संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
मंगळवार, २० जानेवारी, २०२६
पाटणमध्ये भाजपची ‘मास्टर स्ट्रोक’ तयारी! पाटणकर गटाच्या जोरावर शंभूराज देसाईंना थेट आव्हान. पाटणचा किल्ला अभेद्यच! विकासाच्या जोरावर शंभूराज देसाई ठाम — भाजपची हवाबाजी जनता फेटाळणार.
पाटणमध्ये भाजपची ‘मास्टर स्ट्रोक’ तयारी! पाटणकर गटाच्या जोरावर शंभूराज देसाईंना थेट आव्हान.
पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक खेळी करत राजकीय रणांगणात निर्णायक पाऊल टाकले आहे. आतापर्यंत शिवसेना (शिंदे गट) चा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पाटणमध्ये आता भाजप थेट सत्तासंघर्षासाठी सज्ज झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
सत्यजित पाटणकर यांच्या भाजप प्रवेशानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. एकेकाळी नाममात्र असलेली भाजपची ताकद आता गावांत मजबूत संघटनात रूपांतरित होत असून, मूळ राष्ट्रवादी (शरद पवार गट) मधील असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये स्थिरावत आहेत.
पाटणकर गटाच्या पाठीशी खा. उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष आ. अतुलबाबा भोसले यांची ताकद उभी असल्याने भाजपचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे.
ही केवळ स्थानिक निवडणूक नसून २०२९ विधानसभा निवडणुकीची नांदी असल्याचे भाजप कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत.
‘पाटणमध्ये भाजप कार्यकर्त्यांचे काम कोणीही अडवू शकत नाही’ — गोरे यांचा इशारा
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता पालकमंत्री शंभूराज देसाई यांना थेट इशारा देत भाजपची भूमिका स्पष्ट केली.
“ पाटणमध्ये पालकमंत्री कोणीही असो, भाजप कार्यकर्त्यांचे कोणतेही काम अडणार नाही. मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री आमच्या पाठीशी खंबीर आहेत,” असे ठणकावून सांगत गोरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
पाटणमध्ये सत्ता परिवर्तनाची चाहूल?
भाजपची संघटनशक्ती, नेत्यांचा पाठिंबा आणि आक्रमक रणनीती पाहता पाटणमध्ये सत्ता परिवर्तनाची स्पष्ट चाहूल लागली आहे.
आता प्रश्न एकच — शंभूराज देसाईंचा गड भाजप उद्ध्वस्त करणार का?
उत्तर लवकरच मतपेटीतून बाहेर येणार आहे.
पाटणचा किल्ला अभेद्यच! विकासाच्या जोरावर शंभूराज देसाई ठाम — भाजपची हवाबाजी जनता फेटाळणार?.
पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले असले, तरी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचा पाटणवरील पकड अजूनही मजबूत असल्याचे चित्र स्पष्ट आहे. भाजपकडून आक्रमक हालचाली सुरू असल्या, तरी विकास आणि जनसंपर्काच्या जोरावर शिवसेना (शिंदे गट) आत्मविश्वासात आहे.
देसाईंचा विकास — भाजपची सर्वात मोठी डोकेदुखी
रस्ते, पाणीपुरवठा, ग्रामविकास, निधीवाटप अशा अनेक प्रश्नांवर शंभूराज देसाई यांनी तालुक्याला दिलेला न्याय
हा भाजपसाठी मोठा अडसर ठरत आहे.
राजकीय डावपेच कितीही झाले, तरी जनता विकास विसरणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या नेत्यांकडून मांडली जात आहे.
‘सत्तेची हवा’ असल्याचा देसाईंचा आरोप
मंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार पलटवार केला.
“ पाटण विधानसभा मतदारसंघाबाबत केलेले वक्तव्य म्हणजे सत्तेची हवा डोक्यात गेल्याचे स्पष्ट लक्षण आहे,” असा घणाघाती टोला देत देसाईंनी भाजपच्या दाव्यांची हवा काढली.
‘१९६६ कार्यकर्ते आमच्यासोबत’ — देसाईंचा आकड्यांसह पलटवार.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पाटणकर गटाचे १०२ गावांतील १९६६ प्रमुख कार्यकर्ते शशिवसेनेत प्रवेश केलेले आहेत. हे लक्षात घ्यावे. पाटणची जनता या हवाबाजीला भुलणार नाही,” असे सांगत देसाईंनी भाजपच्या शक्तीप्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पाटणमध्ये शिवसेनेचे पारडे अजूनही जड
भाजप कितीही रणनीती आखो, नेते आणो वा राजकीय वातावरण तापवो — पाटणमध्ये शिवसेना (शिंदे गट) अजूनही मजबूत स्थितीत आहे, असे स्थानिक राजकीय जाणकारांचे मत आहे.
विकास विरुद्ध राजकीय खेळी — या संघर्षात पाटणची जनता कुणाला कौल देते?
याचा फैसला आता निवडणूक निकालातूनच होणार आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...
-
ढेबेवाडी - राजकीय वारसा, जनतेचा कौल आणि शिवसेनेची ताकद!मंद्रुळकोळे जि. प. गणात कु.मृणाल महेश पाटील यांना उमेदवारी, पाटण तालुक...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा