काळगाव / मनोज सावंत
कुठरे ता.पाटण, दि.4 लॉकडाऊन मध्ये अनेक लोक घरी बसून, असल्याने त्यांना विविध छंद जोपासले आहेत.त्यापैकीच एक म्हणजे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कुठरे गावचे रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त कला शिक्षक दामोदर दीक्षित. दीक्षित सरांनी लॉक डाऊनमधील मोकळ्या वेळेत पिंपळाच्या पानांवर व्यक्तिरेखांसह विविध प्रकारची आकर्षक आणि हुबेहूब चित्रे साकारली आहेत.
सध्या त्यांच्या या छंदाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. आपली ही अनोखी कला केवळ आपल्या जवळच मर्यादित न राहता सर्वांना ती समजावी म्हणून लवकरच ते शाळा - महाविद्यालये सेवाभावी संस्था, व्यक्ती आणि मंडळांच्या माध्यमातून या अनोख्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करत आहेत. विद्यार्थी आणि नवोदित चित्रकारांना त्यातून प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचा त्यांचा संकल्प आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा