शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

तर तुही अविवाहित राहून माझ्या सारखीच समाजसेवा केली असती ! : अण्णा हजारे

कुमजाई पर्व अहमदनगर टीम : 

ज़्येष्ठ समाज़ेसवक अण्णा हज़ारे यांच्या आंदोलनास पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी पाठिंबा दिला आहे. देशामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढल्याने दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशातील जनतेच्या रोषामुळे कायद्यात बदल झाला होता.

परंतू आजही दोषींना फाशी झालेली नाही, जलदगती न्यायालयात किमान सहा लाखांहून अधिक खटले प्रलंबित असून, अनेक महिला पीडितांना न्याय मिळालेला नाही. त्यांना न्याय मिळावा, या व इतर मागण्यांसाठी अण्णांचे मौन आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आ. लंके हे नागपूर अधिवेशन संपवून अण्णांच्या भेटीला आले व अण्ण्णांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली परंतू माझ्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय व निर्भया प्रकरणातील दोषींना शिक्षा झाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नाही, असे सांगत अण्णा त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे अण्णांनी आपल्या लिखित संदेशात आ. लंके यांना सूचित केले.

कोट्यवधी रुपये खर्चून जनजागृती होणार नाही, ती या आंदोलनाने होईल, असा विश्वास अण्णांनी व्यक्त केला. माझा मतदारसंघ हा अण्णांचा मतदारसंघ असून, माझ्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अण्णा तुमचा आशीर्वाद हवा आहे, अशी विनंती या वेळी आ.लंके यांनी केली असता, अण्णांनी विधायक कामात मी तुझ्याबरोबर नेहमीच असणार, मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर तुम्ही विधिमंडळात व मी बाहेरून तालुक्याच्या प्रश्नांसाठी नेहमी तुमच्याबरोबर राहील, असा शब्द अण्णांनी दिला.


माझ्यासारखा तुही फकीर गडी आहेस, दहा वर्षापूर्वी तू मला भेटला असता तर तुही अविवाहित राहून माझ्या सारखीच समाजसेवा केली असती. स्वत:च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून ज़नतेची सेवा करत आहे. तुम्ही स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या, पारनेरचा पाणीप्रश्न व इतर ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी तालुक्याला तुमच्या सारख्या फकीर माणसाची गरज आहे.

मतदारसंघातील प्रश्न तुम्ही सोडवू शकता, असा वडिलकीचा सल्लाही अण्णांनी आ. लंके यांना दिला. तालुक्याच्या पाणीप्रश्नासह विविध विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळून तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाठपुरावा करू,असा शब्द आ. लंके यांनी अण्णांना दिला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...