शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

तळमावले : शिवसमर्थ ची वाटचाल अभिमानास्पद- उद्योजक नितीन बुचडे

  तळमावले : शिवसमर्थ ची वाटचाल अभिमानास्पद- उद्योजक नितीन बुचडे

तळमावले/वार्ताहर
दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को. आॅप. क्रेडीट सोसायटीची सहकारातील वाटचाल कौतुकास्पद अािण अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार यशस्वी उद्योजक नितीन बुचडे यांनी काढले ते संस्थेच्या पलूस शाखा शुभारंभप्रसंगी बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे, शिवाजी सुर्वे, उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे, देवबा वायचळ सर, विठ्ठलराव पाचुपते सर, हणमंत माने, उत्तम धर्मे व इतर मान्यवर यांची प्रमुख होती.
आर्थिक चळवळ राबवत असताना सामान्य माणसाला केंद्रीत ठेवून संस्था आपली वाटचाल करत आहे. अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली शिवसमर्थ आज चांगल्या पध्दतीने कार्य करत आहे असेही मत नितीन बुचडे यांनी व्यक्त केले.
शिवसमर्थच्या पलूस येथील शाखेच्या उद्घाटनानिमित्त खास ठेवीदारांसाठी राजा पंढरीचा-दामदुप्पट ठेव योजना सुरु केली आहे. या योजनेत रु. 10,000/- ची ठेवपावती केल्यास ती 63 महिन्यात दुप्पट होणार आहे. ही योजना लकी ड्राॅ पध्दतीने पार पडणार आहे.
यात 1  ले बक्षीस चारचाकी कार, 2 रे बक्षीस तीन चाकी मालवाहतूक, 3 रे बक्षीस मोटार सायकल, 4 थे बक्षीस 3 रेस सायकल जेन्टस, 5 वे बक्षीस 3रेस लेडीज सायकल आहेत. अशी एकूण 9 बक्षीसे ठेवली आहेत.
दि.15 आॅगस्ट 2006 रोजी शिवसमर्थ ग्रा.बि.शे.सहकारी पतसंस्था मर्यादित तळमावले या ठिकाणी संस्थेची स्थापना केली. पूर्णवेळ सहकार क्षेत्र निवडत समाजातील सर्व थरातील व क्षेत्रातील सहकाÚयांना बरोबर घेवून सर्व कर्मचारी, अधिकारी यांच्यावर जास्तीत जास्त जबाबदारी देवून संस्था अधिक क्रियाशील कशी राहील यासाठी संपुर्ण प्रयत्न करून सहकारास चळवळीची जोड दिल्यास संस्था अधिक जोमाने वाढते. संस्थेच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात एकुण 50 शाखा कार्यरत आहेत.
स्वच्छ, पारदर्शक कारभाराने लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेने अवघ्या 15 वर्षात  222 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. संस्थेने चांगला नावलौकीक प्राप्त केला आहे. 365 दिवस 12 तास अविरत सेवा कार्यरत असते. संस्थेने आतापर्यंत ज्या काही लकी ड्राॅ च्या योजना राबवल्या आहेत. त्या अत्यंत पारदर्षकपणे राबवल्या आहेत.
संस्थेस विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे उदा. ‘स्पंदन जीवन गौरव पुरस्कार’, ‘प्राईड आॅफ इंडिया-भास्कर अॅवार्ड’, ‘गुंफण सामाजिक पुरस्कार’, ‘राज्यस्तरीय आदर्श चेअरमन पुरस्कार’, ‘युनिटी गौरव अॅवार्ड’, ‘समाज भूषण पुरस्कार’, ‘उत्कृष्ट चेअरमन पुरस्कार’, ‘सहकार रत्न पुरस्कार’, ‘सहकार भूषण पुरस्कार’ असे पुरस्कार मिळाले आहेत ही संस्थेच्या प्रगतीची पोच पावती आहे.
लोकांच्या सुखदुःखामध्ये खंबीरपणे संस्था व शिवसमर्थ परिवार उभा असतो. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तरी त्याला धीर देण्याचे तसेच त्यांना समाजात ताठ मानेने उभे करण्यासाठी व त्यांच्या भविष्यातील प्रगतीसाठी संस्था व परिवार झटत असतो.
या कार्यक्रम यषस्वी करण्यासाठी सुशांत तुपे, जयंत यादव, विजय मोहिते, सागर मोहिते, सतीश मोरे, अनिकेत पाटील, अजय खडके, अभिजीत गायकवाड, रामेश्वरी भोसले व संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, व्यापारी, ग्राहक, सभासद, ठेवीदार, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रारंभी प्रतिमापुजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. समारंभास सर्व शाखांचे प्रतिनिधी, परिसरातील ठेवीदार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...