कुमजाई पर्व ऑनलाइन : पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कोरठणगड , पिंपळगावरोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवाची नववर्षाच्या प्रारंभी म्हणजे १ जानेवारी २०२० रोजी हाळद लावली जाणार आहे . वाद्यवृंदांच्या मंजुळ स्वरात सनई चौघडा ढोल ताशांच्या गजरात हजारो महिला भाविक भक्तांसह पिंपळगावरोठा गावातून काढण्यात येणाऱ्या भव्य मिरवणुकीत सकाळी ११ वाजटा श्री क्षेत्र कोरठण आणि पंचक्रोशीतील हजारो महिला भाविक भक्तांच्या उपस्थितीत वेदमंत्रांच्या जयघोषात कुलदैवताला हळद लावण्यात येणार आहे . या पार्श्वभूमीवर दि . १० आणि १२ जानेवारीला यात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान प्रतिजेजुरी म्हणून नावारुपाला आले आहे . महाराष्ट्र राज्य शासन ब वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेले हे देवस्थान पर्यटन क्षेत्रात वाटचाल करत आहे . महिला , माता भगिनी , भाविक - भक्त , ग्रामस्थ यांनी हळदी सोहळ्यास उपस्थित राहून या भक्तिभाव सोहळ्याचा आनंद घ्यावा , असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड , उपाध्यक्ष गंगाराम बेलकर , सरचिटणीस महेन्द्र नरड , चिटणीस मनिषा जगदाळे , खजिनदार हनुमंत सुपेकर , विश्वस्त किसन मुंढे , अश्विनी थोरात , चंद्रभान ठुबे , मोहन घनदाट , अमर गुंजाळ , किसन धुमाळ , बन्सी ढोमे , दिलीप घोडके , साहिबा गुंजाळ , देविदास क्षीरसागर सर्व आजी - माजी विश् वस्त आणि ग्रामस्थांनी केले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा