शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन ग्रामविकासात राज्यातील गावांनी योगदान दिल्यास महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील आदर्शवत खेडी निर्माण होण्यास मदत होईल. यासाठी गावोगावच्या सरपंचांनी पुढाकार घ्यावा.- रवींद्र माने - सरपंच आदर्श गाव मान्याचीवाडी
11 ग्रामपंचायतींना "तालुका सुंदर गांव" म्हणून घोषित*
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील धामणेर ता. कोरेगांव या ग्रामपंचायतीस सन 2018-19 मधील “जिल्हा सुंदर गांव” म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर सन 2019-20 मधील “तालुका सुंदर गाव” म्हणून अपशिंगे (मि.) ता. सातारा, शिरंबे ता. कोरेगांव, नागनाथवाडी ता. खटाव, गोंदवले खुर्द ता. माण, काळज ता. फलटण, गुठाळवाडी ता. खंडाळा, चांदवडी पुनर्वसन ता. वाई, चोरांबे ता. जावली, मांघर ता. महाबळेश्वर, गमेवाडी ता. कराड व मान्याचीवाडी ता. पाटण या 11 ग्रामपंचायतींना घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.) अविनाश फडतरे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा