पाटण / कराड प्रतिनिधी :-
| महाविकासाआघाडीचा गाभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला आज मंत्रिमंडळ विस्तारात फक्त दोनच मंत्रिपदावर समाधान मानावे लागले आहे. सातारा जिल्ह्याला ४ मंत्रीपदे दिली जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने १ आणि शिवेसेनेने १ मंत्रिपद साताऱ्याला दिले आहे.सातारा जिल्ह्यातुन कॉंग्रसचे एकमेव आमदार असलेले पृथ्वीराज चव्हाण यांना या मंत्रामंडळ विस्तारातुन डावलले गेले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मकरंद पाटील यांनाही या विस्तारात संधी देण्यात आली नाही.
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब उर्फ शामराव पांडूरंग पाटील यांना आज कॅबिनेट मंत्रिपदाची आज शपथ देण्यात आली.
शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांना आज राज्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. पाटण विधानसभा मतदार संघाचे तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. सन 2004 मध्ये शिवसेनेतून निवडणूक लढवून ते पहिल्यांदा निवडून आले होते. याच काळात आमदार देसाई यांना उत्कृष्ट संसदपट्टू म्हणून गौरवण्यात आले.सन 2009 मध्ये त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर देसाई यांनी पून्हा सन 2014 व सन 2019 मधील निवडणूकांमध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून येण्याची किमया साधली. सन 2014 ते 2019 या कालावधीमधील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारच्या काळात आमदार देसाई यांना मंत्रीपदाची संधी मिळू शकली नव्हती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा