शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

30 डिसेंबरला ठाकरे सरकारमधील कोण कोण घेणार मंत्री पदाची शपथ :

मुंबई : कुमजाई पर्व प्रतिनिधी

राज्यात ठाकरे सरकारची सत्तास्थापन झाली. मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर 30 डिसेंबरला हा मंत्रिंडळ विस्तार होणार आहे. विधान भवनाच्या प्रांगणात या मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्री सोमवारी शपथ घेणार आहेत. दरम्यान, यामध्ये एकूण 36 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. याआधी 30 मंत्री शपथ घेतील अशी चर्चा होती.

कोण आहेत मंत्रिमंडळातील संभाव्य चेहरे-

शिवसेना- रविंद्र वायकर, तानाजी सावंत,संजय राठोड, गुलाबराव पाटील, सुनील राऊत, अनिल परब, शंभुराज देसाई, प्रकाश आबिटकर, डाॅ.संजय रायमुलकर, उदय सामंत, अनिल बाबर, नीलम गोर्हे.

राष्ट्रवादी- अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ , नवाब मलिक, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, मकरंद पाटील, राजेश टोपे, अनिल पाटील, धर्मारावबाबा आत्राम, दत्ता भरणे , संजयमामा शिंदे.
तरूण चेहरे म्हणून अदिती तटकरे आणि रोहीत पवार यांची नावे सुद्धा चर्चेत


काॅंग्रेस - अशोक चव्हाण, विजय वड्डेट्टीवार, के.सी पाडवी, संग्राम थोपटे, अमित देशमुख, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे , अमीन पटेल, सुनिल केदार, पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रीमंडळात समावून न घेता प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचा विचार करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...