सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाला धरणीमाता फौंडेशनचे निवेदन

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाला धरणीमाता फौंडेशनचे निवेदन
कुमजाई पर्व प्रतिनिधी / पवन माने
कुंभारगाव ता.पाटण निवेदनात नमूद केले की, शेतात वानर, रानडुक्कर,बिबट्या आदी वन्यप्राणी येऊन पिकाची नासाडी करीत आहेत.काळगाव,कुंभारगाव, ढेबेवाडी परिसरात बहुतांश शेतकऱ्यांचे जीवन शेतीवर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.बिबट्याचा मानवी वस्तीत होणार वावर वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाला धोका निर्माण झाला आहे. 
 याकडे वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी लक्ष देऊन वन्यप्राणी यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा, धरणीमाता फौंडेशनच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी फौंडेशनचे अध्यक्ष सतीश वाघ,व अक्षय मोरे उपस्थित होते.
वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण पोतदार 
कार्यालयात हजर नव्हते, त्यामुळे कार्यालयात असणाऱ्या रोहित सावंत या कर्मचाऱ्यांकडे निवेदन द्यावे लागले.

*गणेशोत्सव साध्या पद्धतीने व पर्यावरण पुरक साजरा करा**- जिल्हाधिकारी शेखर सिंह*

*गणेशोत्सव साध्या पद्धतीने व पर्यावरण पुरक साजरा करा*
*- जिल्हाधिकारी शेखर सिंह* 
  सातारा दि.30 :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा गणेशोत्सव जिल्ह्यात साध्या पद्धतीने व पर्यावरण पुरक असा साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्सवाबाबत बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा  पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4 फुट व घरगुती गणपतीकरिता 2 फुटांच्या मार्यादेत असावी. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्ती ऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तींचे पुजन करावे. मुर्ती शाडुची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीत विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. 
जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आरती, भजन, किर्तन तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. श्री गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी. मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात   यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीने विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत केले आहे.
00000

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, सरचिटणीसपदी जिल्हा परिषद सदस्य ॲड.उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर कार्यकारी समितीवर अजितराव पाटील-चिखलीकर यांची वर्णी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, सरचिटणीसपदी जिल्हा परिषद सदस्य ॲड.उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर कार्यकारी समितीवर अजितराव पाटील-चिखलीकर यांची वर्णी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, सरचिटणीसपदी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य ॲड.उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर कार्यकारी समितीवर अजितराव पाटील-चिखलीकर यांची वर्णी लागलीय. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत.काँग्रेस समितीकडून करण्यात आलेल्या निवडीत कऱ्हाड तालुक्यातील या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. ॲड. उदयसिंह पाटील यांच्यावर राज्यपातळीवर सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आलीय. काका- बाबा गटाने मागील वर्षी जुळवून घेवून कॉंग्रेसची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

ॲड. उदयसिंह पाटील यांना आणखी बळ मिळावे, या हेतूने कॉंग्रेसने त्यांच्यावर राज्याच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे उंडाळकरांच्या रयत संघटनेत आनंदाचे वातावरण आहे. कॉंग्रेस पक्षाची मुलुख मैदान तोफ म्हणून परिचित असणारे अजितराव पाटील-चिखलीकर यांची कॉंग्रेसच्या कार्यकारी समितीवर निवड करण्यात आली आहे.

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी निश्चित आराखडा तयार करावा -; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी निश्चित आराखडा तयार करावा -; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 मुंबई  सहसंपादक - शरद माने 

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा बैठकीत आढावा

मुंबई दि.२७ :- .  .मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी निश्चित आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यास जर विकासकाने असमर्थता दर्शवली असेल किंवा विकासकाकडून प्रकल्पाच्या कामास विलंब होत असेल तर असे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना व विविध पर्यायांचा कसा अवलंब करता येईल याची कार्यपद्धती निश्चित करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

कायमस्वरूपी संक्रमण शिबिरांबाबत नियम सुसंगत हवे

कायमस्वरूपी संक्रमण शिबिरांबाबत सुसंगत नियमावली तयार करून लोकांना दिलासा द्यावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बेघर झालेल्या लोकांची थकीत भाडे देण्यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी करावयाच्या उपाययोजना,  प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काही नियमांची शिथिलता व अंमलबजावणी, प्रकल्प कालबद्ध व विशिष्ट मर्यादित होण्यासाठी करावयाचे नियम याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
            विजय साबळे / प्रतिनिधी 
मुंबई दि.२७ :-  राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.

राज्यात जुलै 2021 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईची रक्कम वाढवण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तथापी, अद्यापही केंद्र शासनाने 2015 नंतर नुकसानभरपाईच्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने केंद्राच्या दरापेक्षा जास्तीच्या दराने आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मिळणारी नुकसानभरपाईची रक्कम 2019 च्या महापूरात देण्यात आलेल्या दराप्रमाणे आहे. त्यामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.

*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर*

 *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर* 
 कराड / प्रतिनिधी
 कराड नगरपालिकेकडे कोरोना काळात महसूलमध्ये घट झालेली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे कराड शहरातील गटारे पाणी वाहून नेण्यासाठी क्षमता अपुरी पडत आहे. तसेच शहराच्या वाढीव वसाहतीमध्ये पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी गटारांची व्यवस्था नसलेने रस्ते लवकर खराब होत आहेत. अश्या परिस्थितीत नागरी सुविधा निर्माण करणेसाठी "खास बाब" म्हणून शहरातील काही भागातील गटारांच्या बांधणीसाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ५ कोटी इतक्या निधीची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाकडून ५ कोटी इतका निधी कराड शहरासाठी मंजूर करण्यात आला आहे. 

कराड शहरासाठी ५ कोटी इतका निधी मंजूर झाला असून तो निधी वितरित करण्याचे आदेश सुद्धा नगरविकास मंत्रालयाकडून शासन आदेशाद्वारे करण्यात आला आहे. या निधीद्वारे कराड शहरातील शनिवार पेठेतील लाहोटी प्लाझा इथून ते कृष्णा कोयना ऑटोमोबाईल ते हॉटेल संगम कॉर्नर इथपर्यंत पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्याच्या कडेने गटारसाठी बंदिस्त पाईपलाईन करणे. तसेच नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीमधील सुमंगलनगर येथील १ ते ७ गल्ली, याचसोबत मुजावर कॉलोनी, शांतीनगर, दौलत कॉलोनी, रेव्हेन्यू कॉलोनी, पोस्टल कॉलोनी, सूर्यवंशी मळा आदी शहरातील या परिसरामध्ये  पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्याच्या कडेने गटारसाठी बंदिस्त पाईपलाईन करणेसाठी ५ कोटी इतका निधी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असून या कामाची सुरुवात लवकरच प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.    

-------------------------------------------------------

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

कुंभारगाव : सरपंच सौ.सारिका योगेश पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

सरपंच सौ.सारिका योगेश पाटणकर  ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, असा अगदी राजकारणातील पहिल्या पायरीपासून त्यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरु केली आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने अभिष्टचिंतन
मौजे कुंभारगावं ता.पाटण च्या प्रथम नागरिक सरपंच सौ.सारिका योगेश पाटणकर यांचा आज वाढदिवस. राजकीय या सामाजिक दृष्ट्या परिचीत असणाऱ्या या गावचे सरपंच  प्रथमच आरक्षण मागासवर्गीय महिलासाठी मिळाले तेही उच्च शिक्षित महिलेकडे ३९ वर्षातून पहिल्यांदा.मागील ग्रामपंचायतीच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सुद्धा ग्रामपंचायय सदस्य म्हणून अभ्यासू  वृत्तीने काम पाहिले.आणि याच अनुभवाच्या शिदोरीमुळे जनतेच्या आशीर्वादाने त्यांना पाच वर्षाकरीता सरपंच पदी काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
   महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण यांचे हे गांव.सरपंच यांचे पती श्री.योगेश पाटणकर हे  मा.पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक.बाबांच्या आशीर्वादाने सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा गट यांनी एकत्रित लढवून बहुमताने ग्रामपंचायत ताब्यात घेतली.सरपंच सौ.पाटणकर यांचे शिक्षण बी.ई  कॉम्पुटर  असलेने ग्रामपंचायतीचा कारभार डिजिटल पद्धतीने करणेस त्यांना कोरोना काळात कोणतीही अडचण आली नाही.व्हिडिओ काँफेरेन्सने शासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबरच्या मिटिंग त्यांनी सहजपणे पार पाडल्या.
            रोहा येथील नोकरी सोडून पती योगेश पाटणकर यांच्या बरोबरीने त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये लक्ष घातले.पुढे जाऊन त्यांनी कर्जत येथे स्वतःचा व्यवसाय म्हणून पर्यटकांकरिता पिकनिक पॉईंट सुरू केले.त्यामुळे हे कुटुंब फक्त सासरे कै.जगन्नाथ पाटणकर यांचेकडून सामाजिक कामाचे धडे मिळाले म्हणूनच मी आज कौटुंबिक जबाबदारी सांभाळून राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालत सामाजिक सेवेचे वृत सांभाळणार आहे.त्यासाठी कुंभारगांव पंचक्रोशीतील जनतेचे आशीर्वाद मिळावेत असे सौ.पाटणकर म्हणाल्या
    सरपंच पदावर विराजमान झालेनंतर कोरोना  या महाभयंकर आजाराबाबाबत लोकजागृती करून गावातील लोकांचे व्हॅक्सीनेशन पूर्णत्वाकडे नेणेसाठी प्रयत्न केले.पिण्याच्या पाण्याची योजना पूर्णपणे योग्य प्रकारे कार्यान्वित करून जनतेस स्वच्छ पिण्याचे पाणी दिले.प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुलांचे ऑनलाईन शिक्षणाकरिता समोर आलेल्या प्रश्नांची सोडवणूक  केली.

*सातारा पर्यटकांची वाढती गर्दी पाहता कास पठारावर**पार्किंगची योग्य ती सुविधा व्हावी : खा. श्रीनिवास पाटील*

*सातारा पर्यटकांची वाढती गर्दी पाहता कास पठारावर*
*पार्किंगची योग्य ती सुविधा व्हावी : खा. श्रीनिवास पाटील*
 
  सातारा दि. 26 : जागतिक पर्यटन स्थळ असणाऱ्या कास पठारावर पर्यटनासाठी येणाऱ्या वयोवृध्द, गरोदर स्त्रिया, लहान मुले यांना त्रास होणार नाही अशा पध्दतीने पर्यटकांची वाहने सुरळीत पार्किंग करण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना खा. श्रीनिवास पाटील यांनी दिल्या. 
  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज खा. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी शेखर सिंह, सातारा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधवी कदम, पाचगणी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर, मलकापूर नगर पंचायतीचे मनोहर शिंदे, निवासी उप जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मोंगीलवार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक अस्मीता पाटील, वाहतुक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी, ऑटोमोबाईल डिलर संघटनेचे  सचिन शेळके व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 
  यावेळी खा. श्रीनिवास पाटील यांनी, शिंदेवाडी फाटा येथील पुलाचे कामकाज त्वरीत सुरु करावे. महामार्गावरील गावांच्या नावाचे चुकीचे फलक दुरुस्त करावे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वेग मर्यादेचे फलक लावावे. वाहन चालवितांना वाहन धारकांना मोबाईलवर संभाषण करण्यास मज्जाव करणे प्रसंगी दंड आकरण्यात यावा. दुचाकी वाहन चालकांना हेल्मट सक्तीचे करण्यात यावे अशा सूचना त्यांनी शेवटी  केल्या.

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

कुंभारगाव : त्या धोकादायक विजेच्या खांबाकडे महावितरणचा कानाडोळा

कुंभारगाव : त्या धोकादायक विजेच्या खांबाकडे महावितरणचा कानाडोळा

कुणाल माने : कुमजाई पर्व न्यूज

कुंभारगाव ता.पाटण-  प्रतिकूल परिस्थितीतही रात्रीचा दिवस  करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तळमावले महावितरण अधिकाऱ्यांनी मोहीम फत्ते केली आहे. तर दुसरीकडे कुंभारगाव मान्याचीवाडी येथील पुलाजवळ आलेल्या पोलचा पुरामुळे भराव वाहून गेल्याने पोल पूर्ण मोकळा झाला आहे या धोकादायक विजेच्या पोलबाबत वारंवार पाठपुरावा करूनही महावितरण अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

एखादी मोठी दुर्घटना अथवा जीवितहानी झाल्यावर महावितरणाला जाग येणार का? असा खडा सवाल ग्रामस्थ करत आहेत. संबंधित रस्ता रहदारीचा असल्याने दिवसभर नागरिकांची ये जा चालू असते त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे

वारंवार मागणी करूनही अद्यापही खांब बदलला गेला नसून याच खांबावर तारांचा झोळ खाली येत असून मोठी दुर्घटना अथवा जीवितहानी घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. महावितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने महावितरण अधिकारी दुर्घटना अथवा जीवितहानी होण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.


शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 623 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 54 बाधितांचा मृत्यू**612 जणांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 623 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  54 बाधितांचा मृत्यू*
*612 जणांना दिला आज डिस्चार्ज*
  सातारा दि.21 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 623  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून  54 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली  7 (9715),  कराड  77 (37233 ), खंडाळा  14 (13643 ), खटाव  95 (23552 ), कोरेगांव  50 (20329), माण  80 (16314 ),  महाबळेश्वर 4  (4560 ), पाटण 8  (9869 ), फलटण  115 (33679 ), सातारा 134  (48161 ), वाई  25 (15123 ) व इतर  14 (1817 ) असे आज अखेर एकूण 233995 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (207), कराड 4 (1127), खंडाळा 0 (177), खटाव   3 (573), कोरेगांव 4  (441), माण 16 (355), महाबळेश्वर 0 (88), पाटण 1 (354), फलटण  17 (609), सातारा 9 (1403), वाई 0  (351) व इतर 0(75), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5760 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*612 जणांना दिला आज डिस्चार्ज*

  : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 612 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.                        

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 597 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 17 बाधितांचा मृत्यू**661जणांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 597 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 17 बाधितांचा मृत्यू*
*661जणांना दिला आज डिस्चार्ज*
सातारा दि.20 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 597 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 17 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 6 (9708),  कराड 61 (37156), खंडाळा 7 (13629), खटाव 48(23457), कोरेगांव 78(20279), माण 43(16234),  महाबळेश्वर 1 (4556), पाटण 14 (9861), फलटण 185 (33564), सातारा 125 (48028), वाई 15 (15098) व इतर 14 (1803) असे आज अखेर एकूण 233373 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
          तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (207), कराड 2(1123), खंडाळा 0 (177), खटाव 0 (570), कोरेगांव 1 (437), माण 0(339), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0(353), फलटण 10 (592), सातारा 2 (1394), वाई 2 (351) व इतर 0(75), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5706 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                              *661जणांना दिला आज डिस्चार्ज*
   जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 661 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

ढेबेवाडी : बिबट्याने मारली उडी आणि शेतकऱ्याचा जीवाचा थरकाप

ढेबेवाडी : बिबट्याने मारली उडी आणि शेतकऱ्याचा जीवाचा थरकाप 
कुमजाई पर्व न्यूज / मनोज सावंत
ढेबेवाडी ता.पाटण:
 डोळ्यादेखत झुडपातून उडी मारून शेळीला पळवून नेण्याचा बिबट्याचा प्रयत्न तेथे उपस्थित शेतकऱ्यांनी हाणून पाडला. मात्र, झटापटीत शेळीचा दुर्दैवाने मृत्यू झाला. मराठवाडी (ता. पाटण) जवळच्या शिवारात काल दुपारी साडेबाराच्या सुमारास हा थरार प्रकार घडला. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे त्या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडी येथील विलास चंद्रू शिंदे यांनी बुधवार दि.18 सकाळी नेहमीप्रमाणे जनावरे गावाजवळच्याच माळवर चरण्यास सोडलेली होती.तेथेच गवतात खुंटी ठोकून दोरीने शेळीला बांधले होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास जवळच्याच झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक बेसावध शेळीवर झडप टाकून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी जवळच असलेल्या अजय शिंदे, आबासाहेब सुतार, आनंद शिंदे, श्री. कदम आदींनी तिकडे धाव घेऊन बिबट्याला आरोडाओरड करून जोरदार प्रतिकार करत त्याच्या तावडीतून शेळीला सोडविण्याचा प्रयत्न केला.
काही वेळानंतर शेळीला तेथेच सोडून बिबट्याने डोंगराकडे धूम ठोकली. मात्र, तत्पूर्वीच बिबट्याशी झालेल्या झटापटीमुळे शेळीचा मृत्यू झाला होता. वनपाल सुभाष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बिबट्याचे हल्ले वाढल्याने शिवारात शेतीच्या कामानिमित्त आणि जनावरांना चरण्यास घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण आहे.तरी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

*सातारा जिल्ह्यातील : 751 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू**797 जणांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील : 751 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू*
*797 जणांना दिला आज डिस्चार्ज*
सातारा दि.19 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 751नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 36 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 14 (9702),  कराड 94 (37158), खंडाळा 30 (13622), खटाव 92 (23409), कोरेगांव 40 (20201), माण 85 (16191),  महाबळेश्वर 2 (4555), पाटण 15 (9847), फलटण 168 (33429), सातारा 149 (47953), वाई 49 (15083) व इतर 13 (1789) असे आज अखेर एकूण 232939 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (207), कराड 6(1121), खंडाळा 0 (177), खटाव 1 (570), कोरेगांव 0 (436), माण 19(339), महाबळेश्वर 0 (88), पाटण 1 (353), फलटण 1 (582), सातारा 1 (1392), वाई 7(349) व इतर 0(75), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5689 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                            
*797 जणांना दिला आज डिस्चार्ज*

    जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 797 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

*शॉपिंग मॉल रात्री 10 पर्यंत चालू*

 *शॉपिंग मॉल रात्री 10 पर्यंत चालू*
सातारा दि.17 : मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील
11 ऑगस्ट 2021 अन्वये निर्गमित करणेत आलेल्या आदेशातील जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शेखर सिंह यांनी  शॉपिंग मॉल संबंधी बाबींमध्ये सुधारणा  केलेल्या आहेत. 
सातारा जिल्हयात दि. 13 ऑगस्ट 2021 चे आदेशात अशी नव्याने  खालीलप्रमाणे  सुधारणा करण्यात येत आहे. सातारा जिल्हयातील सर्व शॉपिंग मॉल सर्व दिवस रात्री 10 वा. पर्यत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करण्याऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी  आणि प्रवेश करण्याऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्य दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा. घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील. वय वर्ष 18 खालील वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरु न झाल्याने वय वर्षे 18 खलील  वयोगटातील मुला/ मुलींना मॉल मध्ये प्रवेश करताना वयाचा पुरवा म्हणून  आधारकार्ड,आयकर विभागाने निर्गमित केलेले पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील. 
                                                 0000

शिवसेना कुठरे विभागातून पूरग्रस्तांना मदत

शिवसेना कुठरे विभागातून पूरग्रस्तांना मदत

कुमजाई पर्व न्यूज / मनोज सावंत

तळमावले :  पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना शिवसेना कुठरे विभागातून अन्नधान्य, कपडे आणि जिवनआवश्यक मदत देण्यात आली आहे.भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष अविनाश पवार दादा व मर्चंट सिंडिकेट क्रेडिट सोसायटीचे संस्थापक श्री . अनिल शिंदे यांच्या पुढाकारातून दि.16 ऑगष्ट रोजी मदत देण्यात आली.पाटण तालुक्यातील कोयनानगर भागातील  मिरगांव , बाजे , गोकुळनाला , आंबेघर, कामरगाव , ढोकावळे , हुंबरळी , नवजा तर ढेबेवाडी विभागातील जितकरवाडी ,  जोशीवाडी (काळगाव ) येथील लोकांना महाभयंकर फटका बसला . अतिवृष्टीने सलग दोन दिवस थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे .पाटण तालुका शिवसेना संघटक श्री . सुनिल पवार यांनी कोयना भागातील मिरगांव , बाजे, गोकूळनाला या  जि .प. प्रा . शाळा कोयनानगर येथे तात्पुरते पुनर्वसन केलेल्या गावांना जीवनावश्यक वस्तूचे साहित्य त्यांच्या मागणीनुसार किराणा साहित्य , मसाले साहित्य , द्रोण- पत्रावळी ,चहाचे कप  ,डिश व कपडे इ . वाटप करण्यात आले या योगदानामध्ये बाळकृष्ण केबल नेटवर्क तळमावले श्री . शिवाजी सुर्वे साहेब , शिवसेना पाटण तालुका संघटक श्री . बाबासो निवडुंगे , श्री .वसंत लोकरे भाऊ , शशिकांत शिंदे , साई प्रतिष्ठान बादेवाडी , रघुनाथ शिंदे , संजय जाधव , अधिकराव शिंदे , अनिल जाधव, रविंद्र चव्हाण , अनिल लोकरे , राहुल लोहार , जयवंत कदम , अनिल कदम , रणजीत पवार आदींचा समावेश होता .शिवसेना कुठरे विभागातून पूरग्रस्तांना मदत

 सदर मदत ही शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख श्री .जयवंतराव शेलार (माऊली ) , मर्चंट सिंडीकेट संस्थेचे संस्थापक अनिल शिंदे साहेब ,  अंगणवाडी सेविका सौ . संगीता म्होहळकर , सौ . सुमन यादव मॅडम , समाजसेवक चंद्रकांत चाळके , संभाजी चाळके, बाबासो निवडुंगे , सुनिल पवार व शशिकांत शिंदे  यांच्या उपस्थितीत देण्यात आली .

शिवसेनेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे 

पश्चिम महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय मदत दिली जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अंगीकारून शिवसैनिक मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. याच विचारातून सामाजिक बांधिलकी जपत तातडीची मदत म्हणून  अत्यावश्यक गरजेच्या वस्तू पाठविल्या जात आहेत, असे भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष श्री.अविनाश पवार दादा यांनी सांगितले.

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

*सावली प्रतिष्ठानचा ऑनलाइन निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न*

*सावली प्रतिष्ठानचा ऑनलाइन निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न*
पाटण : सावली प्रतिष्ठान चिखलेवाडी आयोजित ऑनलाइन निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कुंभारगाव शाळा नंबर 3 येथे मान्यवरांच्या उपस्थितीत 15 ऑगस्ट 2021 रोजी संपन्न झाला.
सावली प्रतिष्ठान अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर आहे. या प्रतिष्ठानकडून आज पर्यंत अनेक उपक्रम राबवले आहेत.या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी या वर्गातील एकूण 70 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमास स्पंदन चारिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप डाकवे, श्री. रमेश मोरे उपसभापती पंचायत समिती पाटण, श्री. दिलीप मोरे सरपंच ग्रामपंचायत चिखलेवाडी, श्री. सुदाम चव्हाण उपसरपंच ग्रामपंचायत चिखलेवाडी, सावली प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रा. सुरेश यादव, प्रा. सुरेश चिखले, श्री. अरुण मोरे फौजी, श्री. विक्रम वरेकर फौजी, श्री रविंद्र माटेकर, श्री मंगेश माटेकर, श्री किशोर मोरे सदस्य ग्रामपंचायत चिखलेवाडी, श्री, जितेंद्र माटेकर सदस्य ग्रामपंचायत चिखलेवाडी, श्री. सागर अनंत मोरे, श्री. मनोहर सावळाराम यादव ,पत्रकार पोपट माने,रमेश नावडकर सरपंच ग्रामपंचायत करपेवाडी तसेच सर्व विजेते स्पर्धक, स्पर्धेतील सर्व विद्यार्थी, चिखलेवाडी ग्रामपंचायतीमधील सर्व ग्रामस्थ हजर होते.
प्रमुख पाहुणे डॉ. संदीप डाकवे म्हणाले, सावली प्रतिष्ठानने आजपर्यंत खूप सामाजिक कार्यक्रम राबवले आहेत. कोरोना काळात त्यांचे योगदान खूपच गौरवास्पद आहे.येथून पुढे त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवावेत आणि भविष्यात कोणतीही त्यांना मदत लागली तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. श्री डाकवे यांनी यावेळी सावली प्रतिष्ठानला एक सुंदर फ्रेम भेट दिली.
श्री. रमेश मोरे आपल्या भाषणात म्हणाले,या प्रतिष्ठानकडून अनेक शैक्षणिक कार्यक्रम राबवले जात आहे ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. भविष्यात चिखलेवाडी येथे या प्रतिष्ठानने एक स्पर्धा परीक्षा केंद्र उभारावे आणि जी मदत लागेल ती ग्रामपंचायतकडून पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.
यावेळी श्री. प्रमोद मोरे, श्री.विक्रम वरेकर यांनी मनोगते व्यक्त केली. प्रा.सुरेश यादव यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,श्री. एकनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. कारंडे सर यांनी आभार मानले. यावेळी चि.गौरंग रुपेश माटेकर या चिमुकल्याने देशभक्तीपर गीत गायले. कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला.

सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 569 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 569 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू*
सातारा दि.16 - जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 569 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 11 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 17 (9647), कराड 60 (36870, खंडाळा 18 (13543), खटाव 85 (23136), कोरेगांव  51 (20077), माण 69 (15927), महाबळेश्वर 2 (4552) पाटण 5 (9800), फलटण 84(32989), सातारा 139 (47539), वाई 36(14968) व इतर 3(1750) असे आज अखेर एकूण  230798 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (206), कराड 0 (1105), खंडाळा 0 (175), खटाव 0 (561), कोरेगांव  2 (434), माण   1 (319), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0  (351), फलटण 3 (564), सातारा 5 (1383), वाई 0 (342) व इतर 0 (75), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5603 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

तळमावले : धरणीमाता फाउंडेशन घेतंय पूरग्रस्तांची काळजी

तळमावले : धरणीमाता फाउंडेशन घेतंय पूरग्रस्तांची काळजी
कुमजाई पर्व वृत्तसेवा / कुणाल माने
पाटण : सांगली, सातारा,कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांना महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. इथं झालेल्या अतिवृष्टीमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्य लोकांचे संसार उन्मळून पडले आहेत. अशा पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करण्यासाठी कुंभारगाव येथील धरणीमाता फौंडेशनने पुढाकार घेतला. अतिशय कमी वेळेत तत्परतेने मदत गोळा करून पाटण तालुक्यातील जितकरवाडी, भातडेवाडी, धनावडेवाडी,शिंदेवाडी, तामीने, आंबेघर, हुंबरने, नवजा, डिचोली या गावांना वाटण्यात आली. येथील लोकांना अन्न - धान्य, किराणा माल, कपडे, औषधे, लहान मुलांना खाऊ, तसेच शालेपयोगी साहित्याचे मदतीच्या स्वरूपात वाटप करण्यात आले. अतिवृष्टीमुळे ज्यांचे संपूर्ण घरदार पुरामध्ये वाहून गेले आहे अश्या गरजुंना संसार उपयोगी जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.

धरणीमाता फौंडेशन पूर्ण सातारा जिल्हयातील युवकांचा मोठा समूह आहे. "आम्ही समाजाचं काही तरी देणं लागतो" या भावनेने निस्वार्थपणे समाजाच्या हितासाठी एकवटलेल्या ध्येयवेड्या तरुणांचा हा समुह आहे. गेल्या काही वर्षांपासून कोरोनाच्या काळात पहिल्या व दुसऱ्या लाटेत प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून या टीमने मोलाची कामगिरी पार पाडली आहे. आता सांगली,सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील आदी जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला असून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.युवकांच्या ग्रुपने पूरग्रस्तांना मदत म्हणून सर्व टीम ने whatsapp व फेसबुक या शोसल मीडियावर जिल्ह्यातील नागरिकांना मदतीसाठी आवाहन केले होते.
समाजातील सर्व स्थरांतून पूरग्रस्तांसाठी भरघोस मदत जमा झाली. त्यानंतर फौंडेशनच्या वतीने पूरग्रस्त विभागाचा सर्व्ह करण्यात आला जशी मागणी तसा पुरवठा या उद्देश ठेऊन येथील लोकांना जीवनाआवश्यक वस्तू, किराणा माल, कपडे, औषधे, लहान मुलांना खाऊ, तसेच शालेपयोगी साहित्याचे मदतीच्या स्वरूपात वाटप करण्यात आले. सहकार्य करणाऱ्या सर्वांचे फाउंडेशन च्या वतीने सतिश वाघ, विक्रम नलवडे, अक्षय मोरे, योगेश वाघ, अजिंक्य माने यांनी आभार व्यक्त केले 


ढेबेवाडी : उल्लेखनिय कामगिरी : पोलीस पाटलांचा गौरव

ढेबेवाडी : उल्लेखनिय कामगिरी : पोलीस पाटलांचा गौरव

कुमजाई पर्व वृत्तसेवा / मनोज सावंत

ढेबेवाडी ता.पाटण - ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संतोष पवार साहेब यांनी प्रशसंनीय व उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल वाझोली गावचे पोलीस पाटील विजय सुतार व मत्रेवाडी गावचे पोलीस पाटील भगवान मत्रे या दोन पोलीस पाटील यांचा यांनी केलेल्या कामगिरी बाबत त्यांना आज दि.15 ऑगस्ट अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाल श्रीफळ देवुन त्यांचा गौरव व अभिनंदन करून त्यांचे पाठीवर आज कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन दिले.

  दि.22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे  जिंती येथील जितकर वाडी येथे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये 23 कुटुंबातील 93 लोकांना तुटलेल्या पुलाला शिड्या लावत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोलीस पाटील विजय सुतार व भगवान मत्रे यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली मौलिक कामगिरी बजावली होती .नैसर्गिक आपत्ती काळात योग्य कामगिरी बजावल्या बद्दल  श्री संतोष पवार यांनी त्यांचा आज सत्कार करण्यात आला या वेळी सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 653 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 653 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू*
सातारा दि.15 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 653 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 34 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 5 (9630), कराड 103 (36810, खंडाळा 31 (13525), खटाव 61 (23051), कोरेगांव  47 (20026), माण 66 (15858), महाबळेश्वर 1 (4550) पाटण 12 (9795), फलटण 163(32905), सातारा 140 (47400), वाई 19(14932) व इतर 5(1747) असे आज अखेर एकूण  230229 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (206), कराड 3 (1105), खंडाळा 0 (175), खटाव 22(561), कोरेगांव  0 (432), माण   1 (318), महाबळेश्वर 0 (88), पाटण 2  (351), फलटण 4 (561), सातारा 2 (1378), वाई 0 (342) व इतर 0 (75), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5592 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

काळगावं : वाझोलीतील पूल धोकादायक अवस्थेत


कुमजाई पर्व NEWS / मनोज सावंत
 पाटण तालुक्यातील वाझोली गावातून  जाणाऱ्या  रस्त्यावरील 20 वर्षापूर्वी   उभारलेल्या पूल सध्या धोकादायक बनला आहे. पुलावर केलेला सिमेंट रस्ता पूर्णपणे उखडला असून, त्यातील सळई देखील वर आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.    
 गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सतत जोरदार अतिवृष्टी मुळे पुलावरून पाणी गेले असून पुलाचा काही भाग हा खचला असून लोकांना या पासून धोका निर्माण झाला आहे.
  तरी याच पार्श्वभूमीवर गावातील ग्रामस्थांनी मा. खा.श्री श्रीनिवास पाटील साहेब यांची आज भेट घेत गावातील पुलाची उंची  वाढवावी व पुलाचे नूतनीकरण करावे तसेच गावातील अन्य कामाचे निवेदन दिले.
          या पुलावरील काही भागात लोखंडी सळी या बांधकामातून बाहेर आले असून या मुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे,तसेच पुलाला आजू बाजूला सरंक्षण कठडे नसल्याने वाहन चालकांनच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.
       मा. पाटील साहेबांना आज निवेदन देताना  गावातील ग्रामपंचायत सदस्य श्री रमेश लोहार,संदिप पाटील व संजय सकपाळ उपस्थित होते.
     .

राज्यांअंतर्गत स्पर्धेत कुंभारगावतील शेतकरी पठ्याची दमदार कामगिरी : तालुक्यात प्रथम क्रमांक तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक

राज्यांअंतर्गत स्पर्धेत कुंभारगावतील शेतकरी पठ्याची दमदार कामगिरी : तालुक्यात प्रथम क्रमांक तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक

कुंभारगाव ता.पाटण - कृषिप्रधान देश असलेल्या भारतात आजही अनेक जण नापीक जमिनीला कंटाळून आत्महत्या करतात. तर काहीजण याच उजाड जमिनीत देखील आपल्या मेहनतीने सोने पिकवण्याची धमक बाळगतात.

व अशाच शेतकऱ्यांमुळे आपला देश अन्न धान्यात अग्रेसर राहतो. यातच पाटण तालुक्यात एक कौतुकास्पद गोष्ट घडली आहे. राज्य शासनाच्या पीक स्पर्धेत कुंभारगाव येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र चव्हाण

यांनी पाटण तालुकास्तरावर प्रथम क्रमांक व  जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक पटकाविला. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.

अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ व्हावी या उद्देशाने राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात आली.

या स्पर्धेत कुंभारगाव येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी सहभाग घेत रब्बी हंगामात आपल्या अडीच एकर शेतात ज्वारीचे पीक घेतले. व योग्य व्यवस्थापन करत हेक्टरी 56 क्विंटल 75 कि. उत्पन्न मिळवत पाटण तालुक्यातील प्रथम क्रमांक पटकाविला व सातारा जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकाविला.

दरम्यान शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मदतीने विविध प्रयोग शेतात राबविल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. कोणत्याही पिकाच्या लागवडीचा / पेरणीचा कालावधी महत्त्वाचा असतो. योग्य नियोजन आणि सल्ला घेतला तर प्रत्येकजण भरघोस उतपादन घेऊ शकतो.

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

साताऱ्यात आज 52 हजारांपेक्षा अधिक लसीकरण, आज पर्यंतचे हे उच्चांकी लसीकरण जिल्हाधिकारी आणि सीईओ यांनी केले आरोग्य विभागाचे अभिनंदन*

*साताऱ्यात आज एकाच दिवशी 52 हजारांपेक्षा अधिक लसीकरण, आज पर्यंतचे हे उच्चांकी लसीकरण*
*जिल्हाधिकारी आणि सीईओ यांनी केले आरोग्य विभागाचे अभिनंदन*
सातारा दि. 14 - आज सातारा जिल्ह्यातील 357 केंद्रातून 52,425  लोकांचे लसीकरण करण्यात आले. एकाच दिवशी एवढे लसीकरण करण्याचा हा सातारा जिल्ह्यातला उच्चांकी आकडा आहे. याबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सर्व आरोग्य विभागाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना संक्रमन गेली अनेक महिने सुरु आहे. जानेवारी पासून जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने आज पर्यंत लसीच्या पुरवठाया प्रमाणे लसीकरण केले असून आज पर्यंत 10 लाख 23 हजार 834 लोकांना पाहिला डोस तर 4 लाख 39 हजार 87 लोकांना दुसरा डोस दिला आहे. राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यात सातारा जिल्हा वरच्या स्थानी आहे.
      आज पहिल्यांदा जिल्ह्यातील 357 केंद्रातून तब्बल 52  हजार 425   नागरिकांना लस देण्यात आली. हा आज पर्यंतचा उच्चांक असून या कार्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, जिल्हा उपरुग्णालय,ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इथे काम करणारे सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या कार्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कौतुक केले आहे.  या कामी झटत असलेल्या सर्व यंत्रणांचे दोघांनी अभिनंदन करून असंच काम करून जिल्हा कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.

*सातारा जिल्ह्यातील 785 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 27 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 785 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 27 बाधितांचा मृत्यू*
सातारा दि.14 - जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 785 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 27 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 33 (9625), कराड 122 (36707), खंडाळा 35 (13494), खटाव 123 (22990), कोरेगांव  52 (19979), माण 61 (15792), महाबळेश्वर 6 (4549) पाटण 8 (9783), फलटण 156(32742), सातारा 141 (47260), वाई 42(14913) व इतर 6(1742) असे आज अखेर एकूण  229576 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (206), कराड 6 (1102), खंडाळा 0 (175), खटाव 5(539), कोरेगांव  0 (432), माण   2 (317), महाबळेश्वर 1 (88), पाटण 2  (349), फलटण 1 (557), सातारा 6  (1376), वाई 3 (342) व इतर 1 (75), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5558 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

धामणी : विद्युत खाते अपघाताची वाट पाहते का? ग्रामस्थांचा सवाल ?

धामणी : विद्युत खाते अपघाताची वाट पाहते का? ग्रामस्थांचा सवाल ?
प्रतिनिधी : मनोज सावंत
तळमावले ते काळगावंकडे जाणाऱ्या रस्त्यालगत धामणी गावच्या हद्दीत रामनगर कमानी जवळ रस्त्याच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला असणारे विद्युत खांब पूर्णपणे वाकलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे या खांबावरील विद्युत तारांचा ताण कमी झालेला जाणवतो. हे खांब अतिशय धोकादायक अवस्थेत आहे त्यामुळे कधी संकट ओढवेल सांगता येत नाही. 
विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही ते दखल घेत नाहीत. तो खांब कोसळून कुणाचा जीव जावा याची वाट ते पाहताहेत का असा संतप्त प्रश्न गावकरी विचारत आहेत.खांब रहदारीच्या वाटेवर आहे रात्र दिवस वाहतूक चालूअसते.वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.हा धोकादायक विद्युत खांब बदलून त्या जागी नवा विद्युत खांब उभारण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

सातारा अनलॉक : रविवारपासून दुकाने, मॉल,उपहारगृहे रात्री 10 पर्यंत खुली राहणार

सातारा अनलॉक : रविवारपासून दुकाने, मॉल,उपहारगृहे रात्री 10 पर्यंत खुली राहणार
 सातारा दि.13 जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज आनलॉकचा नवा आदेश लागू केला. यामध्ये सर्व दुकाने, उपहारगृहे, जिम, योग सेंटर, स्पा, शॉपिंग मॉल रविवार (ता.१५) पासून रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात ग्रामसभा घेणे बंधनकारक असल्याने आता सोशल डिस्टसिंगचे पालन करत ग्रामसभा घेण्यासही जिल्हाधिकाऱ्यांनी मुभा दिली आहे. 
 उपहारगृहे -खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. उपहारगृह, बारमध्ये प्रवेश करताना, प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहिल व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहिल.  उपहारगृह, बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचा-याचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पुर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह, बारमध्ये काम करू शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहिल. वातानुकुलित उपहारगृह, बार असल्यास, वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहिल. प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहिल.  उपहारगृह, बारमध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी. उपहारगृह, बारमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहिल. उपरोक्तनुसार उपहारगृहे, बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत मुभा देण्यात येत आहे. उपहारगृह, बारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री 09.00 वाजेपर्यंत घ्यावी. मात्र पार्सल सेवा 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.
दुकाने : सातारा जिल्हयातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविंड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल. 
 शॉपिंग मॉल्स : सातारा जिल्हयातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दूसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.
 जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा : वातानुकुलित तसेच विनावातानुकूलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, उक्त संस्था वातानुकूलीत असल्यास, वायुविजनासाठी  फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील. 
  इनडोअर स्पोर्टस : इनडोअर स्पोटर्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवस झालेले असणे आवश्यक राहील. तसेच, या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील. या ठिकाणी खेळाडूना बैंडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.  
  कार्यालय / औद्योगिक / सेवाविषयक आस्थापना : सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पुर्ण करण्यात यावे. ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचा-यांचे व व्यवस्थापनांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण झालेले असेल त्या आस्थापन पुर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे ज्या आस्थापना वरील कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी कार्यालयात काम करणे आवश्यक असल्यास कर्मचा-यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे. शासकीय - निमशासकीय कार्यालये नियमित वेळेत पुर्ण क्षमतेने चालू ठेवणेस परवानगी असेल. तसेच खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील. सातारा जिल्हयातील सर्व मैदाने, उद्याने स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील.    विवाह सोहळे :  विवाह सोहळा आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.  खुल्या प्रांगणातील,  लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय, हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविंड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. खुल्या प्रांगण, लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत असेल. बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादित असेल, मात्र कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिका-याला तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक राहिल. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल, कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल, मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन व्यवस्थापन, भोजन व्यवस्थापन, बँडपथक, भटजी, फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधीत सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.
  सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स : सातारा जिल्हयात सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ( स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.  
 धार्मिक स्थळे : सातारा जिल्हयातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील. तथापि सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक, धार्मिक सेवा करणेस मुभा राहील.
 आंतरराज्य प्रवास : ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना, बाहेरच्या राज्यातून सातारा जिल्हयात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहिल. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. यास्तव गर्दी, जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे, क्रिडा स्पर्धा इ. वरील निर्बंध कायम राहतील. सातारा जिल्हयातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की, मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारिरीक अंतराचे पालन, इतरत्र थुंकण्यास प्रतिबंध, इ. सर्व निर्बंधांचे पालन करणे अनिवार्य राहिल. 
  सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक, व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेव कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पुर्ण होऊन 14 दिवस झाल्याची खातरजमा करावी व या कर्मचाऱ्यांची यादी (लसीकरण माहिती / प्रमाणपत्रासह) तयार ठेवावी व सक्षम प्राधिकाऱ्यांनी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करुन दयावी.
  दुकाने, उपहारगृहे, बार, मॉल्सचे, कार्यालये, औद्योगिक यांचे नियतकालीक निर्जतूकीकरण व सॅनीटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधीत मालकाची व व्यवस्थापनाची असेल. तसेच, यामध्ये कर्मचारी तसेच ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड, कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच यामध्ये मास्क डिस्पेंसर व बायोमेडीकल वेस्ट (वापरलेले मास्क व टिशु पेपर्स इत्यादीची विल्हेवाट) जमा करण्याची व विहित कार्यपध्दतीने विल्हेवाटीसाठी देण्याची जबाबदारी संबंधीत आस्थापनांची असेल.
 अंत्यविधी व दशक्रिया विधी - जास्तीत जास्त 50 नातेवाईक/नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दशक्रिया विधी करणेस परवानगी असेल.
  CONTAINMENT ZONE बाबत संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे ज्या ज्या वेळी स्वतंत्र आदेश काढून CONTAINMENT ZONE जाहीर करतील व सदर क्षेत्रामध्ये जे निर्बंध लागू करतील ते आदेश CONTAINMENT ZONE क्षेत्रास लागू राहतील.
  या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 

*सातारा जिल्ह्यातील 1090 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 13 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 1090 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 13 बाधितांचा मृत्यू*
सातारा दि.13 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1090 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 13 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 26 (9592), कराड 160 (36585), खंडाळा 39 (13459), खटाव 154 (22867), कोरेगांव  86 (19927), माण 136 (15731), महाबळेश्वर 0 (4543) पाटण 30 (9775), फलटण 194(32586), सातारा 211 (47119), वाई 50(14871) व इतर 4(1736) असे आज अखेर एकूण  228791 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (206), कराड 2 (1096), खंडाळा 0 (175), खटाव 0(534), कोरेगांव  0 (432), माण   1 (315), महाबळेश्वर 0 (87), पाटण 0  (347), फलटण 5 (556), सातारा 5  (1370), वाई  1 (339) व इतर 0 (74), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5531 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*सावली प्रतिष्ठानचाऑनलाइन निबंध बक्षीस वितरण 15 ऑगस्ट रोजी*

सावली प्रतिष्ठानचाऑनलाइन निबंध बक्षीस वितरण 15 ऑगस्ट रोजी
पाटण: सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी आयोजित ऑनलाइन निबंध स्पर्धेचा निकाल कुंभारगाव शाळा नंबर 3 येथे रविवार दिनांक15 ऑगस्ट,2021 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ठीक 10.30 वाजता संपन्न होणार आहे.
सावली प्रतिष्ठान अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर आहे. या प्रतिष्ठान कडून कुंभारगाव मर्यादित ऑनलाइन निबंध स्पर्धा आयोजित केली होती. इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी या वर्गातील एकूण सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे: इयत्ता पाचवी ते सातवी (लहान गट): प्रथम क्रमांक - चेतन नितीन गुजर, द्वितीय क्रमांक- अनुज आनंदा बोत्रे, तृतीय क्रमांक- विघ्नेश अमित मोरे. इयत्ता आठवी ते दहावी (मोठा गट): प्रथम क्रमांक- आरती महादेव वरेकर. द्वितीय क्रमांक-वेदिका अनिल मोरे, तृतीय क्रमांक-मधुरा संजय चव्हाण. या विजेत्या स्पर्धकांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री डॉ.संदीप डाकवे अध्यक्ष स्पंदन चारिटेबल ट्रस्ट, माननीय श्री.योगेश पाटणकर संस्थापक अध्यक्ष राजे संघर्ष प्रतिष्ठान कुंभारगाव, माननीय श्री.अजितराव वरेकर उद्योजक कोयना पाईप उत्पादक तसेच माननीय श्री.रमेश मोरे उपसभापती पंचायत समिती पाटण, माननीय श्री.रघुनाथ माटेकर सदस्य पंचायत समिती पाटण, माननीय श्री. दिलीप मोरे सरपंच ग्रामपंचायत चिखलेवाडी, माननीय श्री सुदाम चव्हाण उपसरपंच ग्रामपंचायत चिखलेवाडी, सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, चिखलेवाडी ग्रामपंचायत मधील सर्व ग्रामस्थ, कुंभारगाव शाळा नंबर 3 मधील सर्व शिक्षक उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, आकर्षक प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येणारआहे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे त्यांना आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम स्थळी उपस्थित राहावे अशी सावली प्रतिष्ठान कडून विनंती प्रा. सुरेश यादव यांनी केलेली आहे.

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

२०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी १५ टक्के फी कपात करण्याचा शासन निर्णय जाहीर

२०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी १५ टक्के फी कपात करण्याचा शासन निर्णय जाहीर
मुंबई प्रतिनिधी / विजय साबळे
मुंबई दि.१२ :  सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फी मध्ये १५ टक्के कपात करण्यात यावी. असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी एक वेळेची बाब म्हणून सर्व मंडळांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना त्याप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यात देखील बहुतांश भागात मार्च, २०२० पासून ब-याच कालावधीसाठी शाळा बंद असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे, यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनी देखील काही शैक्षणिक सुविधांचा वापर केलेला नाही व यामुळे शैक्षणिक संस्थांच्या खर्चात देखील काही प्रमाणात बचत झाली आहे. या पार्श्वभूमीवर व सर्वोच्च न्यायालयाने पारीत केलेले आदेश विचारात घेवून निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय

·  सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फी मध्ये १५ टक्के कपात करण्यात यावी.

·  यापूर्वी ज्या पालकांनी पूर्ण फी भरली आहे, अशी अतिरीक्त फी पुढील महिन्यात किंवा तिमाही हप्त्यात किंवा पुढील वर्षी शाळा व्यवस्थापनाने समायोजित करावी किंवा याप्रमाणे फी समायोजित करणे शक्य नसल्यास फी परत करावी.

·  कपात करण्यात आलेल्या फीबाबत विवाद निर्माण झाल्यास असा विवाद यथास्थिती संबंधित विभागीय शुल्क नियामक समितीकडे किंवा शासन निर्णय क्र. तक्रार-२०२०/ प्र.क्र.५०/एस.डी-४,दिनांक २६ फेब्रुवारी २०२० अन्वये गठीत विभागीय तक्रार निवारण समितीकडे दाखल करण्यात यावा व याबाबत विभागीय शुल्क नियामक समितीने किंवा विभागीय तक्रार निवारण समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहील.

·  कोव्हीड-१९ महामारीच्या काळात विद्यार्थ्याने शाळेची फी, थकीत फी भरली नाही म्हणून शाळा व्यवस्थापनाने अशा कोणत्याही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यास किंवा परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करण्यात येऊ नये किंवा अशा विद्यार्थ्यांचा निकाल देखील रोखून धरण्यात येऊ नये.

· हे आदेश सर्व मंडळाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांना लागू राहतील.

· हे आदेश तात्काळ परिणामाने अमलात येतील.

*सातारा जिल्ह्यातील 973 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 973 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू*
सातारा दि.12 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 973 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 22 (9566), कराड 97 (36425), खंडाळा 36 (13420), खटाव 179 (22713), कोरेगांव  76 (19841), माण 122 (15595), महाबळेश्वर 1 (4543) पाटण 13 (9745), फलटण 186(32392), सातारा 171 (46908), वाई 56(14821) व इतर 14(1732) असे आज अखेर एकूण  227701 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज 14 बाधितांचा मृत्यु झाला असून आजअखेर मृत्यू झालेल्यांची संख्या 5518 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

ग्रंथालय दिनाच्या निमित्ताने के.सी.कॉलेज येथे ऑनलाईन वेबीनार कार्यक्रम संपन्न

ग्रंथालय दिनाच्या निमित्ताने  के.सी.कॉलेज येथे  ऑनलाईन वेबीनार कार्यक्रम संपन्न
तळमावले दि.११ - 
 ग्रंथालय शास्त्राचे पितामह मा श्री. डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले -एक दिवसीय राज्यस्तरीय वेबीनार   IQAC & Dept. Of  Library यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शैक्षणिक आणि संशोधनासाठी खुल्या संसाधनाचा प्रभावी वापर या विषयावर बोलण्यासाठी
  डॉ. एस.ए.एन. इनामदार (माजी ग्रंथपाल, वालचंद कॉलेज इंजिनिअरिंग सांगली )  यांना आमंत्रित करण्यात आले होते . त्यावेळी ते बोलताना म्हणाले ,पारंपरिक व डिजिटल ग्रंथालय यामध्ये भरपूर प्रमाणात फरक झाला आहे मुळातच आपल्या हिंदु धर्मात व  संस्कृतीत ग्रंथाचे महत्त्व हे अनेक थोर संतानी, विचारवंतानी तसेच शास्त्रज्ञ्यांनी सांगितले आहे सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच निरंतर शिक्षण देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.ग्रंथालयाचा विकास प्रसार चांगल्या पध्दतीने होण्यासाठी या २१ व्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात (Digital Technology ) शतकात आपणास शैक्षणिक आणि संशोधनासाठी खुल्या संसाधनाचा (Open Resources ) प्रभावी वापर कसा झाला पाहिजे या संदर्भात वेगवेगळ्या संदर्भाची महिती सांगितले जसे कि - ई- संसाधने मानवाच्या आवश्यकता किंवा इच्छा पुर्ती करणारे वस्तू म्हणजेच ही नवीन इ संसाधने होय.डॉ रंगनाथन यांच्या पंचसूत्री चे महत्त्व विशद करण्यात आले तसेच इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या माध्यमातून आपणास प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध होवू शकते एवढे तंत्रज्ञान पुढे गेले आहे.उदा.गुगलसर्च , ई- जर्नल्स , इमेज व वेब तंत्रज्ञानच्या साह्याने आपले ज्ञान वाढण्यास नेहमीच मदत होते.स्पर्धा परीक्षेसाठी कोणत्या वेबसाईटवर चा वापर करावा कोणते ग्रंथ ,पुस्तक हातळावीत अथवा वाचन करावीत ही देखील माहिती अत्यंत मोजक्या शब्दात व चांगल्या पध्दतीने आम्हा सर्वांना सांगितली गेली.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष . प्राचार्य डॉ.अरुण गाडे  साहेबांनी देखील ग्रंथाचे महत्व , वेबसाईट, संदर्भ ग्रंथ कोणते वाचावेत .पुस्तक अथवा ग्रंथ वाचनाने आपल्या मनात व बुध्दीमध्ये प्रचंड प्रमाणात बदल घडवून आणला जातो तसेच सुसंस्कारचे धडे सुध्दा आपणास समजण्यास सोपे जाते. अशा पध्दतीने.साहेबंनी आपले अध्यक्ष मनोगत थोडक्यात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.जे यु मुल्ला यांनी केले, सुत्रसंचालन - प्रा.सचिन पुजारी यांनी केले तसेच आभार प्रा.महेश चव्हाण यांनी केले या कार्यक्रमास आजी - माजी विद्यार्थी , प्राध्यापक , संशोधक उपस्थित होते..

*सातारा जिल्ह्यातील 622 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 31 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 622 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 31 बाधितांचा मृत्यू*
सातारा दि.11 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 622 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 31 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 28 (9544), कराड 109 (36328), खंडाळा 26 (13384), खटाव 53 (22534), कोरेगांव  37 (19765), माण 49 (15473), महाबळेश्वर 0 (4542) पाटण 16 (9732), फलटण 114(32206), सातारा 127 (46737), वाई 51(14765) व इतर 12(1718) असे आज अखेर एकूण  226728 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज 31 बाधितांचा मृत्यु झाला असून आजअखेर मृत्यू झालेल्यांची संख्या 5504 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                           

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

ग्रामीण भागात ५ वी ते ७ वी आणि शहरी भागातील ८ वी ते १२ वीच्या शाळा 17 ऑगस्ट पासून सुरू

ग्रामीण भागात ५ वी ते ७ वी आणि शहरी भागातील ८ वी ते १२ वीच्या शाळा 17 ऑगस्ट पासून सुरू

मुंबई। महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात मोठा निर्णय काही दिवासांपूर्वी जाहीर केला होता. 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना संसर्ग कमी झालेल्या भागातील निर्बंध शिथील केल्यानंतर सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. राज्यातील ग्रामीण भागात (17 ऑगस्ट 2021) पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास शासनानं आता परवानगी दिली आहे.

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त ठरवतील, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यात कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

दिनांक 17 ऑगस्ट,2021 पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच दिनांक 2 ऑगस्ट, 2021 रोजीच्या ब्रेक द चेन मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

काय असतील शाळा सुरू होण्यापूर्वी नियम

1)शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.

2) शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.

3) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

4) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, इ.

5) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.

6) शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला-बदलीच्या दिवशी सकाळी-दुपारी, ठराविक महत्वाच्या विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.

7) संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.

8) वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात. शाळा सुरु करण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं

जिल्हा बँकांच्या निवडणुकीची रणधुमाळी :15 बँकांसाठी सप्टेंबरमध्ये मतदान

जिल्हा बँकांच्या निवडणुकीची रणधुमाळी :15 बँकांसाठी सप्टेंबरमध्ये मतदान
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यावर असलेली स्थगिती राज्य सरकारने मागे घेतल्याने राज्यात आता जिल्हा बँकांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. राज्यातील १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये मतदान अपेक्षित आहे. निवडणूक होऊ घातलेल्या जिल्हा बँकेत मुंबै बँकसह नाशिक, पुणे, लातूर, जळगाव, रत्नागिरी, धुळे-नंदूरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा, सांगली आणि कोल्हापूर बँकेचा समावेश आहे. या बँकांवर सध्या कार्यरत असलेल्या संचालक मंडळाची मुदत ६ मे २०२० मध्ये संपली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने तब्बल सव्वा वर्षांनंतर जिल्ह्यातील राजकारण तापणार आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आखलेल्या ' महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने'ची अंमलबजावणी आणि त्यानंतरच्या कोरोनासाथीमुळे राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयाने ज्या संस्थांच्या संदर्भात आदेश दिले होते अशा संस्था वगळून उर्वरित सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना सहकार विभागाने ३१ ऑगस्ट २०२१ पर्यँत स्थगिती दिली होती. मात्र, विभागाने सोमवारी आदेश जारी करून निवडणुकीवरील स्थगिती उठवली.

निवडणुकीस पात्र असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत मतदार यादी तयार करण्यासाठी सभासद संस्थानी यापूर्वी सादर केलेले ठराव विचारात घेऊन बँकेची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती, त्या टप्प्यापासून पुढे तत्काळ सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून जिल्हा बँकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच घोषित केला जाईल. साधारणतः सप्टेंबरपर्यँत जिल्हा बँकांसाठी मतदान होऊ शकते,अशी माहिती सहकार विभागाकडून दिली.

निवडणूक होऊ घातलेल्या बँका

मुंबई, नाशिक, पुणे, लातूर, जळगाव, रत्नागिरी, धुळे-नंदूरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर,सोलापूर, नागपूर आणि बुलढाणा

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निवडी जाहीर :राष्ट्रवादीचे बारा तर शिवसेना व काँग्रेसचे चार सदस्य समितीवर

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निवडी जाहीर :राष्ट्रवादीचे बारा तर शिवसेना व काँग्रेसचे चार सदस्य समितीवर

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची बहुप्रतिक्षीत यादी सोमवारी मंत्रालयातून जाहीर करण्यात आली. या निवडीचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले,

सातारा : सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची बहुप्रतिक्षीत यादी सोमवारी मंत्रालयातून जाहीर करण्यात आली. या निवडीचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असून, राष्ट्रवादीच्या बारा तर कॉंग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी चार सदस्यांना समितीवर संधी देण्यात आली आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून नियोजन समिती सदस्यांची यादी केव्हा जाहीर होणार याची राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता होती.मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर उपसचिवांनी याबाबतचे पत्र जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी बी. जे. जगदाळे यांना सोमवारी दुपारी प्राप्त झाले. या समितीतील 20 सदस्यांमध्ये संसद व विधीमंडळ सदस्यांतून नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण यांचा समावेश झाला आहे.

विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांची निवडीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा अपेक्षेप्रमाणे प्रभाव दिसून आला. तब्बल सत्तेचाळीस दिवसानंतर मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने झालेली अंतिम यादी प्रसिद्ध झाल्याच्या वृत्ताला नियोजन समितीच्या सूत्रांनी दुजोरा दिला. त्यानुसार आज सातारा जिल्ह्यातील नियोजन समितीची विशेष निमंत्रित सदस्यांची यादी जाहीर झाली. अपेक्षेप्रमाणे महा विकास आघाडीचे संतुलित प्रतिबिंब जिल्हा पातळीवर कसे उमटेल याची विशेष काळजी घेण्यात आली. त्यानुसार ज्या पक्षाचा पालकमंत्री आहे. त्यांना जादा जागा दिल्या जातात. यामध्ये नामनिर्देशित सदस्यांमध्ये आमदार व खासदारांपैकी दोन सदस्य घेतले जातात.

नामनिर्देशित तज्ञ सदस्य म्हणून चार व विशेष निमंत्रित १४ सदस्यांचा समावेश केला जातो. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला १२, शिवसेनेला चार व काँग्रेसला चार सदस्य वाटणीला आले आहेत. यामध्ये संसद व विधीमंडळ सदस्यांतून नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार मकरंद पाटील व दीपक चव्हाण यांच्या नावाचा समावेश केला आहे.

तसेच जिल्हा नियोजन समितीचे ज्ञान असलेले तज्ञ नामनिर्देशित सदस्य म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील माने, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. विजयराव कणसे, शिवसेनेतून जयवंत शेलार यांचा समावेश केला आहे. विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये राष्ट्रवादीतून धैर्यशील अनपट, ॲड. श्यामराव गाढवे, सतीश चव्हाण, दीपक पवार, सुरेश्चंद्र उर्फ राजभाऊ काळे, सागर साळुंखे, प्रभाकर देशमुख, संतोष पाटील. काँग्रेसमधून अशोक गोडसे, जयवंतराव जगताप, हिंदूराव पाटील, शिवसेनेतून शेखर गोरे, राजेश कुंभारदरे, राहूल बर्गे यांच्या नावाचा समावेश आहे.

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 588 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू**973 जणांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 588 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू*
*973 जणांना दिला आज डिस्चार्ज*
सातारा दि.9 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 588 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 11 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 12 (9501), कराड 82 (36057), खंडाळा 29 (13333), खटाव 66 (22350), कोरेगांव  55 (19460), माण 82 (15341), महाबळेश्वर 4 (4541) पाटण 12 (9709), फलटण 98(31951), सातारा 117 (46469), वाई 27(14687) व इतर 4(1700) असे आज अखेर एकूण  225279 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज 11 बाधितांचा मृत्यु झाला असून आजअखेर मृत्यू झालेल्यांची संख्या 5464 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*973 जणांना दिला आज डिस्चार्ज*

 जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 973 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.                            

*अतिवृष्टी बाधित तालुक्यातील पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात, बाधित असलेला या लाभा पासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी*- *पालकमंत्री बाळासाहेब पाटील*

*अतिवृष्टी बाधित तालुक्यातील पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात, बाधित असलेला या लाभा पासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी*
- *पालकमंत्री बाळासाहेब पाटील*
सातारा दि.9 अतिवृष्टीमुळे पाटण, जावली, महाबळेश्वर तसेच कराड तालुक्याचा काही भाग बाधित झाला आहे. अतिवृष्टीत जिवीतहाणी, शेतीचे नुकसान तसेच याबरोबर घरांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्यात असून शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या नुकसानीच्या आराखड्यात कोणताही अतिवृष्टी बाधित वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
अतिवृष्टी बाधित नागरिकांसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठक आज पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे मृत्यु झाला आहे त्यांच्या वारसांना 5 लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. जे शेतकरी आहेत त्यांना स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विम्याच्या शासनाच्या निकाषानुसार लाभ मिळवून देण्यासाठी  तातडीने कार्यवाही सुरु करावी. अतिवृष्टीमुळे गावांच्या पिण्याच्या योजना वाहून किंवा ना दुरुस्त झाले आहेत, अशा गावांना प्रत्येक शाखा अभियंत्यांनी  प्रत्यक्ष भेटी देवून दुरुस्तीच्या खर्चाची आकडेवारी तयार करा. 
अतिवृष्टीमुळे ज्यांच्या जमिनी वाहून गेल्या किंवा    शेतीमध्ये मलबा आला आहे याची स्वतंत्र यादी कृषी विभागाने तयार करावी, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या काही गावांमधील घरे मातीखाली गाडली गेली आहेत. त्या गावातील नागरिकांची तात्पुरत्या निवाऱ्यासाठी  निवारा शेडची व्यवस्था लवकरात लवकर करावी. तसेच त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी  प्रस्ताव करत असताना वन विभागाच्या जमिनीबरोबर खासगी जमिनीचाही पर्याय ठेवावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी बैठकीत केल्या.
  अतिवृष्टीमुळे शेतीमध्ये आलेला मलबा हटविण्यासाठी मशिनरी उपलब्ध करुन द्या. जिल्ह्यातील मशिनरी कमी पडत असतील तर त्या बाहेरील जिल्ह्यातून आणा. तसेच बाधितांसाठी निवारा शेडची उभारणी करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.
अतिवृष्टी बाधित गावांमधील विहिरी ह्या गाळाने भरल्या आहेत. गाळ काढण्यासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करुन द्या. काही गावांमध्ये सार्वजनिक विहिरींमध्ये गाळ आला आहे. खासगी विहिरी मालक गावच्या पिण्यासाठी पाणी देण्यास तयार आहेत तेथे विद्युत पुरवठा उपलब्ध करुन द्या. यामुळे गावाला स्वच्छ पाणी पिण्यास मिळेल, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी बैठकीत सांगितले.
या बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे अतिवृष्टीबाबत करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
या बैठकीत आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांनी उपयुक्त अशा सूचना केल्या

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 657 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 20 बाधितांचा मृत्यू**777 जणांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 657 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 20 बाधितांचा मृत्यू*
*777 जणांना दिला आज डिस्चार्ज*
सातारा दि. 8  जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 657 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 20 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 11 (9489), कराड 178 (35975), खंडाळा 19 (13304), खटाव 73 (22284), कोरेगांव  55 (19585), माण 35 (15259), महाबळेश्वर 2 (4537) पाटण 16 (9697), फलटण 103 (31853), सातारा 117 (46352), वाई 40(14660) व इतर 8(1696) असे आज अखेर एकूण  224691 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज 20 बाधितांचा मृत्यु झाला असून आजअखेर मृत्यू झालेल्यांची संख्या 5453 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*777 जणांना दिला आज डिस्चार्ज*

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 777 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत किटचे वाटप*

*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत किटचे वाटप*  
कराड: गेल्या आठवड्यात राज्यात विशेषतः कोकण भागासह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली कोल्हापूर या भागात अतिवृष्टी झाली यामुळे नद्या नाले यांना पूर आले व हे पुराचे पाणी गावात शिरून लोकांची घरे, उपयुक्त घरातील साहित्य वाहून गेले. या बाधित गावांचा तसेच पुरग्रस्तांची व्यथा जाणून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला हा दौरा प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केल्यामुळे पुरबाधितांचे झालेले नुकसान पाहून कोणकोणत्या गोष्टी तातडीच्या स्वरूपात करणे आवश्यक आहे त्या पूर्ण करण्याच्या सूचना त्यावेळी आ. चव्हाण यांनी दिल्या. या पूरग्रस्तांना आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने मदतीचे वाटप करण्यात आले. किमान उपयुक्त साहित्याचे  वाटप किटमधून पूर बाधितांना देण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, जि प सदस्य शंकरराव खबाले, निवासराव थोरात, मंगला गलांडे, नानासो पाटील, नरेंद्र पाटील, नितीन थोरात, प्रा धनाजी काटकर, राजेंद्र चव्हाण, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्या थोरवडे, अशोक पाटील, वैशाली माळी आदी यावेळी उपस्थित होते. 

या मदत किटचे वाटप पोतले, येणके, आणे, नांदगाव या गावातील बाधित कुटुंबाना करण्यात आले. या किटमध्ये ५ किलो आटा, १ किलो साखर, ४ ताट, ४ वाटी, ४ ग्लास, ४ चमचे, तांब्या-फुलपात्र, कढई, तवा आदी संसार उपयोगी साहित्याचे प्रत्येक कुटुंबाला साहित्याचे वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, कराड दक्षिण मधील पुरबाधितांना उपयोगी साहित्याच्या मदत किटचे वाटप करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून सुद्धा पूर बाधितांना मदत दिली जात आहे. सद्या प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 लिटर केरोसीन, 5 किलो डाळ दिले जात आहे. तसेच पुरबाधितांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन बाधित कुटुंबाना आर्थिक मदत सुद्धा शासनाकडून दिली जात आहे. याचसोबत पुरामध्ये रस्ते, कठडे, पूल, विजेचे खांब आदी सार्वजनिक गोष्टींचे नुकसान झाले आहे यासाठी सुद्धा लवकर निधी मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाणार आहे. 

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...