सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१

सुप्रसिध्द गायिका कविता राम यांचे नवीन गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सुप्रसिध्द गायिका कविता राम यांचे नवीन गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
तळमावले/वार्ताहर
तळमावले दि.15 आपल्या जादुई आवाजाने प्रेक्षक रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारी आघाडीची गायिका कविता राम यांचे नवीन गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शुक्रवार दि.19 या शिवजयंती च्या दिवशी हे गाणे प्रसारित होणार आहे. के. आर. म्युझिक (K R Music )  प्रस्तुत "राजा शिवाजी राजा " हे छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेलं नवंकोरं गीत एका नव्या स्वरूपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचं नुकतंच छायाचित्रण झालं असून हे गाणं लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध गायिका कविता राम ह्यांनी स्वरबद्ध  केले असून या गाण्याचे गीतकार मंदार चोळकर आणि  या गाण्याचं  संगीत आणि संगीत संयोजन प्रफुल -स्वप्निल ह्यांनी  केले आहे. ह्या गाण्याचं रेकॉर्डिंग आजिवासन स्टुडिओ मध्ये  झाले  असून ध्वनिमुद्रण आणि ध्वनीमिश्रण - अवधूत वाडकर ह्यांनी केले आहे.बासरी ची सुरेल साथ वरद कठापुरकर ह्यांची लाभलेली आहे.
के. आर. म्युझिक कंपनी  ची प्रमुख कविता राम या गाण्याची निर्मिती करणार आहेत. लवकरच हे गाणं कविता राम ह्या युट्युब चॅनेल वर बघायला मिळेल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...