सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

मंत्रिमंडळ विस्तार - राष्ट्रवादीचे 14, शिवसेनेचे 12, तर काँग्रेसचे 10 मंत्री, पाहा संपूर्ण यादी

मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारामध्ये राष्ट्रवादीचे 14, शिवसेनेचे 12, तर काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सर्व मंत्र्यांची यादी 'टीव्ही9 मराठी'च्या हाती आली आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार  आहेत.

विस्तारामध्ये राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली आहेत. आतापर्यंत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे 16-14-12 अशी मंत्रिपदं आहेत

राष्ट्रवादीचे मंत्री

अजित पवार (उपमुख्यमंत्री)
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
अनिल देशमुख
हसन मुश्रीफ
राजेंद्र शिंगणे
नवाब मलिक
राजेश टोपे
जितेंद्र आव्हाड
बाळासाहेब पाटील
दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री)
आदिती तटकरे (राज्यमंत्री)
संजय बनसोडे (राज्यमंत्री)
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री)

शिवसेनेचे मंत्री

संजय राठोड
गुलाबराव पाटील
दादा भुसे
संदीपान भुमरे
अनिल परब
उदय सामंत
शंकरराव गडाख
आदित्य ठाकरे
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री)
शंभराजे देसाई (राज्यमंत्री)
बच्चू कडू (राज्यमंत्री)
राजेंद्र येड्रावकर (राज्यमंत्री)

काँग्रेसचे मंत्री

अशोक चव्हाण
विजय वडेट्टीवार
वर्षा गायकवाड
सुनिल केदार
अमित देशमुख
यशोमती ठाकूर
अस्लम शेख
के. सी. पाडवी
सतेज पाटील (राज्यमंत्री)
विश्वजीत कदम (राज्यमंत्री)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...