शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

*सावली प्रतिष्ठानचाऑनलाइन निबंध बक्षीस वितरण 15 ऑगस्ट रोजी*

सावली प्रतिष्ठानचाऑनलाइन निबंध बक्षीस वितरण 15 ऑगस्ट रोजी
पाटण: सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी आयोजित ऑनलाइन निबंध स्पर्धेचा निकाल कुंभारगाव शाळा नंबर 3 येथे रविवार दिनांक15 ऑगस्ट,2021 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ठीक 10.30 वाजता संपन्न होणार आहे.
सावली प्रतिष्ठान अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर आहे. या प्रतिष्ठान कडून कुंभारगाव मर्यादित ऑनलाइन निबंध स्पर्धा आयोजित केली होती. इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी या वर्गातील एकूण सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे: इयत्ता पाचवी ते सातवी (लहान गट): प्रथम क्रमांक - चेतन नितीन गुजर, द्वितीय क्रमांक- अनुज आनंदा बोत्रे, तृतीय क्रमांक- विघ्नेश अमित मोरे. इयत्ता आठवी ते दहावी (मोठा गट): प्रथम क्रमांक- आरती महादेव वरेकर. द्वितीय क्रमांक-वेदिका अनिल मोरे, तृतीय क्रमांक-मधुरा संजय चव्हाण. या विजेत्या स्पर्धकांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री डॉ.संदीप डाकवे अध्यक्ष स्पंदन चारिटेबल ट्रस्ट, माननीय श्री.योगेश पाटणकर संस्थापक अध्यक्ष राजे संघर्ष प्रतिष्ठान कुंभारगाव, माननीय श्री.अजितराव वरेकर उद्योजक कोयना पाईप उत्पादक तसेच माननीय श्री.रमेश मोरे उपसभापती पंचायत समिती पाटण, माननीय श्री.रघुनाथ माटेकर सदस्य पंचायत समिती पाटण, माननीय श्री. दिलीप मोरे सरपंच ग्रामपंचायत चिखलेवाडी, माननीय श्री सुदाम चव्हाण उपसरपंच ग्रामपंचायत चिखलेवाडी, सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, चिखलेवाडी ग्रामपंचायत मधील सर्व ग्रामस्थ, कुंभारगाव शाळा नंबर 3 मधील सर्व शिक्षक उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, आकर्षक प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येणारआहे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे त्यांना आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम स्थळी उपस्थित राहावे अशी सावली प्रतिष्ठान कडून विनंती प्रा. सुरेश यादव यांनी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...