रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का?

महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का? 


मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का? हा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला थेट विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी थोड्याच वेळापूर्वी जनतेशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. लॉकडाऊन लावायचा की नाही याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही तर तुम्हीच मला द्या असंही मुख्यमंत्री म्हणाले.

पुढचे आठ दिवस त्यासाठी महत्वाचे असल्याचही मुख्यमंत्र्यांनी सुचित केलं आहे. म्हणजेच महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही याचा निर्णय पुढच्या आठ दिवसात होऊ शकतो. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते मास्कशिवाय फिरतील आणि ज्यांना तो नको आहे ते मास्क घालून फिरतील असं मुख्ममंत्री म्हणालेत.

उद्यापासून काही जिल्ह्यात लॉकडाऊन?

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आजच राज्यात सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, यात्रा, आंदोलनं, मोर्चे यावर पूर्णपणे बंदी घालत असल्याची घोषणा केली आहे. सोबतच जिथं गरज असेल तिथं बंधनं घालणं किंवा लॉकडाऊन जाहीर करण्याची सुचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. अमरावती, यवतमाळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याचं ठाकरे म्हणाले. त्यानंतर तिथं लॉकडाऊन करायचा असेल तर अधिकाऱ्यांनी अचानक घोषणा न करता जनतेला चोवीस तास द्यावेत असंही म्हणाले. अचानक घोषीत केलेला लॉकडाऊन हा घातक असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळेच उद्या रात्रीपासून काही जिल्ह्यात लॉकडाऊन किंवा तशा स्वरुपाची काही कडक बंधनं लादली जाऊ शकतात. विशेषत: विदर्भात जिथं स्थिती गंभीर आहे."कोरोना आता पुन्हा डोकं वर काढतो आहे. आपण थोडं फिरायला लागलो. लग्नावरची बंधनं अजूनही आहेत. हे उघडा ते उघडा म्हणणारे कोरोनाची शिस्त मोडू शकत नाही. समजुतदारपणे सुचनांचं पालन करा. सगळ्यांना वाटलं कोरोना गेला, पण तसं नाहीये. कोरोनाची लाट खाली जाते, वर जाते पण खाली जाते त्याच वेळेस या लाटेला थांबवायचं असतं."दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. नियमांमध्ये शिथिलता झाल्यानंतर रस्त्यांसह सर्वच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे आणि कोरोनाबाबत इतर खबरदारी न घेतल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आगामी काळातही असंच चित्र राहिल्यास सरकारकडून लॉकडाऊनचा कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...