संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१
*सातारा : 119 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु*
शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१
*सातारा :182संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु*
तळमावले : शिवसमर्थ ची वाटचाल अभिमानास्पद- उद्योजक नितीन बुचडे
शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१
*सातारा : 130 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु*
गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१
सातारा : कोरोना संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रणासाठीजिल्हाधिकारी यांचे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला आदेश कोरोना विषाणू प्रभावित क्षेत्रातून आलेल्या प्रवाशांची लक्षणे असल्यास त्वरीत व लक्षणे नसल्यास 5 ते 14 दिवसामध्ये आरटीपीसीआर व आरएटी टेस्ट (RTPCR, RAT TEST) करणे अनिवार्य
सातारा :लग्न समारंभास 100 व्यक्तींनाच परवानगी - जिल्हाधिकारी
कुंभारगाव : विश्वकर्मा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
अष्टा र्विशति में जातो विशवकर्मा भवनि च॥धर्मशास्त्रानुसार मग शुक्ल त्रयोदशीला भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी केली जाते.
आज दि २५ फेब्रुवारी २०२१ गुरूवार विश्वकर्मा भवन कुंभारगाव ता.पाटण या ठिकाणी कोविड च्या महामरीमुळे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून विश्वकर्मा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.सकाळी 10 वाजता विश्वकर्मा प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर दुपारी 12 वाजता भगवान विश्वकर्मा यांची जन्मवेळ असल्याने तेव्हा फुलांचा कार्यक्रम झाला.
त्यानंतर कोळे ता कराड येथील जिजाऊ अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ आणि मास्क वाटप करून समाजहिताचे काम करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वकर्मा प्रतिष्ठान कुंभारगाव चे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव, खजिनदार, महिला मडंळ, युवा कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी कष्ट घेतले.यावेळी श्री.अजित सुतार , श्री पांडुरंग सुतार , श्री शशिकांत दिक्षित, श्री सुनील धर्मधिकारी, श्री संदिप पोतदार , श्री लक्ष्मण तात्या सुतार वसंतराव पतंगे, श्री प्रा सचिन पुजारी सर , श्री ओंकार देशमुख,अक्षय पोतदार उपस्थित होते
*सातारा :111 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु*
कराड : स्वानंद कुलकर्णी यांना सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डॉक्टरेट पदवी.
बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१
सातारा : आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इ. ठिकाणीकठोर नियम लागु : जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी
सातारा : आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्काराचा सोहळाकोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे रद्द
सातारा : 204 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु
पाटण नगरपंचायत : वर्चस्व पाटणकर गटाचेच : चारही निवडी बिनविरोध
पाटण नगरपंचायत : वर्चस्व पाटणकर गटाचेच
पाटण / प्रतिनिधी : पाटण नगरपंचायत विविध विषय सभापती पदांच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. या निवडीत चारही सभापतींपदी राष्ट्रवादी काँग्रेस तथा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर गटाच्याच पदाधिकार्यांची वर्णी लागली.
सोमवारी येथील नगरपंचायत कार्यालयात पिठासिन तथा उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या उपस्थितीत निवडी झाल्या.प्रत्येक सभापती पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने सर्वच निवडी बिनविरोध पार पडल्या. यामध्ये पाणीपुरवठा सभापतीपदी उपनगराध्यक्ष विजय उर्फ बापू टोळे, महिला व बालकल्याण सभापती सौ. रश्मी राजेंद्र राऊत, नियोजन विकास व शिक्षण सभापती सौ. योगिता रामचंद्र कुंभार, बांधकाम सभापती किरण पवार व स्थायी समिती सभापती पदावर व नगराध्यक्ष अजय कवडे यांची निवड झाली. या निवडीनंतर श्रीरंग तांबे व अभिषेक परदेशी यांनी नवनिर्वाचीत निवडी जाहीर करत मान्यवरांचे अभिनंदन केले. यावेळी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
नवनिर्वाचीत सभापतींचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे, तालुका दुध संघाचे चेअरमन शंकरराव जाधव, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजेश पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष सचिन कुंभार आदी मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, हितचिंतक व नागरिकांनी अभिनंदन केले.
मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१
यंदाचा खरीप हंगामासाठी महाराष्ट्राला मागणीप्रमाणे खत पुरवठा करावा
यंदाचा खरीप हंगामासाठी महाराष्ट्राला मागणीप्रमाणे खत पुरवठा करावा
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्रासाठी यावर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यक असणारा खत पुरवठा वेळेवर आणि मागणीप्रमाणे करावा, अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली.
कृषीमंत्री श्री.भुसे नवी दिल्ली येथील दौऱ्यावर गेले असून त्यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री श्री. गौडा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांबाबत त्यांनी चर्चा केली. राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यावेळी उपस्थित होते.राज्याला खरीप हंगामासाठी सुमारे 44.50 लाख मेट्रीक टन खताची आवश्यकता असून त्याचा पुरवठा केंद्राकडून केला जातो. खरीप हंगामासाठी जून आणि जुलै महिन्यात खताला मोठ्या प्रमाणावर मागणी असते.गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये जून ते ऑगस्ट या कालावधीत खत पुरवठा विस्कळीत झाला होता. यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्य शासन 2 लाख मेट्रीक टन युरियाचा अतिरिक्त साठा करणार असून विविध खतांची सुमारे 44.50 लाख मेट्रीक टन खत पुरवठ्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. खतांचा पुरवठा वेळेत व्हावा अशी विनंती श्री.भुसे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली. ज्या महिन्यामध्ये पिकाच्या गरजेप्रमाणे खताची मागणी आहे त्याप्रमाणे वेळेवर आणि पुरेसा खत पुरवठा व्हावा, असेही श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.
तळमावले :मान्याचीवाडी ला "तालुका सुंदर गांव" पुरस्कार जाहीर
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन ग्रामविकासात राज्यातील गावांनी योगदान दिल्यास महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील आदर्शवत खेडी निर्माण होण्यास मदत होईल. यासाठी गावोगावच्या सरपंचांनी पुढाकार घ्यावा.- रवींद्र माने - सरपंच आदर्श गाव मान्याचीवाडी
11 ग्रामपंचायतींना "तालुका सुंदर गांव" म्हणून घोषित*
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील धामणेर ता. कोरेगांव या ग्रामपंचायतीस सन 2018-19 मधील “जिल्हा सुंदर गांव” म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर सन 2019-20 मधील “तालुका सुंदर गाव” म्हणून अपशिंगे (मि.) ता. सातारा, शिरंबे ता. कोरेगांव, नागनाथवाडी ता. खटाव, गोंदवले खुर्द ता. माण, काळज ता. फलटण, गुठाळवाडी ता. खंडाळा, चांदवडी पुनर्वसन ता. वाई, चोरांबे ता. जावली, मांघर ता. महाबळेश्वर, गमेवाडी ता. कराड व मान्याचीवाडी ता. पाटण या 11 ग्रामपंचायतींना घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.) अविनाश फडतरे यांनी दिली.
पाटण ; धारेश्वर येथे कुमजाई पर्व अंकाचे प्रकाशन
सातारा : 36 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१
काळगाव : धामणीत सापडला मृत बिबट्याचा बछडा
कुमजाई पर्व /वार्ताहर
मनोज सावंत / धामणी
22 फेब्रुवारी 2021:-काळगाव ता.पाटण परिसरात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. दरम्यान अनेकदा बिबट्या शिकारीच्या शोधात असताना मृत झालेला आहे.
असाच काहीसा प्रकार पाटण तालुक्यात धामणी येथे घडला आहे. धामणी पासून जवळच असलेल्या आंबेवाडी शिवार परिसरातील ओढ्याच्या जवळ मृतावस्थेत बिबट्याचा बछडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील धामणी भागातील आंबेवाडी शिवारामध्ये एक मादी जातीचे 5 ते 6 महिने वय असलेले बिबट्याचा बछडा झुडपात मृतावस्थेत आढळून आले.
परिसरातील नागरिकांनी बिबट्याचा बछडा पाहिल असता ते मृत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाला भ्रमणध्वनीवरून ही माहिती दिली त्यानंतर वनक्षेत्रपाल विलासराव काळे,वनपाल सुभाष राऊत वनरक्षक विशाल डूबल,जयवंत बेद्रे,अमृत पन्हाळे, सुभाष पाटील, श्री. कुंभार, मुबारक मुल्ला,अमोल पाटील यांनी भेट देऊन मृत झालेल्या बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेऊन शवच्छेदन करण्यासाठी कराड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले.
सदर मृत बिबट्या बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, हा बिबट्या कुठल्या कारणाने मृत झाला हे शवच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच समजेल अशी माहिती वनरक्षक श्री सुभाष पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचार बंदीमहाविद्यालय व शाळांची अचानक होणार तपासणीसंपर्कात आलेल्या नागरिकांनी टेस्ट न केल्यास दाखल होणार गुन्हे - पालकमंत्री बाळासाहेब पाटील
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे01 मार्च पर्यंतचे सर्व नियोजित बैठका,कार्यक्रम रद्द !जनतेने शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन
रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१
महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का?
महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का?
मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का? हा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला थेट विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी थोड्याच वेळापूर्वी जनतेशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. लॉकडाऊन लावायचा की नाही याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही तर तुम्हीच मला द्या असंही मुख्यमंत्री म्हणाले.
पुढचे आठ दिवस त्यासाठी महत्वाचे असल्याचही मुख्यमंत्र्यांनी सुचित केलं आहे. म्हणजेच महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही याचा निर्णय पुढच्या आठ दिवसात होऊ शकतो. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते मास्कशिवाय फिरतील आणि ज्यांना तो नको आहे ते मास्क घालून फिरतील असं मुख्ममंत्री म्हणालेत.
उद्यापासून काही जिल्ह्यात लॉकडाऊन?
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आजच राज्यात सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, यात्रा, आंदोलनं, मोर्चे यावर पूर्णपणे बंदी घालत असल्याची घोषणा केली आहे. सोबतच जिथं गरज असेल तिथं बंधनं घालणं किंवा लॉकडाऊन जाहीर करण्याची सुचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. अमरावती, यवतमाळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याचं ठाकरे म्हणाले. त्यानंतर तिथं लॉकडाऊन करायचा असेल तर अधिकाऱ्यांनी अचानक घोषणा न करता जनतेला चोवीस तास द्यावेत असंही म्हणाले. अचानक घोषीत केलेला लॉकडाऊन हा घातक असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळेच उद्या रात्रीपासून काही जिल्ह्यात लॉकडाऊन किंवा तशा स्वरुपाची काही कडक बंधनं लादली जाऊ शकतात. विशेषत: विदर्भात जिथं स्थिती गंभीर आहे."कोरोना आता पुन्हा डोकं वर काढतो आहे. आपण थोडं फिरायला लागलो. लग्नावरची बंधनं अजूनही आहेत. हे उघडा ते उघडा म्हणणारे कोरोनाची शिस्त मोडू शकत नाही. समजुतदारपणे सुचनांचं पालन करा. सगळ्यांना वाटलं कोरोना गेला, पण तसं नाहीये. कोरोनाची लाट खाली जाते, वर जाते पण खाली जाते त्याच वेळेस या लाटेला थांबवायचं असतं."दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. नियमांमध्ये शिथिलता झाल्यानंतर रस्त्यांसह सर्वच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे आणि कोरोनाबाबत इतर खबरदारी न घेतल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आगामी काळातही असंच चित्र राहिल्यास सरकारकडून लॉकडाऊनचा कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो.
सातारा : 53 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१
सौ.रेश्मा डाकवे यांना माॅंसाहेब जिजाऊ पुरस्कार जाहीर
*सातारा ; 70 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु*
कुंभारगाव : श्री चंद्रकांत चाळके साहेबांनी सामाजिक बांधीलकी जपत केला वाढदिवस साजरा
कुंभारगाव : श्री चंद्रकांत चाळके साहेबांनी सामाजिक बांधीलकी जपत केला वाढदिवस साजरा
कुंभारगाव, प्रतिनिधी । कुंभारगाव ता.पाटण दि.19 युवा नेते चंद्रकांत चाळके साहेब यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते .यामध्ये दि.१२ फेब्रुवारी रोजी बदलापूर येथील आनाथ आश्रमातील मुलांना शालेय उपयोगी वस्तू ,ब्लॅंकेट, फळे वाटप ,घणसोली येथे जिद्दी मराठा प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने भव्य क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते.
कुंभारगाव,चाळकेवाडी,चिखलेवाडी,गलमेवाडी,शेंडेवाडी परिसरातील गरजू कुटुंबांना गृह उपयोगी व किराणा साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.यावेळी डॉ.दिलीपराव चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात चंद्रकांत चाळके यांनी सातत्याने चालविलेल्या सामाजिक उपक्रमांबाबत त्यांचे कौतुक केले.यावेळी सरपंच सौ.नंदा चाळके उपसरपंच भरत चाळके आणि ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाम्रस्थांना गरजेच्या काळात जीवनावश्यक मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसुन येत होते.त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे .शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१
शिवसमर्थ इस्लामपूर शाखेचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात
पाटण तालुक्यातील 155 विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन ई- भूमिपूजन तालुक्याला निधीची कमतरता पडू देणार नाही, दर्जेदार काम करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१
सातारा ; सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास पोलीस कारवाई करणार- गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई
तळमावले : लाॅकडाऊनमध्ये ‘पाण्या’ने जगवले
*सातारा :94संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधिताचा मृत्यु*
बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१
सातारा ; 90 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधिताचा मृत्यु
मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत किती खर्च केला ! ताळेबंद सादर करा नाहीतर होणार कार्यवाही
सातारा : शिवजयंती निमित्त कलम 144 लागू
सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१
बँक ऑफ महाराष्ट्रासह चार बँकांचे होणार खासगीकरण
बँक ऑफ महाराष्ट्रासह चार बँकांचे होणार खासगीकरण
नवी दिल्ली ; केंद्र सरकार लवरकरच चार बँकांचे खासगीकरण करणार आहे. त्यात बँक ऑफ महाराष्ट्रासह चार बँकांचा समावेश आहे. पुढील 5-6 महिन्यात याची प्रक्रियाही सुरू होणार आहे.
केंद्र सरकार बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओवरसीज बँक, सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंडिया या चार बँकाचे खासगीकरण करणार आहे. केंद्र सरकारने 2021-22 च्या अर्थसंकल्पात दोन बँकाच्या खासगीकरणाचे संकेत दिले होते. परंतु मोदी सरकार सराकरी बँकासाठे आग्रही आहेत. सध्या देशात स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदात आणि कॅनरा या मोठ्या बँका असून बहुतांश बँकाचे विलगीकरण याच बँकांमध्ये झाले आहेत. एकूण 23 वेगवेळ्या बँका या मोठ्या सरकारी बँकांमध्ये विलीन झाल्या आहेत.त्यात देना बँक, अलाहबाद बँक आणि सिंडिकेट बँकेचा समावेश आहे.
बँक ऑफ इंडियाचा देशात सहावा क्रमांक लागतो. तर सेंट्रल बँकेचा सातवा क्रमांक लागतो. त्यानंता इंडियन ओवरसीज बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. बँक ऑफ इंडियाचे भांडवली मूल्य 19 हजार 268 कोटी रुपये इतके आहे. तर इंडियन ओवरसीज बँकेचे मूल्य हे 18 हजार कोटी इतके आहे. महाराष्ट्र सहकारी बँकेचे मूल्य हे 10 हजार 443 कोटी असून सेंट्रल बँकेचे मूल्य हे 8 हजार 190 कोटी रुपये इतके आहे.
या बँकाचे खासगीकरण झाल्यास कामगार संघटनांचा विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार या निर्णयाचा पुर्नविचार करण्याची शक्यता आहे. बँक ऑफ इंडियाचे 50 हजार कर्मचारी असून सेंट्रल बँकेचे 33 हजार कर्मचारी आहेत. इंडिया ओवरसीज बँकेचे 26 हजार तर बँक ऑफ महाराष्ट्राचे 13 हजार कर्मचारी आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी सर्वात कमी असल्याने या बँकेचे खासगीकरण करणे सरकारसाठी सोपे आहे.
राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन वर्षांत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करणार - मंत्री सुनील केदार
राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन वर्षांत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करणार - मंत्री सुनील केदार
नागपूर, दि.१५ : शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून राज्यातील प्रत्येक तालुक्यात २०२२ पर्यंत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गंत नागपूर विभागात १५ फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांचा जिल्हा परिषद प्रांगणात हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातूरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर आदी यावेळी उपस्थित होते.पहिल्या टप्प्यात नागपूर विभागात फिरत्या 15 पशुवैद्यकीय रुग्णालयांचा आज प्रारंभ करण्यात आला असून, यातील तीन रुग्णालये जिल्ह्यात असतील. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. पशुसंवर्धन विभागाने रुग्णालये सुरु करुन नवीन पर्वाला आज प्रारंभ केला आहे. शेतकरी, पशुपालकांचे पशुधन निरोगी ठेवण्याला या विभागाने महत्त्व दिले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषि आणि कृषीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे फिरते पशुवैद्यकीय रुग्णालये ही विभागाची नितांत गरज होती. ती आज पूर्ण करत असल्याचे सांगून येत्या दोन वर्षात राज्यातील प्रत्येक तालुक्यात ही रुग्णालये सुरु होणार असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.
ग्रामीण भागात अशा प्रकारची रुग्णालये सुरु करत असून अद्यापही अशी रुग्णालये प्रत्येक गावात नाहीत. त्यामुळे आजारी पशुधनाला रुग्णालयापर्यंत नेणे मोठे अडचणीचे असते. आता शेतकऱ्यांची ही समस्या सुटणार असून, 1962 या नि:शुल्क टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता, वैद्यकीय पथकासह हे फिरते रुग्णालय शेतकऱ्याच्या बांधावर पोहचणार असून, ‘शासन आपल्या दारी’ योजना सुरु होत असल्याचे समाधान मंत्री श्री. केदार यांनी व्यक्त केले.
असा होणार शेतकऱ्यांना फायदा
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गंत फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णाल बअयांच्या माध्यमातून आता थेट आजारी पशुरुग्णांवर शेतक-यांच्या दारात उपचाराची सुविधा मिळणार आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून रोगप्रतिबंधक लसीकरण करता येणार आहे. तसेच उच्च उत्पादक क्षमता असणा-या वळूंच्या रेतमात्रा वापरून कृत्रिम रेतनाचीही सोय शेतक-यांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे. तसेच शेतक-यांना पशुआहार व आरोग्याबाबत तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फत मार्गदर्शन करण्याचीही व्यवस्था उपलब्ध करुन देणार असून शासनाच्या विविध योजनांची माहितीसुद्धा हे पथक देणार असल्याचे मंत्री श्री. केदार म्हणाले.,
सुप्रसिध्द गायिका कविता राम यांचे नवीन गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...