मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

कोळे - नवदाम्पत्याचा प्रेरणादायी उपक्रम: अक्षरसंपदा ग्रंथालयास स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट.

नवदाम्पत्याचा प्रेरणादायी उपक्रम: अक्षरसंपदा ग्रंथालयास स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट.
कोळे येथील आदर्श शिक्षिका श्रीमती शोभा अरुण चव्हाण यांची कन्या पोलीस सब-इन्स्पेक्टर सौ.आकाशी व आणे येथील प्रगतीशील शेतकरी श्री. विलास देसाई व सौ. पुष्पलता देसाई यांचे चिरंजीव महिला व बालकल्याण अधिकारी श्री. विश्वजित देसाई यांचा शुभविवाह नुकताच उत्साहात संपन्न झाला. या मंगलप्रसंगी केवळ सामाजिक औपचारिकतेपुरते न थांबता, या नवदाम्पत्याने समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून कोळे येथील ‘अक्षरसंपदा ग्रंथालयास’ स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी मौल्यवान पुस्तके भेट देत एक आदर्श सामाजिक संदेश दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी महागड्या पुस्तकांच्या अभावामुळे स्पर्धा परीक्षांपासून वंचित राहू नयेत, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असा विश्वास यावेळी श्री. विश्वजित देसाई व सौ. आकाशी देसाई यांनी व्यक्त केला. तसेच युथ सोशल फाउंडेशन व अक्षरसंपदा ग्रंथालय यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे नवदाम्पत्याने विशेष कौतुक केले. या प्रसंगी आणे गावचे माजी प्राध्यापक श्री. डी. बी. देसाई सर, श्री. विलास देसाई, सौ. पुष्पलता देसाई, श्री. आप्पासो पाटील, आदर्श शिक्षिका श्रीमती शोभा चव्हाण मॅडम, तसेच युथ सोशल फाउंडेशन व अक्षरसंपदा ग्रंथालयाचे सुनीलभैय्या देसाई, अनिल माळी, सागर गरुड, ओंकार देशमुख, अर्जुन कराळे, विशाल पाडळकर, समीर संदे, सौ. अरुणा देसाई, सौ. स्वाती माळी आदी मान्यवर उपस्थित होते. नवदाम्पत्याच्या या उपक्रमामुळे परिसरात कौतुकाचा सूर उमटत असून, शिक्षण व सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...