रविवार, २९ डिसेंबर, २०१९

आ.शंभूराज देसाई यांना संसदीय कार्यमंत्रीपद ?

कुमजाई पर्व ऑनलाइन : 

कोयनानगर (ता.पाटण ) : मंत्रींमंडळाचा विस्तार उद्या 30 डिसेंबरला होत आहे.त्यावेळी शिवसेना , राष्ट्रवादी कॉंग्रेस , कॉंग्रेस या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे.

महाविकास आघाडीच्या नव्या सरकारमध्ये उत्कृष्ट संसदपट्टु असणाऱ्या पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभुराज देसाई यांना संसदीय कार्य विभागाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

देसाई हे तीन टर्म आमदारअसून मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीत त्यांचे नाव आग्रस्थानी असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपा-शिवसेना या युती सरकारच्या काळात देसाई यांचे तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर असलेले मैत्रीपूर्ण सबंध हे सर्वश्रुत आहेत.

युती सरकारच्या काळात भाजपा शिवसेना मधील सबंध ताणले गेल्यावर या दोन्ही राजकीय पक्षाशी संवाद साधून त्यांच्यातील विसंवाद दूर करण्याची जबाबदारी देसाई यांच्यावर होती. या संबंधाच्या जोरावर त्यांनी आपल्या पाटण या मतदारसंघात सर्वात जास्त निधी आणला आहे.

कॉंग्रेस पक्षाचे जुने जाणते करारी नेते माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शंभुराज हे नातू असून बाळासाहेब देसाई यांनी यापूर्वी महसूल , शिक्षण , ग्रूह , क्रुषि खाते सांभाळून त्यांना लौकिक प्राप्त करून दिला होता.करारी आजोबाचा करारी नातू अशी ओळख शंभुराज यांची आहे.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शंभुराज देसाई या दोघांना उत्कृष्ट संसदपट्टु या पुरस्काराने वीस वर्षांपूर्वी गौरविण्यात आले आहे. वीस वर्षांपासून या दोघांचे मैत्रीचे सबंध आहेत. विधानसभेच्या विविध अयुधाचा वापर करून तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे.

आमदारकी छाया पहिल्याच टर्म मध्ये उत्कृष्ट संसदपट्टु तर दुसऱ्या टर्म मध्ये शिवसेना पक्षाचे प्रतोद व पाच वेळा विधानसभेचे तालिका अध्यक्ष उत्कृष्ट रित्या त्यांनी संभाळले आहे.आघाडी शासनाच्या कारकिर्दीत हर्षवर्धन पाटील यांनी तर युती सरकार मध्ये गिरीष बापट यांनी संसदीय कार्यमंत्री हे पद सांभाळले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...