मंगळवार, २० जानेवारी, २०२६

धनुष्य-बाणाची रणशिंगनाद! मंदुळकोळे–सणबुरमध्ये शिवसेनेचा आक्रमक प्रचार, पहिल्याच दिवशी आघाडी

 धनुष्य-बाणाची रणशिंगनाद! मंदुळकोळे–सणबुरमध्ये शिवसेनेचा आक्रमक प्रचार, पहिल्याच दिवशी आघाडी.


मंदुळकोळे जिल्हा परिषद गट तसेच मंदुळकोळे व सणबुर पंचायत समिती गणात शिवसेनेच्या वतीने काल प्रचंड उत्साहात निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. “गतिशील विचार, विकासात्मक धोरण” या ब्रीदवाक्याच्या जोरावर शिवसेनेने प्रचाराच्या पहिल्याच दिवशी राजकीय रणधुमाळीला तडाखेबंद सुरुवात करत आघाडी घेतली आहे.

मंदुळकोळे जिल्हा परिषद गटासाठी बनपुरीचे उद्योजक श्री. महेश पाटील यांची कन्या कु. मृणाल महेश पाटील, मंदुळकोळे पंचायत समिती गणासाठी मालदनचे युवा उद्योजक व समाजसेवक नितीन काळे, तर सणबुर पंचायत समिती गणासाठी सणबुरचे माजी उपसरपंच श्री. संदीप जाधव यांच्या पत्नी सौ. संपदा संदीप जाधव हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असून, तिघांनीही काल प्रचाराचा श्रीगणेशा केला.


प्रचाराची सुरुवात मान्याचीवाडी (मालदन) येथील श्री वडजाई देवी मंदिरात पूजा-अर्चा करून झाली. त्यानंतर बनपुरी येथील श्री नाईकबा देवस्थानात दर्शन व आरती करत विजयासाठी प्रार्थना करण्यात आली. या धार्मिक व शक्तीप्रदर्शनात्मक प्रारंभामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश आणि आत्मविश्वास संचारला.

यावेळी बोलताना उमेदवारांनी “विजय आमचाच” असा ठाम विश्वास व्यक्त केला.
“आपली निशाणी धनुष्य-बाण घरोघरी पोहोचवा. धनुष्य-बाणाला मत म्हणजे विकासाला मत! पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली गावागावात विकासाची गंगा पोहोचली आहे; त्यामुळे हा विजय शिवसेनेचाच” असे ठाम प्रतिपादन कु. मृणाल महेश पाटील यांनी केले.

एकूणच, आक्रमक प्रचार, संघटित शक्ती आणि विकासाचा ठोस अजेंडा यांच्या जोरावर मंदुळकोळे–सणबुर पट्ट्यात शिवसेनेने पहिल्याच दिवशी राजकीय मैदान तापवले असून, आगामी लढत अधिकच रंगतदार होणार हे स्पष्ट झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...