संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शुक्रवार, ९ जानेवारी, २०२६
के.सी. कॉलेज तळमावले येथे ‘कॉमर्स डे’ उत्साहात साजरा ; विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद.
तळमावले (ता. पाटण, जि. सातारा) येथील काकासाहेब चव्हाण कॉलेजमध्ये दि. ९ जानेवारी २०२६, शुक्रवार रोजी कॉमर्स विभागाच्या वतीने “कॉमर्स डे” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अनिल शिंदे (संस्थापक अध्यक्ष, मर्चंट सिंडिकेट पतसंस्था, तळमावले) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. उषादेवी साळुंखे मॅडम होत्या.
प्रमुख पाहुणे मा. श्री. अनिल शिंदे यांचे स्वागत प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. उषादेवी साळुंखे मॅडम यांच्या शुभहस्ते कॉलेजच्या ‘झेप’ अंक देऊन करण्यात आले. यानंतर कॉमर्स डेच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन, विविध डेमो सादरीकरणे करून वाणिज्य विषयातील संकल्पना सविस्तरपणे समजावून सांगितल्या. तसेच रांगोळी, निबंध, पोस्टर प्रेझेंटेशन, मॉडेल्स अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांमुळे कार्यक्रमास शैक्षणिक तसेच व्यावसायिक वातावरणाची झलक मिळाली.
स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व पेन देऊन करण्यात आला. आपल्या मनोगतात मा. श्री. अनिल शिंदे म्हणाले की, “कॉमर्स डे हा दिवस वाणिज्य क्षेत्राचे महत्त्व, व्यापारी उद्योगांची भूमिका, आर्थिक शिस्त, उद्योजकता आणि रोजगार निर्मिती याबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. विशेषतः कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हा दिवस प्रेरणादायी ठरतो.” तसेच व्यापार, उद्योग व सेवा क्षेत्राचे समाजातील महत्त्व अधोरेखित करणे, आर्थिक साक्षरता वाढवणे, उद्योजकता, स्टार्ट-अप्स आणि इनोव्हेशनसाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे ही या दिवसामागील प्रमुख उद्दिष्टे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. उषादेवी साळुंखे मॅडम म्हणाल्या की, “कॉमर्स म्हणजे केवळ खरेदी-विक्री नव्हे, तर अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशाच्या GDP वाढीत व्यवस्थापन, वित्त, लेखा, कर व बँकिंग या घटकांचे मोठे योगदान आहे. कॉमर्सनंतर CA, CS, CMA, ICWA, B.Com, M.Com, MBA, बँकिंग, टॅक्स कन्सल्टंट अशा अनेक करिअर संधी विद्यार्थ्यांसाठी खुल्या आहेत.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय रास्ते सरांनी केले, तर आभार प्रा. एस. एस. लवांडे यांनी मानले. कार्यक्रमास स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. संभाजी नाईक, IQAC प्रमुख प्रा. डॉ. मनोज सादळे, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. गवराम पोटे, प्रा. डॉ. विक्रांत सुपूगडे (शारीरिक शिक्षण संचालक) तसेच गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार
ढेबेवाडी प्रतिनिधी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा