शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

कुंभारगाव : श्री चंद्रकांत चाळके साहेबांनी सामाजिक बांधीलकी जपत केला वाढदिवस साजरा

कुंभारगाव : श्री चंद्रकांत चाळके साहेबांनी सामाजिक बांधीलकी जपत केला वाढदिवस साजरा 

कुंभारगाव, प्रतिनिधी । कुंभारगाव ता.पाटण दि.19 युवा नेते चंद्रकांत चाळके साहेब यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते .यामध्ये दि.१२ फेब्रुवारी रोजी बदलापूर येथील आनाथ आश्रमातील मुलांना शालेय उपयोगी वस्तू ,ब्लॅंकेट, फळे वाटप ,घणसोली येथे जिद्दी मराठा प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने भव्य क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते.

कुंभारगाव,चाळकेवाडी,चिखलेवाडी,गलमेवाडी,शेंडेवाडी परिसरातील गरजू कुटुंबांना गृह उपयोगी व किराणा साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.यावेळी डॉ.दिलीपराव चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात चंद्रकांत चाळके  यांनी सातत्याने चालविलेल्या सामाजिक उपक्रमांबाबत त्यांचे कौतुक केले.यावेळी सरपंच सौ.नंदा चाळके उपसरपंच भरत चाळके आणि ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाम्रस्थांना गरजेच्या काळात जीवनावश्यक मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसुन येत होते.त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...