पारनेर कुमजाई पर्व प्रतिनिधी
28 डिसेंबर :-
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या,अहमदनगर जिल्हयातील पारनेर तालुक्यातील पिंपळगांवरोठा येथील स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान या राज्यस्तरीय ब वर्ग तिथेक्षेत्रावर वार्षिक यात्रा महोत्सव १० ते १२ जानेवारी २०२० च्या दरम्यान मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने भरणार आहे.३ दिवसांच्या यात्रेला ६ लाखांवर यात्रेकरु,कुलदैवत खंडोबाच्या कोरठण गडावर देवदर्शन व तळीभंडार करतात.कोरठणच्या यात्रेच्या तयारीस प्रारंभ झाला असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.या यात्रेच्या तयारीला प्रारंभ झाला असून यात्रा महोत्सवाचे माहितीपत्रक देवाच्या चरणी अर्पण करून भाविकांना पाठविण्यास सुरुवात झाली आहे.नववर्षातील जिल्ह्यातील ही पहिली मोठी यात्रा असुन, धार्मिक व सामाजिक संस्कृती जोपसणा री लाखो भाविकांच्या,भक्तीमय मांदीयाळीचे दर्शन घडविणारी यात्रा म्हणुन या यात्रेचे महत्व आहे.पौष पौर्णिमेला श्री खडोबाचे म्हाळसादेवी बरोबर लग्न झाले म्हणून दरवर्षी पौष पौर्णि मेला ३ दिवस मोठा यात्रोत्सव येथे भरतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा