अष्टा र्विशति में जातो विशवकर्मा भवनि च॥धर्मशास्त्रानुसार मग शुक्ल त्रयोदशीला भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी केली जाते.
आज दि २५ फेब्रुवारी २०२१ गुरूवार विश्वकर्मा भवन कुंभारगाव ता.पाटण या ठिकाणी कोविड च्या महामरीमुळे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून विश्वकर्मा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.सकाळी 10 वाजता विश्वकर्मा प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर दुपारी 12 वाजता भगवान विश्वकर्मा यांची जन्मवेळ असल्याने तेव्हा फुलांचा कार्यक्रम झाला.
त्यानंतर कोळे ता कराड येथील जिजाऊ अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ आणि मास्क वाटप करून समाजहिताचे काम करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वकर्मा प्रतिष्ठान कुंभारगाव चे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव, खजिनदार, महिला मडंळ, युवा कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी कष्ट घेतले.यावेळी श्री.अजित सुतार , श्री पांडुरंग सुतार , श्री शशिकांत दिक्षित, श्री सुनील धर्मधिकारी, श्री संदिप पोतदार , श्री लक्ष्मण तात्या सुतार वसंतराव पतंगे, श्री प्रा सचिन पुजारी सर , श्री ओंकार देशमुख,अक्षय पोतदार उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा