रविवार, २९ डिसेंबर, २०१९

पारनेरमध्ये 14 लाखांची दारू जप्त : उत्पादनची शुल्कची कारवाई जिल्ह्यात 5 पथकांची नियुक्ती

कुमजाई पर्व ऑनलाइन : नगर 

पारनेर तालुक्‍यातील गव्हाणेवाडी, दाणेवाडी येथे हातभट्टी निर्मीत केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून 5 हजार 700 लिटर रसायन नष्ट केले. तर वाळवणे व टाकळी ढोकेश्‍वर येथे अवैध देशी-विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून 14 लाख 13 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी संजय मारुती कार्ले, आप्पासाहेब मारुतराव काळे व सुनिल हनुमंत दाते यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशी-विदेशी दारु, हातभट्टी गावठी दारू, दोन चारचाकी अशी एक दुचाकी जप्त करण्यात आली. 

नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठा जल्लोष केला जातो.
त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करडी नजर ठेवण्यात येत असून जिल्ह्यात 5 पथके व 2 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पार्टी व इतर कार्यक्रम होत असतात.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...