पाटण तालुक्यातील वाझोली गावातून जाणाऱ्या रस्त्यावरील 20 वर्षापूर्वी उभारलेल्या पूल सध्या धोकादायक बनला आहे. पुलावर केलेला सिमेंट रस्ता पूर्णपणे उखडला असून, त्यातील सळई देखील वर आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सतत जोरदार अतिवृष्टी मुळे पुलावरून पाणी गेले असून पुलाचा काही भाग हा खचला असून लोकांना या पासून धोका निर्माण झाला आहे.
तरी याच पार्श्वभूमीवर गावातील ग्रामस्थांनी मा. खा.श्री श्रीनिवास पाटील साहेब यांची आज भेट घेत गावातील पुलाची उंची वाढवावी व पुलाचे नूतनीकरण करावे तसेच गावातील अन्य कामाचे निवेदन दिले.
या पुलावरील काही भागात लोखंडी सळी या बांधकामातून बाहेर आले असून या मुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे,तसेच पुलाला आजू बाजूला सरंक्षण कठडे नसल्याने वाहन चालकांनच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.
मा. पाटील साहेबांना आज निवेदन देताना गावातील ग्रामपंचायत सदस्य श्री रमेश लोहार,संदिप पाटील व संजय सकपाळ उपस्थित होते.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा