मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत किती खर्च केला ! ताळेबंद सादर करा नाहीतर होणार कार्यवाही

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत किती खर्च केला ! ताळेबंद सादर करा नाहीतर होणार कार्यवाही 

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी
18 फेब्रुवारीपर्यंत संबंधित तहसीलदारांकडे खर्च सादर करावा; अन्यथा निवडणूक नियमाप्रमाणे होणार कार्यवाही

सातारा दि. 16 : जिल्ह्यात माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत झालेल्या ग्रामपंचायतींसाठी दि.15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारी रोजी मतमोजणी  व तद्नंतर निकाल घोषीत झालेला आहे. निकाल घोषीत झाल्यापासून 30 दिवसांच्या आत म्हणजे 18 फेब्रुवारी 2021 पर्यंत या कालावधीत ग्रामपंचायत निवडणूक लढविणारे सर्व ग्रामपंचायत सदस्य/उमेदवार यांनी निवडणूक खर्च संबंधित तहसीलदार कार्यालयात 18 फेब्रुवारीपर्यत सादर करावा.
राज्य निवडणूक आयोगाकडील पत्र क्र. रानिआ/जिपपंस/2010/प्र.क्र.9/का.7 दि.30.11.2010 अन्वये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये आवश्यक केलेल्या रितीने सादर न केल्यास अशा उमेदवारास सदस्य म्हणून राहण्यास असा सदस्य होण्यासाठी निरर्ह ठरविण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्राप्त आहेत.तरी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च सादर करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...