पाटण : सांगली, सातारा,कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांना महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. इथं झालेल्या अतिवृष्टीमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्य लोकांचे संसार उन्मळून पडले आहेत. अशा पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करण्यासाठी कुंभारगाव येथील धरणीमाता फौंडेशनने पुढाकार घेतला. अतिशय कमी वेळेत तत्परतेने मदत गोळा करून पाटण तालुक्यातील जितकरवाडी, भातडेवाडी, धनावडेवाडी,शिंदेवाडी, तामीने, आंबेघर, हुंबरने,
नवजा, डिचोली या गावांना वाटण्यात आली. येथील लोकांना अन्न - धान्य, किराणा
माल, कपडे, औषधे, लहान मुलांना खाऊ, तसेच शालेपयोगी साहित्याचे मदतीच्या
स्वरूपात वाटप करण्यात आले. अतिवृष्टीमुळे ज्यांचे संपूर्ण घरदार पुरामध्ये
वाहून गेले आहे अश्या गरजुंना संसार उपयोगी जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप
करण्यात आले.
धरणीमाता फौंडेशन पूर्ण सातारा जिल्हयातील युवकांचा मोठा समूह आहे. "आम्ही समाजाचं काही तरी देणं लागतो" या भावनेने निस्वार्थपणे समाजाच्या हितासाठी एकवटलेल्या ध्येयवेड्या तरुणांचा हा समुह आहे. गेल्या काही वर्षांपासून कोरोनाच्या काळात पहिल्या व दुसऱ्या लाटेत प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून या टीमने मोलाची कामगिरी पार पाडली आहे. आता सांगली,सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील आदी जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला असून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.युवकांच्या ग्रुपने पूरग्रस्तांना मदत म्हणून सर्व टीम ने whatsapp व फेसबुक या शोसल मीडियावर जिल्ह्यातील नागरिकांना मदतीसाठी आवाहन केले होते.
समाजातील सर्व स्थरांतून पूरग्रस्तांसाठी भरघोस मदत जमा झाली. त्यानंतर फौंडेशनच्या वतीने पूरग्रस्त विभागाचा सर्व्ह करण्यात आला जशी मागणी तसा पुरवठा या उद्देश ठेऊन येथील लोकांना जीवनाआवश्यक वस्तू, किराणा माल, कपडे, औषधे, लहान मुलांना खाऊ, तसेच शालेपयोगी साहित्याचे मदतीच्या स्वरूपात वाटप करण्यात आले. सहकार्य करणाऱ्या सर्वांचे फाउंडेशन च्या वतीने सतिश वाघ, विक्रम नलवडे, अक्षय मोरे, योगेश वाघ, अजिंक्य माने यांनी आभार व्यक्त केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा