ढेबेवाडी : उल्लेखनिय कामगिरी : पोलीस पाटलांचा गौरव
कुमजाई पर्व वृत्तसेवा / मनोज सावंत
ढेबेवाडी ता.पाटण - ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संतोष पवार साहेब यांनी प्रशसंनीय व उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल वाझोली गावचे पोलीस पाटील विजय सुतार व मत्रेवाडी गावचे पोलीस पाटील भगवान मत्रे या दोन पोलीस पाटील यांचा यांनी केलेल्या कामगिरी बाबत त्यांना आज दि.15 ऑगस्ट अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाल श्रीफळ देवुन त्यांचा गौरव व अभिनंदन करून त्यांचे पाठीवर आज कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन दिले.
दि.22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे जिंती येथील जितकर वाडी येथे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये 23 कुटुंबातील 93 लोकांना तुटलेल्या पुलाला शिड्या लावत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोलीस पाटील विजय सुतार व भगवान मत्रे यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली मौलिक कामगिरी बजावली होती .नैसर्गिक आपत्ती काळात योग्य कामगिरी बजावल्या बद्दल श्री संतोष पवार यांनी त्यांचा आज सत्कार करण्यात आला या वेळी सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा