मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

‘शिवसमर्थ’च्या वतीने ढेबेवाडी विभागातील पत्रकारांचा गौरव. आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त पत्रकार दिन उत्साहात साजरा.

‘शिवसमर्थ’च्या वतीने ढेबेवाडी विभागातील पत्रकारांचा गौरव आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त पत्रकार दिन उत्साहात साजरा
तळमावले / वार्ताहर : मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दि. शिवसमर्थ मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी व शिवसमर्थ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ढेबेवाडी विभागातील पत्रकारांचा भव्य सन्मान सोहळा तळमावले येथील शिवसमर्थ संस्थेच्या मुख्य कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यास अभिवादन करून मराठी पत्रकारितेतील त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव केला. यावेळी शिवसमर्थ समूहाचे शिल्पकार ॲड. जनार्दन बोत्रे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत तुपे, नितीन पाटील यांच्यासह संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात संतोष आंबी, सीईओ हेमंत तुपे, रविंद्र माने, डॉ. संदीप डाकवे आदी मान्यवरांनी पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी, ग्रामीण पत्रकारांचे योगदान आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेचे महत्त्व यावर मनोगते व्यक्त केली. या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार संपत देसाई, राजेश पाटील, रविंद्र माने, संदीप डाकवे, बाळासाहेब रोडे, पोपट माने, पोपट झेंडे, प्रमोद पाटील, विजय सुतार, नितीन बेलागडे, हरीश पेंढारकर, राजेंद्र पुजारी, संतोष आंबी यांचा शिवसमर्थ परिवाराच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सन्मानित पत्रकारांना आकर्षक सन्मानपत्र, दिवाळी अंक, नवीन वर्षाची दिनदर्शिका, शाल व मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे पत्रकारांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील पहिले पत्रकार मानले जातात. त्यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी पोंभुर्ले (ता. देवगड) येथे झाला. त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप डाकवे यांनी केले. सौ. स्वाती पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर आशिष वीर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवसमर्थ संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले. पत्रकारितेचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम शिवसमर्थ परिवाराच्या कार्याची ओळख अधोरेखित करणारा ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...