रविवार, १८ जानेवारी, २०२६

मानवतेचा हात पुढे! घणसोली शहरी बेघर निवारा केंद्रात आनंद माईंगडे चॅरिटेबल ट्रस्टचे हृदयस्पर्शी अन्नदान.

मानवतेचा हात पुढे! घणसोली शहरी बेघर निवारा केंद्रात आनंद माईंगडे चॅरिटेबल ट्रस्टचे हृदयस्पर्शी अन्नदान.


साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज नवी मुंबई :
समाजातील उपेक्षित, बेघर आणि गरजू घटकांसाठी आधाराची भक्कम ढाल ठरणाऱ्या आनंद माईंगडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका शहरी बेघर निवारा केंद्र, घणसोली येथे मोफत अन्नदानाचा प्रेरणादायी उपक्रम मोठ्या आपुलकीने राबविण्यात आला. “भुकेल्याला अन्न मिळणे हीच खरी समाजसेवा” या भावनेतून हा उपक्रम साकार झाला.

या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष सतीश आनंद माईंगडे यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांना सन्मानपूर्वक व शिस्तबद्ध पद्धतीने पौष्टिक अन्नाचे वाटप करण्यात आले. यावेळी सचिन धीरज माईंगडे, दत्तासेवा सहकारी पतपेढीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार पाटील, प्रशासकीय अधिकारी शिवाजी माईंगडे, तसेच शिवाजी नायकवडी, प्रकाश माईंगडे, संजय कुंभार, अजित लाड, अभिषेक देसाई यांची सक्रिय उपस्थिती होती. सामाजिक कार्याला चालना देणारे यशवंतराव चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत यांनीही उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले.


अन्नदानाच्या या उपक्रमामुळे निवारा केंद्रातील लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे,” असे मत यावेळी ट्रस्टच्या वतीने व्यक्त करण्यात आले. आनंद माईंगडे चॅरिटेबल ट्रस्ट समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देत असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...