रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

राज्यांअंतर्गत स्पर्धेत कुंभारगावतील शेतकरी पठ्याची दमदार कामगिरी : तालुक्यात प्रथम क्रमांक तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक

राज्यांअंतर्गत स्पर्धेत कुंभारगावतील शेतकरी पठ्याची दमदार कामगिरी : तालुक्यात प्रथम क्रमांक तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक

कुंभारगाव ता.पाटण - कृषिप्रधान देश असलेल्या भारतात आजही अनेक जण नापीक जमिनीला कंटाळून आत्महत्या करतात. तर काहीजण याच उजाड जमिनीत देखील आपल्या मेहनतीने सोने पिकवण्याची धमक बाळगतात.

व अशाच शेतकऱ्यांमुळे आपला देश अन्न धान्यात अग्रेसर राहतो. यातच पाटण तालुक्यात एक कौतुकास्पद गोष्ट घडली आहे. राज्य शासनाच्या पीक स्पर्धेत कुंभारगाव येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र चव्हाण

यांनी पाटण तालुकास्तरावर प्रथम क्रमांक व  जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक पटकाविला. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.

अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ व्हावी या उद्देशाने राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात आली.

या स्पर्धेत कुंभारगाव येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी सहभाग घेत रब्बी हंगामात आपल्या अडीच एकर शेतात ज्वारीचे पीक घेतले. व योग्य व्यवस्थापन करत हेक्टरी 56 क्विंटल 75 कि. उत्पन्न मिळवत पाटण तालुक्यातील प्रथम क्रमांक पटकाविला व सातारा जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकाविला.

दरम्यान शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मदतीने विविध प्रयोग शेतात राबविल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. कोणत्याही पिकाच्या लागवडीचा / पेरणीचा कालावधी महत्त्वाचा असतो. योग्य नियोजन आणि सल्ला घेतला तर प्रत्येकजण भरघोस उतपादन घेऊ शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...