सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

कुंभारगाव : त्या धोकादायक विजेच्या खांबाकडे महावितरणचा कानाडोळा

कुंभारगाव : त्या धोकादायक विजेच्या खांबाकडे महावितरणचा कानाडोळा

कुणाल माने : कुमजाई पर्व न्यूज

कुंभारगाव ता.पाटण-  प्रतिकूल परिस्थितीतही रात्रीचा दिवस  करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तळमावले महावितरण अधिकाऱ्यांनी मोहीम फत्ते केली आहे. तर दुसरीकडे कुंभारगाव मान्याचीवाडी येथील पुलाजवळ आलेल्या पोलचा पुरामुळे भराव वाहून गेल्याने पोल पूर्ण मोकळा झाला आहे या धोकादायक विजेच्या पोलबाबत वारंवार पाठपुरावा करूनही महावितरण अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

एखादी मोठी दुर्घटना अथवा जीवितहानी झाल्यावर महावितरणाला जाग येणार का? असा खडा सवाल ग्रामस्थ करत आहेत. संबंधित रस्ता रहदारीचा असल्याने दिवसभर नागरिकांची ये जा चालू असते त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे

वारंवार मागणी करूनही अद्यापही खांब बदलला गेला नसून याच खांबावर तारांचा झोळ खाली येत असून मोठी दुर्घटना अथवा जीवितहानी घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. महावितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने महावितरण अधिकारी दुर्घटना अथवा जीवितहानी होण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...