रविवार, १८ जानेवारी, २०२६

मृत्यूनंतरही दिला जीवनाचा प्रकाश… सौ. अपर्णा रघुनाथ सावंत यांचे मरणोत्तर नेत्रदान.

मृत्यूनंतरही दिला जीवनाचा प्रकाश… सौ. अपर्णा रघुनाथ सावंत यांचे मरणोत्तर नेत्रदान.

मानखुर्द / पाटण प्रतिनिधी :मानखुर्द येथे वास्तव्यास असलेल्या सौ. अपर्णा रघुनाथ सावंत (वय ४१) यांचे दि. १६ जानेवारी २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने सावंत कुटुंबावर तसेच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.

सौ. अपर्णा सावंत या मनमिळावू, शांत स्वभावाच्या, कुटुंबवत्सल आणि सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. घरातील प्रत्येक नातेसंबंध त्यांनी प्रेमाने जपला होता. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांना मोठा मानसिक आघात बसला आहे.

या दु:खद प्रसंगीही त्यांचे पती श्री. रघुनाथ काशिनाथ सावंत व संपूर्ण कुटुंबीयांनी एक अत्यंत प्रेरणादायी व समाजासाठी आदर्श ठरेल असा निर्णय घेतला. त्यांनी सौ. अपर्णा सावंत यांचे मरणोत्तर नेत्रदान करून मानवीतेचा सर्वोच्च आदर्श समाजासमोर ठेवला.

नेत्रदान ही मानवी जीवनातील अत्यंत उदात्त, पवित्र व जीवनदायी सामाजिक सेवा असून, एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना नवीन दृष्टी आणि नवजीवन मिळू शकते. दुःखाच्या काळातही दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचा हा निर्णय समाजाला निश्चितच प्रेरणा देणारा आहे.

सौ. अपर्णा सावंत यांचे मूळ गाव आंब्रुळकरवाडी (भोसगाव), ता. पाटण असून सध्या त्या मानखुर्द येथे वास्तव्यास होत्या. त्यांच्या जाण्याने आंब्रुळकरवाडी, भोसगाव परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


त्यांच्या या महान दातृत्वामुळे सौ. अपर्णा सावंत या केवळ आठवणींतच नव्हे, तर दोन व्यक्तींच्या डोळ्यांतून सदैव जिवंत राहणार आहेत.
त्यांचे हे कार्य समाजाला नेत्रदानाबाबत सकारात्मक विचार करण्यास निश्चितच प्रवृत्त करेल.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि सावंत कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याचे बळ देवो, हीच सर्वांची प्रार्थना.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...