शनिवार, २८ डिसेंबर, २०१९

कोरठण यात्रा नियोजनाची प्रशासकीय बैठक :कोरठणला जोडलेल्या कान्हूरपठार ते कोरठण, पिंपळगाव रोठा ते अक्कलवाडी, नांदूरपठार, राष्ट्रीय महामार्ग ते पिंपळगाव रोठा रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करा :अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड

पारनेर /प्रतिनिधी : येथील पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा देवस्थानचा वार्षिक यात्रोत्सव दि.10 जानेवारीपासून सुरू होत असून तो दि.12 पर्यंत चालणार आहे. या संदर्भात यात्रेच्या नियोजनासाठी प्रशासन देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ यांची प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थान येथे बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांनी यात्रेसंबंधी संबंधित विभागांना सूचना दिल्या.
यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, पोलिस उपनिरीक्षक बी. यु. पद्मणे, यात्रासमितीचे अध्यक्ष किसन धुमाळ, विश्‍वस्त महेंद्र नरड, दिलीप घोडके, हनुमंत सुपेकर, अश्‍विनी थोरात, बन्सी ढोमे, किसन मुंढे, देवीदास क्षीरसागर, गोपीनाथ घुले, भगवान भांबरे, मोहन रोकडे, बबन झावरे, उपसरपंच बाळासाहेब पुंडे यांच्यासह एस टी., सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य, ग्रामीण पाणी पुरवठा, अग्निशमन, महावितरण, बीएसएनएल, जि.प.सार्वजनिक बांधकाम आदी विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
भाविकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी कोरठणला जोडलेल्या कान्हूरपठार ते कोरठण, पिंपळगाव रोठा ते अक्कलवाडी, नांदूरपठार, राष्ट्रीय महामार्ग ते पिंपळगाव रोठा रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याबाबत तसेच रस्त्याच्या कडेला असणारी झुडुपे तोडणे, दिशादर्शक फलक लावणे, गारखिंडी घाटात संरक्षक कठडे बसविण्याबाबत सूचना देण्यात आल्या.यात्रेत व्यवस्थापन कक्ष स्थापन करून यात्रेशी संबंधित विभागांनी येथून नियंत्रण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...