कुमजाई पर्व /वार्ताहर
मनोज सावंत / धामणी
22 फेब्रुवारी 2021:-काळगाव ता.पाटण परिसरात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. दरम्यान अनेकदा बिबट्या शिकारीच्या शोधात असताना मृत झालेला आहे.
असाच काहीसा प्रकार पाटण तालुक्यात धामणी येथे घडला आहे. धामणी पासून जवळच असलेल्या आंबेवाडी शिवार परिसरातील ओढ्याच्या जवळ मृतावस्थेत बिबट्याचा बछडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील धामणी भागातील आंबेवाडी शिवारामध्ये एक मादी जातीचे 5 ते 6 महिने वय असलेले बिबट्याचा बछडा झुडपात मृतावस्थेत आढळून आले.
परिसरातील नागरिकांनी बिबट्याचा बछडा पाहिल असता ते मृत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाला भ्रमणध्वनीवरून ही माहिती दिली त्यानंतर वनक्षेत्रपाल विलासराव काळे,वनपाल सुभाष राऊत वनरक्षक विशाल डूबल,जयवंत बेद्रे,अमृत पन्हाळे, सुभाष पाटील, श्री. कुंभार, मुबारक मुल्ला,अमोल पाटील यांनी भेट देऊन मृत झालेल्या बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेऊन शवच्छेदन करण्यासाठी कराड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले.
सदर मृत बिबट्या बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, हा बिबट्या कुठल्या कारणाने मृत झाला हे शवच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच समजेल अशी माहिती वनरक्षक श्री सुभाष पाटील यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा