सरपंच सौ.सारिका योगेश पाटणकर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, असा अगदी राजकारणातील पहिल्या पायरीपासून त्यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरु केली आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने अभिष्टचिंतन
मौजे कुंभारगावं ता.पाटण च्या प्रथम नागरिक सरपंच सौ.सारिका योगेश पाटणकर यांचा आज वाढदिवस. राजकीय या सामाजिक दृष्ट्या परिचीत असणाऱ्या या गावचे सरपंच प्रथमच आरक्षण मागासवर्गीय महिलासाठी मिळाले तेही उच्च शिक्षित महिलेकडे ३९ वर्षातून पहिल्यांदा.मागील ग्रामपंचायतीच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सुद्धा ग्रामपंचायय सदस्य म्हणून अभ्यासू वृत्तीने काम पाहिले.आणि याच अनुभवाच्या शिदोरीमुळे जनतेच्या आशीर्वादाने त्यांना पाच वर्षाकरीता सरपंच पदी काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण यांचे हे गांव.सरपंच यांचे पती श्री.योगेश पाटणकर हे मा.पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक.बाबांच्या आशीर्वादाने सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा गट यांनी एकत्रित लढवून बहुमताने ग्रामपंचायत ताब्यात घेतली.सरपंच सौ.पाटणकर यांचे शिक्षण बी.ई कॉम्पुटर असलेने ग्रामपंचायतीचा कारभार डिजिटल पद्धतीने करणेस त्यांना कोरोना काळात कोणतीही अडचण आली नाही.व्हिडिओ काँफेरेन्सने शासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबरच्या मिटिंग त्यांनी सहजपणे पार पाडल्या.
रोहा येथील नोकरी सोडून पती योगेश पाटणकर यांच्या बरोबरीने त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये लक्ष घातले.पुढे जाऊन त्यांनी कर्जत येथे स्वतःचा व्यवसाय म्हणून पर्यटकांकरिता पिकनिक पॉईंट सुरू केले.त्यामुळे हे कुटुंब फक्त सासरे कै.जगन्नाथ पाटणकर यांचेकडून सामाजिक कामाचे धडे मिळाले म्हणूनच मी आज कौटुंबिक जबाबदारी सांभाळून राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालत सामाजिक सेवेचे वृत सांभाळणार आहे.त्यासाठी कुंभारगांव पंचक्रोशीतील जनतेचे आशीर्वाद मिळावेत असे सौ.पाटणकर म्हणाल्या
सरपंच पदावर विराजमान झालेनंतर कोरोना या महाभयंकर आजाराबाबाबत लोकजागृती करून गावातील लोकांचे व्हॅक्सीनेशन पूर्णत्वाकडे नेणेसाठी प्रयत्न केले.पिण्याच्या पाण्याची योजना पूर्णपणे योग्य प्रकारे कार्यान्वित करून जनतेस स्वच्छ पिण्याचे पाणी दिले.प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुलांचे ऑनलाईन शिक्षणाकरिता समोर आलेल्या प्रश्नांची सोडवणूक केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा