शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

साताऱ्यात आज 52 हजारांपेक्षा अधिक लसीकरण, आज पर्यंतचे हे उच्चांकी लसीकरण जिल्हाधिकारी आणि सीईओ यांनी केले आरोग्य विभागाचे अभिनंदन*

*साताऱ्यात आज एकाच दिवशी 52 हजारांपेक्षा अधिक लसीकरण, आज पर्यंतचे हे उच्चांकी लसीकरण*
*जिल्हाधिकारी आणि सीईओ यांनी केले आरोग्य विभागाचे अभिनंदन*
सातारा दि. 14 - आज सातारा जिल्ह्यातील 357 केंद्रातून 52,425  लोकांचे लसीकरण करण्यात आले. एकाच दिवशी एवढे लसीकरण करण्याचा हा सातारा जिल्ह्यातला उच्चांकी आकडा आहे. याबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सर्व आरोग्य विभागाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना संक्रमन गेली अनेक महिने सुरु आहे. जानेवारी पासून जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने आज पर्यंत लसीच्या पुरवठाया प्रमाणे लसीकरण केले असून आज पर्यंत 10 लाख 23 हजार 834 लोकांना पाहिला डोस तर 4 लाख 39 हजार 87 लोकांना दुसरा डोस दिला आहे. राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यात सातारा जिल्हा वरच्या स्थानी आहे.
      आज पहिल्यांदा जिल्ह्यातील 357 केंद्रातून तब्बल 52  हजार 425   नागरिकांना लस देण्यात आली. हा आज पर्यंतचा उच्चांक असून या कार्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, जिल्हा उपरुग्णालय,ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इथे काम करणारे सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या कार्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कौतुक केले आहे.  या कामी झटत असलेल्या सर्व यंत्रणांचे दोघांनी अभिनंदन करून असंच काम करून जिल्हा कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...