मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

पाटण ; धारेश्वर येथे कुमजाई पर्व अंकाचे प्रकाशन

धारेश्वर येथे कुमजाई पर्व अंकाचे प्रकाशन

तळमावले/वार्ताहर
तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान, धारेश्वर मठातर्फे आदिमठाध्यक्ष श्री.ष.ब्र.प्र.108 डाॅ.नीलकंठ शिवाचार्य गुरु मल्लिकार्जुनबाबाजी महास्वामी धारेश्वर महाराज यांच्या 36 व्या पट्टाभिषेक वाढदिवसानिमित्त पीठारोहणवर्धन्ती - त्रितपपूर्ती सोहळा आयोजित केला होता. या सोहळयात कुमजाई पर्व अंकांचे प्रकाशन डाॅ.नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, श्री.ष.ब्र.प्र.108 महादय्या रविशंकर शिवाचार्य रायपाटणकर महाराज, श्री.ष.ब्र.प्र.108 सिध्देश्वर शिवाचार्य नूलकर महाराज, श्री गुरु शिवयोगी श्री विजयलिंग महाराज कावडी व इतर संत महंत शिवाचार्य यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अंकांचे संपादक प्रदीप माने, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, डाॅ.संदीप डाकवे, बाजीराव पवार, बाळासाहेब संकपाळ, आदेश नरवाडे, गणेश आर्डे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कुंभमेळा, विविध तीर्थ क्षेत्र पवित्र जलाभिषेक, वस्त्रालंकार तसेच सर्व रोग चिकित्सा व आयुर्वेदिक उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...