संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शुक्रवार, ९ जानेवारी, २०२६
स्वामी विवेकानंद सप्ताहाच्या निमित्ताने वांग खोऱ्यातील माध्यमप्रमुख व पत्रकारांचा काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात भव्य सत्कार समारंभाचे आयोजन.
स्वामी विवेकानंद सप्ताहाच्या निमित्ताने वांग खोऱ्यातील माध्यमप्रमुख व पत्रकारांचा काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात भव्य सत्कार समारंभाचे आयोजन.
तळमावले / प्रतिनिधी :
मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या *पत्रकार दिनाच्या* औचित्याने तसेच काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथे सुरू असलेल्या *श्री स्वामी विवेकानंद सप्ताहाच्या* निमित्ताने वांग खोऱ्यातील माध्यमप्रमुख व पत्रकार बांधवांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
हा सत्कार समारंभ *मंगळवार दि. १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता* काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले (ता. पाटण, जि. सातारा) येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात वांग खोऱ्यातील सर्व वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांचे माध्यमप्रमुख तसेच पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात येणार आहे.
लोकशाहीला मजबूत, पारदर्शक व सक्षम बनविण्यात पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. समाजातील सत्य, अन्याय, भ्रष्टाचार तसेच सामान्य जनतेचा आवाज निर्भीडपणे मांडण्याचे कार्य पत्रकार बांधव सातत्याने करत आहेत. लोकशाहीचा *चौथा स्तंभ* जिवंत ठेवण्यासाठी पत्रकार अहोरात्र झटत असून त्यांच्या या निष्ठावान कार्याचा सन्मान करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
या सत्कार समारंभासाठी वांग खोऱ्यातील सर्व माध्यमप्रमुख व पत्रकार बांधवांना सादर निमंत्रित करण्यात आले असून, त्यांनी कार्यक्रमास *अगत्यपूर्वक उपस्थित राहून सहकार्य करावे, अशी नम्र विनंती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो डॉ उषादेवी साळुंखे मॅडम यांनी केली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार
ढेबेवाडी प्रतिनिधी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा