कुमजाई पर्व प्रतिनिधी / पवन माने
कुंभारगाव ता.पाटण निवेदनात नमूद केले की, शेतात वानर, रानडुक्कर,बिबट्या आदी वन्यप्राणी येऊन पिकाची नासाडी करीत आहेत.काळगाव,कुंभारगाव, ढेबेवाडी परिसरात बहुतांश शेतकऱ्यांचे जीवन शेतीवर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.बिबट्याचा मानवी वस्तीत होणार वावर वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाला धोका निर्माण झाला आहे.
याकडे वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी लक्ष देऊन वन्यप्राणी यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा, धरणीमाता फौंडेशनच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी फौंडेशनचे अध्यक्ष सतीश वाघ,व अक्षय मोरे उपस्थित होते.
वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण पोतदार
कार्यालयात हजर नव्हते, त्यामुळे कार्यालयात असणाऱ्या रोहित सावंत या कर्मचाऱ्यांकडे निवेदन द्यावे लागले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा