिपदासाठी चर्चा होती. मात्र आता काँग्रेसकडून त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन एक महिना पूर्ण होत आला तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. खातेवाटपावरून काँग्रेसमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. कारण विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात सामावून घेताना कोणतं खातं द्यायचं, असा पेच काँग्रेससमोर निर्माण झाला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसकडून अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम ठेवायची की पृथ्वीराज चव्हाण यांना नेमायचे याबाबत अजून अंतिम निर्णय येणं बाकी आहे.निवडणुकांचे बिगुल वाजले : अहमदनगर जिल्ह्याचे पुन्हा वातावरण तापणार
अहमदनगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष कोण होणार याची चुरस असतानाच सहकारी सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
महाविकास आघाडी झाल्यानंतर ची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत आता नेमके सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक कार्यकर्ते एकत्र येऊन आघाडी करतात का गे पाहणे औसुक्याच ठरणार आहे.
या सोसायट्यांचा मतदार यादीचा कार्यक्रम प्रसिध्द झाला आहे. त्यानुसार प्रारूप याद्या जाहीर करण्यात आल्या असून या प्रारूप यादीवर हरकत घेण्यासही 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या हरकतींवर जिल्हा उपनिबंधक 9 जानेवारीला निर्णय देतील.
अंतिम मतदार यादी 14 जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर कोणत्याहीक्षणी या सोसायट्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील.
संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी, वाघापूर, कौठे धांदरफळ, मंगळापूर, सुकेवाडी, घुलेवाडी, जाखुरी, कोंची.
राहाता तालुक्यातील पुणतांबा, पुणतांबा विभाग बागाईतदार, माऊली, वाळकी, स्व. बाबुराव किसनराव कडू पाटील.
राहुरी तालुक्यातील निंभेरे, चंडकापूर, अंमळनेर. नेवासा-गोमळवाडी, मुकिंदपूर, नाथकृपा (वाटापूर).
शेवगाव- लखमापूरी, ढोरजळगाव, राणेगाव, अंतरवली खुर्द, ठाकूर पिंपळगाव, शेवगाव, बक्तरपूर.
नगर- दशमी गव्हाण, मदडगाव, बाभळेश्वर(बाळेवाडी),
श्रीगोंदा- शिरसगाव, मुंगूसगाव, हनुमान (माठ), पांडवगिरी (निंबवी), वडगाव शिंदोडी, हनुमान, (भावडी)गव्हाणेवाडी, गणेश (पिसोरे खांड), हंगेश्वर (चिंभळे),शिवशंकर (यवती) सिंध्दनाथ (सांगवी दु.), भाऊसाहेब शिपलकर (शिपलकर), अजिंक्य (काष्टी), विठ्ठल (निमगाव खलू). श्रीगोंदा-शहाजापूर, रूईछत्रपती, घाणेग़ाव-गटेवाडी, वडनेर हवेली, काळकूप.
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...