मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

`शिवसैनिकांनो स्वभाव बदला' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना पुण्यातून रक्ताने लिहिलेले पत्र!

शिक्रापूर - शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना मंत्रीपद देण्याच्या मागणीसाठी युवासेनेच्या शिरुरच्या बापूसाहेब शिंदे यांनी आपल्या रक्ताने लिहीलेले पत्र नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. `आपण सत्तेत आलोय, आता आपला स्वभाव बदला' असे चारच दिवसांपूर्वी पुण्यात येवून जाहिरपणे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आता शिवसैनिकांचे असे आक्रमक स्वभाव बदलण्याचे आव्हान असणार आहे.

राज्याच्या राजकारणात एकदमच अनपेक्षित अशी महाआघाडी अस्तीत्वात येवून सत्तेच्या खुर्चित कधीच न बसलेले ठाकरे कुटुंबीयांमधील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने संपूर्ण राज्यातील शिवसैनिका प्रचंड आनंदीत आहेत.

अर्थात हे होताना आपापला नेता मंत्री होईल अशी सर्वच शिवसैनिकांना अपेक्षा असताना शिवसैनिकांचा आक्रमक स्वभाव या मागण्यांतून व्यक्त होणे अनपेक्षित नाहीच. मात्र हा स्वभाव बदलण्याची गरज असल्याचे स्वत: उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात जिल्हाप्रमुख माऊली कटके यांना सांगितले आणि त्याच पुणे जिल्ह्यातील एका युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने पुणे जिल्ह्यासाठी शिवसेनेला मंत्रीपद द्या आणि ते उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना द्या असे म्हणत ही मागणी आपल्या रक्ताने लिहून हे पत्र थेट उद्धव ठाकरेंना पाठविले.

या पत्राची चर्चा सध्या सोशल मिडीयात चांगलीच असली तरी अशा प्रकारांमुळे शिवसैनिक आता स्वभाव बदलणार का आणि तो कसा बदलनार असा प्रश्न खुद्द ठाकरेंनाही पडणार आहे.

मुळात शिंदे यांची मागणी योग्य आहे, व्यवहार्य आहे हे नाकारुन चालणार नसली तरी मंत्रीपद देण्याचा निर्णय शिवसेनेसाठी एवढा सोपा नाही. तीन पक्षांच्या आघाड्या, प्रत्येक पक्षातील नेत्याचे, त्याच्या जिल्हा-तालुक्यातील राजकारणाचा या मंत्रीपदाशी थेटपणे परिणाम हे सगळेच मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांना संभाळावे लागणार आहे.

आक्रमकपणे भावना मांडणाऱ्या शिवसैनिकांनी दबाव म्हणून असे प्रकार पक्षालाही अडचणीचे ठरणारे आहे हेही या निमित्ताने शिवसैनिकांच्या गळी उतरावे लागण्याचे आव्हान शिवसेना नेत्यांवर आहे. पर्यायाने शिंदे यांच्या पत्राची दखल म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कशी घेतात यापेक्षा अशा पत्रांची दखल घेऊन शिवसैनिकांनो आता स्वभाव बदला असे पुण्यात येवून म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी पुण्यातूनच रक्ताने लिहील्या गेलेल्या पत्रामुळे शिवसैनिकांची कार्यशाळा घेण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...