काळगाव गणात ‘कमळ’ फुलवण्यासाठी भाजपची निर्णायक चाल — अनिल डाकवे मैदानात!
पाटण पंचायत समिती निवडणूक | काळगाव गण ( कुमजाई पर्व न्यूज - संपादक - श्री.प्रदीप विष्णु माने )
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच पाटण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच भारतीय जनता पार्टीने (भाजप) काळगाव गणासाठी टाकलेली आक्रमक व नियोजनबद्ध चाल सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
डाकेवाडीचे माजी सरपंच, पाटण खरेदी-विक्री संघाचे संचालक व युवा नेतृत्व श्री. अनिल हरी डाकवे यांची पंचायत समिती सदस्य पदासाठी उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याने, काळगाव गणातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
सातारा जिल्हा बँकेचे संचालक व भाजपचे युवा नेते श्री. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली पाटण तालुक्यात भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मजबूत रणनीती आखली आहे.
त्या रणनीतीचा भाग म्हणून काळगाव गणात अनुभवी, विश्वासार्ह आणि जनाधार असलेले नेतृत्व म्हणून अनिल डाकवे यांच्यावर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे.
ही उमेदवारी म्हणजे भाजपची संघटनशक्ती, विकासाभिमुख धोरणे आणि विजयाचा आत्मविश्वास दाखवणारी निर्णायक चाल मानली जात आहे.
डाकेवाडीचे माजी सरपंच म्हणून ग्रामविकास, पायाभूत सुविधा, शेतकरी हित व युवक सक्षमीकरण या क्षेत्रात अनिल डाकवे यांनी ठोस कामगिरी केली आहे.
“सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या भाजपच्या विचारधारेनुसार त्यांनी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न प्राधान्याने सोडवले. शांत, संयमी पण विकासाच्या मुद्द्यावर ठाम अशी त्यांची ओळख आज काळगाव गणात लोकप्रिय ठरली आहे.
काळगाव विभागातील तरुणांचे प्रभावी नेतृत्व भाजपच्या माध्यमातून अनिल डाकवे करत आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे तरुणांमध्ये कमळ चिन्हाबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे.
काळगाव विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत त्यांनी बजावलेली निर्णायक भूमिका, तसेच वांगव्हाली सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी केलेली यशस्वी मोर्चेबांधणी ही त्यांची संघटन क्षमता आणि नेतृत्वगुण अधोरेखित करते.
अनिल डाकवे यांच्या उमेदवारीमुळे काळगाव गणात भाजपची ताकद स्पष्टपणे वाढली असून, विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे.
या निवडणुकीत विकास, विश्वास आणि संघटनशक्तीच्या बळावर भाजपचे कमळ काळगाव गणात फुलणार का? याकडे संपूर्ण पाटण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
खरोखरच लोककल्याणासाठी सातत्याने कार्य करणारे एक समर्पित आणि प्रेरणादायी नेतृत्व. आपली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि विकासाची दूरदृष्टी समाजात खरोखरच सकारात्मक बदल घडवत आहे. आपल्या अथक परिश्रमांबद्दल आणि सततच्या सेवेसाठी मनापासून धन्यवाद.
उत्तर द्याहटवा