मंत्रिमंडळ विस्तारात कॉंग्रेसचे पुण्यातील आमदार संग्राम थोपटे यांचे नाव मागे पडल्याचे वृत्त असून त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काल दिवसभर माध्यमात ते मंत्री होणार असल्याची चर्चा होती.
भोर मतदारसंघातून संग्राम थोपटे हे गेली तीन टर्म निवडून येतात. राज्यात कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर आल्याने ते मंत्री होणारच अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती. आजच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी थोपटे यांचे समर्थक मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले होते मात्र, अर्ध्या वाटेवरच त्यांना धक्का देणारा निरोप आला तो म्हणजे संग्रामदादा मंत्री होणार नाहीत म्हणून !
ही बातमी कानावर पडताच अर्ध्यावाटेवरून संतप्त झालेले कार्यकर्ते माघारी फिरले आणि थेट मतदारसंघ गाठला.
यावेळी संधी हुकणार नाही. संग्रामदादा मंत्री होणारच ही आशा मनी बाळगून असलेल्या कार्यकर्त्यांचा आनंद आणि उत्साह काही वेळच टिकला आणि वाटेला आला तो संताप. या सर्व घडामोडीवर मात्र आमदार थोपटे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आजच्या विस्ताराच्या पार्श्वभूमी कॉंग्रेसमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. आता संग्राम थोपटे कोणती भूमिका याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा