मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

शेतकऱ्यांसाठी व्हेजिटिबेल क्‍लस्टर उभारणार : माजी खासदार आढळराव पाटील यांची माहिती

पुणे कुमजाई पर्व प्रतिनिधी : 

माजी खासदार आढळराव पाटील यांची माहिती

शिरूर- शिरुर, खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्‍यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी व्हेजिटिबेल क्‍लस्टर उभारण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दिली. शिरुर येथे आढळराव यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माऊली कटके, तालुकाप्रमुख सुधीर फराटे, अनिल काशिद, पोपटराव शेलार, मयूर थोरात, विजया टेमगिरे, शैलेजा दुर्गे, अनघा पाठकजी आदी उपस्थित होते.

सेंद्रिय शेती पद्धतीने भाजीपाला पिकवून हा भाजीपाला निर्यातही करु शकतो.यासंदर्भातील चार तालुक्‍यातील माती व अन्य बाबीच्या अभ्यास केला जात आहे. किल्ले शिवनेरीवर संग्रहालय व्हावे, याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. पुणे- नाशिक व पुणे- नगर रस्त्यावरील वाहतूक व रहदारीच्या प्रश्‍नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. थेऊर येथील बंद असलेल्या यशवंत साखर कारखान्याच्या प्रश्‍नांबाबतही लवकरच बैठक लावण्यात येणार आहे.

जुन्नर येथे शिवसृष्टी निर्माण करणे, वढू येथे शंभूसृष्टी व शिवनेरीवर रोप वे तयार करावा, याबाबत खासदारकीच्या कार्यकाळात मागणी केली होती. सरकारनेही या मागण्या संदर्भात प्रतिसाद दिला आहे. पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढता वावर असल्याचा पार्श्‍वभूमीवर 1 हजार हेक्‍टर क्षेत्रावर बिबट सफारी पार्क तयार करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याला प्रगतिपथावर नेतील, असा विश्‍वास व्यक्‍त करून आढळराव पाटील म्हणाले की, बुलेट ट्रेनपेक्षा पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांसाठीच्या योजना महत्वाच्या आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेवून शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. इतर पक्षांशी आघाडी आहे म्हणून चुकीच्या बाबीसंदर्भात गप्प बसणार नाही. चुकीच्या बाबींना विरोध करू. भाजपसमवेत युती असतानाही चुकीच्या गोष्टींना विरोध केल्याचे आढळराव यांनी सांगितले.


शिरुर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी प्रामाणिकपणे भाजपाच्या उमेदवाराचे काम केले. याउलट भाजपाने खेडमध्ये उमेदवार उभा केला व जुन्नरमध्ये अपक्ष उमेदवाराला पाठबळ दिले असा टोला त्यांनी भाजपला लगावला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...