सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

मुंबईकरांचं आता तरी भलं होणार का ? एकट्या मुंबईतून ५ कॅबिनेट मंत्री!

मंत्रिमंडळ विस्तारात तब्बल ३६ मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. विधानभवनाच्या प्रांगणात हा शपथविधी होता. या ३६ मंत्र्यांमध्ये तब्बल २६ मंत्री कॅबिनेट दर्जाचे असून १० मंत्री हे राज्यमंत्री दर्जाचे आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील मंत्र्यांची एकूण संख्या ४३वर गेली आहे. याआधी मुख्यमंत्र्यांसोबत एकूण ६ मंत्र्यांचे शपथविधी झाले होते. आता त्यात ३६ मंत्र्यांची भर पडली आहे. मात्र, मुंबईकरांसाठी यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकूण ५ कॅबिनेट मंत्री हे मुंबईचे आहेत. शिवाय मुंबईचं उपनगर असलेल्या ठाण्यातून जितेंद्र आव्हाड हे कॅबिनेट मंत्री झाले आहेत.त्यामुळे मुंबईकरांसाठी एकूण ६ मंत्री आता थेट राज्याच्या कॅबिनेटमध्ये काम करताना दिसणार आहेत.

मुंबईकर मंत्री!

१) नवाब मलिक
२) अनिल परब
३) वर्षा गायकवाड
४) असलम शेख
५) आदित्य ठाकरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...