शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

कराड - लोहारवाडी (येनपे) येथे विविध विकासकामांचा शुभारंभआ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या आमदार निधीतून रस्ता व स्मशानभूमी संरक्षण भिंतीचे भूमिपूजन संपन्न.



कराड - लोहारवाडी (येनपे) येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या आमदार निधीतून रस्ता व स्मशानभूमी संरक्षण भिंतीचे भूमिपूजन संपन्न

कराड - रमेश सावंत प्रतिनिधी येनपे :
कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून लोहारवाडी (येनपे), ता. कराड येथील महत्त्वाच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून या कामांचे भूमिपूजन आज शुक्रवार दि. 02 जानेवारी 2026 रोजी सकाळ मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

लोहारवाडी (येनपे) गावातील कोक्रेटीकरण रस्ता कामासाठी 7 लाख रुपये तसेच स्मशानभूमी संरक्षण भिंतीसाठी 7 लाख रुपये, असा एकूण 14 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामांमुळे गावातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण होणार असून दैनंदिन सोयीसुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाला युवा नेते श्री. पंकज पाटील, लोहारवाडीचे युवा नेते श्री. बाबासाहेब पवार यांच्यासह ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आमदार मा. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिण मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांचे कौतुक केले.

यावेळी बोलताना पंकज पाटील यांनी  सांगितले की, रस्त्याच्या कोक्रेटीकरणामुळे ग्रामस्थांची वाहतूक सुलभ होणार असून पावसाळ्यातील अडचणी दूर होणार आहेत. तसेच स्मशानभूमी संरक्षण भिंतीमुळे परिसर सुरक्षित राहणार असून ग्रामस्थांच्या भावनिक व सामाजिक गरजांना न्याय मिळणार आहे.

ग्रामस्थांनी आमदार मा. डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार मानत, भविष्यातही अशाच प्रकारे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...