गुरुकुल मंडळातर्फे आयोजित शिक्षक साहित्य संमेलनात नगर जिल्ह्यातील उपक्रमशील शाळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ज्या शाळांची पुरस्कारासाठी निवड झाली, त्यांची आज संयोजन समितीने घोषणा केली. राज्य सरकारच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजना समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते या शाळांचा रविवारी (दि.२९ )रोजी संमेलनात सन्मान होईल, अशी माहिती संयोजकांनी दिली.
जिल्ह्यातील साडेतीन हजार शाळांचे सर्वेक्षण करून त्यातून 28 शाळांची पुरस्कारासाठी निवड केली. त्यामध्ये निवड झालेल्या शाळा पुढीलप्रमाणे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जेऊर (ता. नगर), पिंपरखेड (ता.जामखेड), गारखिंडी (पारनेर), रवंदे (ता. कोपरगाव), त्रिंबकपूर (ता. राहुरी), माळवाडगाव (ता. श्रीरामपूर), निमगाव गांगर्डा व दुधोडी (ता. कर्जत), अरणगाव दुमाला व अजनूज (ता. श्रीगोंदे), कळस व गर्दणी (ता. अकोले), पिंपरकणे (पेसा, ता. अकोले), न. पा.वाडी व एकरूखे (ता. राहाता), धांदरफळ खुर्द व निळवंडे (ता. संगमनेर), चिलेखनवाडी (ता. नेवासे), कोळगाव (ता. शेवगाव), हनुमाननगर (मोहोज) व माने वस्ती (ता. पाथर्डी), लोणी खुर्द (ता. राहता), शेवगाव मुली (उर्दू), ओंकारनगर (महापालिका, अहमदनगर), येवले वस्ती (नगरपालिका, ता. राहुरी).याशिवाय गर्द झाडी आणि पर्यावरण रक्षणासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या वाघोली (ता. शेवगाव), केळेवाडी (ता. संगमनेर) या शाळांना "गुरुकुल पर्यावरणरक्षक शाळा पुरस्कार', तसेच वर्षभरात एकही दिवस सुटी न घेणाऱ्या व इस्रो विज्ञान सहलीत नियमित यश मिळविणाऱ्या पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन या शाळेस "स्वामी विवेकानंद गुरुकुल विशेष शाळा पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.
यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, असे बापू लहामटे, उस्मान तांबोळी, संतोष भोपे, शिवाजी नवाळे, आरिफ बेग व समितीमधील सदस्यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा