सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

पारनेर धक्कादायक : ग्रामसेवक व तलाठ्याने गावाला अंधारात ठेऊन निवडला ग्रामपंचायत सदस्य!


कुमजाई पर्व ऑनलाइन

पारनेर : ग्रामसेवक व तलाठ्याने ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची एक जागा बिनविरोध केली, असा आरोप करत तालुक्‍यातील मांडवे खुर्द येथील सरपंचाने तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.मांडवे खुर्दच्या प्रभाग क्रमांक एकमधील एक जागा इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होती . या जागेवर मागील निवडणुकीत विजयी झालेल्या महिलेने जातीचा पुरावा वेळेत दाखल न केल्याने तिचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते . त्यामुळे तेथे पोटनिवडणूक जाहीर झाली होती. मात्र, हा निवडणूक कार्यक्रम गावाला माहीत झालाच नाही.ग्रामसेवक व तलाठी यांनी सरपंचासह ग्रामस्थांना याबाबत अंधारात ठेवले. कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ग्रामसेवक व तलाठ्याने गावातील काही जणांना हाताशी धरून परस्पर केवळ एका महिलेचा अर्ज भरून घेतला आणि या जागेवर संबंधित महिला बिनविरोध विजयी झाल्याचे जाहीर केले, अशी तक्रार सरपंच जिजाबाई हारदे व उपसरपंच राहुल जाधव यांनी केली आहे. त्यामुळे तेथील ग्रामपंचायत पोटनिवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...